तुमचे ओठ मऊ, मुलायम आणि गुलाबी जर नैसर्गिकरित्या दिसत असतील तर चेहऱ्याचे आकर्षण अधिक वाटते. पण सतत लिपस्टिकचा वापर आणि प्रदूषण यामुळे ओठ काळे पडतात आणि आपण जोपर्यंत त्याकडे लक्ष देऊ तोपर्यंत उशीर झालेला असतो. ओठाची त्वचा ही अत्यंत मऊ आणि मुलायम असते आणि यावर तैलीय ग्रंथी नसतात. त्यामुळे जसजसा ऋतू बदलतो तसतसे ओठ सुकतात. फाटलेले ओठ पुन्हा मऊ आणि मुलायम करण्यासाठी आणि त्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी लिप बाम (Lip Balm) ची आवश्यकता भासते. आपण नेहमी बाजारातील लिप बाम आणतो. पण आम्ही तुम्हाला घरच्या घरी स्क्रब आणि लिप बाम कसा बनवायचा याची माहिती या लेखातून देणार आहोत. तुम्हाला कोणत्याही केमिकलशिवाय घरगुती लिप बाम बनवता येईल आणि याचा अधिक फायदा ओठांना मिळतो. या लिप बाममध्ये आपण गुलाबाच्या पाकळ्या आणि व्हॅसलिनचा वापर करून घेऊ शकतो. ज्यामुळे आपले ओठ अधिक मॉस्चराईझ आणि मऊ, मुलायम बनतात. मात्र हा लिप बाम तयार केल्यानंतर तो ठेवण्यासाठी कोरड्या आणि स्वच्छ कंटेनरचा वापर करावा. जाणून घेऊया लिप बाम बनविण्याची सोपी पद्धत.
लिप बामसाठी लागणारे साहित्य आणि पद्धत
Shutterstock
साहित्य
- 25-30 गुलाबाच्या ताज्या पाकळ्या
- अर्धा चमचा व्हॅसलिन
बनविण्याची पद्धत
- एक सॉस पॅन घेऊन तो गॅसवर ठेवा आणि त्यात व्हॅसलिन वितळवा. त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाका
- गॅस अतिशय मंद आचेवर ठेवा. गुलाबाच्या पाकळ्या तोपर्यंत शिजू दे जोपर्यंत त्याचा रंग चॉकलेटी होत नाही
त्यानंतर गॅस बंद करा आणि हे मिश्रण थंड होऊ द्या - नंतर मिक्सरमधून हे वाटून घ्या
- तुमचा लिप बाम तयार आहे. हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये घाला आणि रोज रात्री झोपायच्या आधी ओठांना लावा
फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक
लिप स्क्रब कसा बनवाल
Shutterstock
लिप स्क्रब बनविण्यासाठी लागणारे साहित्य
- 1 लहान चमचा ब्राऊन शुगर
- 1 लहान तांदळाचे पीठ
- 1 लहान मध
बनविण्याची पद्धत
- एका भांड्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्या
- तुमच्याजवळ ब्राऊन शुगर नसेल तर तुम्ही गुळाचा वापरही करू शकता
- हे मिक्स करून जी पेस्ट तयार होईल ती ओठांना लावा आणि हलक्या हाताना या स्क्रबने मसाज करा
- लिप स्क्रब आणि लिप बाम नियमित वापