बॉडीकॉन ड्रेस आणि स्टायलिंग टिप्स (Bodycon Dresses In Marathi)

Bodycon Dresses In Marathi

आपण आहोत त्यापेक्षा थोडं आणखी बारीक आणि सडपातळ दिसावं असं प्रत्येकीला वाटत असतं. त्यासाठी आपण खूप मेहनतही घेतो. पण यासाठी सतत डाएट आणि वर्कआऊटच करण्याची गरज आहे असं नाही. बॉडीकॉन पॅर्टनमधील अंगाला चिकटून राहणारे ड्रेस घातल्यावर आपोआप तुम्ही सुडौल आणि सडपातळ दिसू लागता. यासाठीच तुमचं एक्ट्राचं वजन लपवण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी ट्राय करा हे बॉडीकॉन ड्रेसचे हटके प्रकार. आम्ही यासोबत तुमच्यासाठी काही स्टायलिंग टिप्सदेखील शेअर करत आहोत. 

Table of Contents

  Black Ruched Bodycon Dress

  क्लासिक ब्लॅक रंगाचा आणि शोल्डर स्ट्रेप्सचा हा बॉडीकॉन ड्रेस तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच असायला हवा. कारण एखाद्या पार्टीसाठी, डिनर डेटसाठी हा अतिशय परफेक्ट आहे. या ड्रेसवर एखादं सिंपल जॅकेट घालून तुम्ही तुमच्या फ्रेंडसोबत हॅंगआऊट करू शकता. किवा शॉर्ट ब्लेझर घालून ऑफिसच्या प्रेझेंटेशनसाठी तयार होऊ शकता. आपण महिलांसाठी या ट्यूब टॉप देखील वापरु शकता.

  Latest Trends: Western

  Black Ruched Bodycon Dress

  INR 674 AT Veni Vidi Vici

  Printed Black Bodycon Dress

  वेरोमोडा ब्रॅंडचा हा काळा अथवा थोडा ग्रे शेडमध्ये असलेला ड्रेस एखाद्या पार्टीची शान ठरू शकतो. या ड्रेसच्या व्हि नेक आणि स्लीव्जलेसमुळे तो अधिकच सुंदर दिसत आहे. या ड्रेसला आतून जाड अस्तर असल्यामुळे तुम्हाला यात खूपच आरामदायक वाटू शकतं. 

  Latest Trends: Western

  Printed Black Bodycon Dress

  INR 1,749 AT Vero Moda

  Yellow Solid Bodycon Dress

  जर तुम्हाला डेली विअरसाठी एखादा बॉडीक़न ड्रेस खरेदी करायचा असेल हा ड्रेस अगदी परफेक्ट आहे. कारण तुम्ही हा ड्रेस कॉलेज अथवा मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जाताना कधीही घालू शकता. पिवळ्या रंगाच्या या बॉडीकॉन ड्रेसवर एखादं डेनिम जॅकेट घालून तुम्ही तुमचा पिकनिक लुकही करू शकता. यावर कोणतेही स्पोर्ट शूजही छान वाटतील. स्कीनी पँट कसे घालायचे ते देखील शिका. 

  Latest Trends: Western

  Yellow Solid Bodycon Dress

  INR 674 AT SASSAFRAS

  Dark Blue Bodycon Dress

  एखाद्या कॅज्युअल मिटींगसाठी अथवा पार्टीसाठी हा लॉंग बॉडीकॉन ड्रेस तुमच्यावर मस्त उठून दिसेल. कंबेरवर बेल्ट लावून या ड्रेसमध्ये तुम्ही आणखी सेक्सी दिसाल. शिवाय तुमचा बॉडीशेप या ड्रेसमध्ये अगदी कमनिय दिसू शकेल. निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या अप्रतिम कॉंबिनेशनमुळे तुम्ही सगळ्यांमध्ये आकर्षक आणि बोल्ड दिसाल.  

  Latest Trends: Western

  Women Bodycon Dark Blue Dress

  INR 649 AT MOKSHA ENTERPRISE

  Pink Bodycon Dress

  जर तुम्हाला सर्व मुलींप्रमाणेच गुलाबी रंग आवडत असेल तर हा ड्रेस खास तुमच्यासाठीच आहे. कारण यामुळे तुमचा गर्ली लुक परफेक्ट् होईल. हा ड्रेस स्ट्रेचेबल असल्यामुळे यात तुम्हाला खूपच आरामदायक वाटेल. उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यात कुल दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या वॉर्डरोब कलेक्शनमध्ये या ड्रेस अॅड करू शकता.

  Latest Trends: Western

  Pink Bodycon Dress

  INR 479 AT Jhankhi

  Textured Srappy Bodycon Dress

  दोन पद्धतीने धालण्यासाठी हा ड्रेस नक्कीच बेस्ट आहे. तुम्ही टीशर्ट शिवाय हा ड्रेस एखाद्या पार्टीसाठी तयार होताना घालू शकता. शिवाय व्हाईट टीशर्ट कॅरी करून तुम्ही कॉलेज अथवा मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाताना हा लुक ट्राय करू शकता. मस्टर आणि व्हाईट कलर मुळे तुम्ही यात इतरांपेक्षा वेगळ्या आणि बोल्ड दिसाल. महिलांसाठी या पँटीज करण्याचा प्रयत्न करा.

  Latest Trends: Western

  Textured Srappy Bodycon Dress

  INR 400 AT RIO

  White Solid Bodycon Dress

  व्हाईट कलर हा अनेकांचा विकपॉईंट असतो. पांढऱ्या रंगाच्या या ऑफशोल्डर बॉडीकॉन ड्रेसमुळे तुम्ही सर्वात हॉट दिसाल. या ड्रेसचे फॅब्रिक स्ट्रेचेबल असल्यामुळे तो तुमच्या शरीरावर अगदी परफेक्ट बसतो. हिल्स आणि कल्चसोबत तो कॅरी करून स्टायलिश हिसा.

  Latest Trends: Western

  White Solid Bodycon Dress

  INR 1,140 AT VENI VIDI VICI

  Strappy Ruched Bodycon Dress

  बेंज अथवा क्रीम रंगाचा हा बॉडीकॉन ड्रेस तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी कॅरी करू शकता. या ड्रेसच्या स्ट्रेप्स कमी जास्त करता येणाऱ्या आणि ड्रेसचे कापड स्ट्रेचेबल आहे. त्यामुळे तुम्ही या ड्रेसमध्ये अगदी कॉन्फिडंट आणि बोल्ड दिसू शकता. 

  Latest Trends: Western

  Strappy Ruched Bodycon Dress

  INR 490 AT TRENDS

  Poshbery Pink Solid Bodycon Dress

  इंग्लिश पिंक रंगाच्या लाक्रा फॅब्रिकचा हा बॉडीकॉन ड्रेस ऑफिससाठी परफेक्ट आहे. हिल्ससोबत कॅरी केल्यास या ड्रेसमध्ये तुम्ही स्टायलिश आणि प्रोफेशनल दिसाल. या ड्रेसला कंबरेजवळ एक बेल्ट देण्यात आला आहे. ज्यामुळे तुमची कंबर कमनिय आणि बॉडीशेप सुडौल दिसेल. 

  Latest Trends: Western

  Poshbery Pink Solid Bodycon Dress

  INR 1,494 AT POSHBERY

  Mustard Solid Bodycon Dress

  थोडं हटके आणि स्टायलिश दिसायचं असेल तर ड्रेसही तशाच पॅर्टनचा निवडायला हवा. या ड्रेसमुळे तुम्हाला हा लुक नक्कीच मिळेल. या ड्रेसचे स्लीव्ज इतर ड्रेसपेक्षा हटके आणि स्टायलिश आहेत. शिवाय याचं कापडही जाड आणि स्ट्रेचेबल आहे. परफेक्ट बॉडीकॉन ड्रेससाठी तुम्ही या ड्रेसची नक्कीच निवड कराल.

  Latest Trends: Western

  Mustard Solid Bodycon Dress

  INR 1,099 AT POSHBERY

  बॉडीकॉन ड्रेस कॅरी करण्यासाठी सोप्या टिप्स (Tips To Wear Bodycon Dresses In Marathi)

  बॉडीकॉन ड्रेसमध्ये तुमचा लुक खुलून दिसण्यासाठी आणि ड्रेस अधिक स्टायलिश वाटण्यासाठी या सोप्या टिप्स तुमच्या फायद्याच्या ठरतील. 

  Instagram

  कंबर बेल्ट अथवा लेसने कव्हर करा (Cover With Waist Belt Or Lace)

  हे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल की जो ड्रेस आधीच इतका तंग आहे त्याला बेल्ट लावण्याची काय गरज. पण जरी हा ड्रेस बॉडी हगिंग असला तरी तुम्ही कंबरेवर एखादा नाजूक बेल्ट अथवा लेस बांधून तो अधिक आकर्षक करू शकता. कारण यामुळे तुमची कंबर अधिक कमनिय दिसेल. 

  शेपविअर घालण्यास मुळीच विसरू नका (Don't Forget To Wear Shapewear)

  शेपविअर तुम्हाला तुमचं शरीर सुंदर दिसण्यासाठी आणि तुम्हाला आरामदायक वाटण्यासाठी नेहमीच मदत करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही अंगाला घट्ट बसणारा बॉडीकॉन ड्रेस घालाल तेव्हा त्यात परफेक्ट शेपविअर नक्कीच ट्राय करा. शिवाय यामुळे तुमच्या इनरविअरचा आकारही दिसणार नाही. कारण असं इनरविअरचा शेप दिसणं तुमच्यासाठी संकोच वाढवणारं ठरू शकतं. जर तुम्ही शेपविअर घातले तर तुमच्या शरीराचा सुडौलपणा अधिकच वाढेल. 

  ड्रेसवर एखादं शॉर्ट ब्लेझर अथवा जॅकेट ट्राय करा (Try Short Blazer Or Jacket Over The Dress)

  बॉडीवेअर घालून परफेक्ट कसं दिसावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यावर एखादं स्टायलिश श्रग अथवा जॅकेट घाला. एखादं वेल कट ब्लेझर घालून तुम्ही यात अधिक स्टायलिश दिसू शकता. शिवाय यामुळे तुम्हाला खूपच आरामदायक वाटेल. ऑफिस प्रेंझेंटेशनसाठी हा ब्लेझर लुक अगदी परफेक्ट ठरेल. 

  Instagram

  या सोबत फ्लॅट फूटवेअर मुळीच कॅरी करू नका (Don't Carry Flat Footwear With It)

  बॉडीकॉम ड्रेस हे स्टायलिश आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखले जातात. त्यामुळे फ्लॅट फूटवेअरमुळे हा लुकच बिघडू शकतो. हिल्समुळे तुमचा लुक अगदी परफेक्ट दिसेल. स्टायलिश आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी तुम्ही यासोबत पम्प्स, वेजेस, स्टिलेटोस नक्कीच ट्राय करू शकता. तुम्हाला यातील जे फूटवेअर आरामदायक वाटतील ते तुम्ही घाला जर तुम्हाला हिल्स घालणं जमणार नसेल तर तुम्ही प्लॅटफॉर्म हिल्स अथवा लो वेजेसही ट्राय करू शकता. 

  बॉडीकॉन ड्रेसचे कापड जाड असेल याची काळजी घ्या (Fabric Of The Dress Should Be Thick)

  पातळ, झिरझिरीत कापडाचे बॉडीकॉन ड्रेस कधीच निवडू नका. कारण ते शरीरावर अतिशय घाणेरडे वाटू शकतात. यामुळे तुमच्या शरीरातील काही अवयव वाईट पद्धतीने प्रेंझेट होतील. म्हणूनच नेहमी जाड फॅब्रिकचे ड्रेस सिलेक्ट करा. 

  Instagram

  ड्रेसवर जास्त अॅक्सेसरिज घालू नका (Don't Put Too Many Accessories On The Dress)

  बॉडीकॉन ड्रेसवर अती प्रमाणात अॅक्सेसरिज घालण्यामुळे तुमचा लुक बिघडू शकतो. तुमचा ड्रेस अधिक आकर्षक दिसेल याची काळजी घ्या. कारण अती अॅक्सेसरिजमुळे तुमचा ड्रेस झाकोळला जाऊ शकतो. यासोबत तुम्ही एखादं वॉच, सुंदर इअररिंग्ज आणि क्लच नक्कीच कॅरी करू शकता. 

  बॉडीकॉन ड्रेस गडद रंगाचे निवडा (Choose A Dark Coloured Bodycon Dress)

  वास्तविक बॉडीकॉन ड्रेसची स्टाईल करण्याचे अनेक पर्याय आहेत मात्र तुम्ही गडद रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये अगदी उठून दिसाल यात शंकाच नाही. कारण अशा रंगामध्ये तुम्ही जास्त आत्मविश्वासू आणि बोल्ड दिसाल. एखादा क्लासिक ब्लॅक अथवा सेक्सी रेडमध्ये तुम्ही खूपच हॉट दिसाल. 

  Instagram

  बॉडीकॉन ड्रेसमध्ये मुळीच लाजू नका (Don't Feel Shy In Bodycon Dress)

  स्त्रीचा आत्मविश्वास हाच तिचा सौंदर्याचा आरसा असतो. त्यामुळे जर तुम्हाला बॉडीकॉनमध्ये सुंदर दिसायचं असेल तर मुळीच लाजू नका. कारण तुम्ही जशा आहात तशा जगासमोर सामोरं जा. यासाठी कोणीतरी काय बोलेल याची पर्वा करत बसू नका. कारण जर तुम्हाला आतून आत्मविश्वास  असेल तर कोणत्याही ड्रेसमध्ये तुम्ही बोल्ड आणि सुंदर दिसू  शकता.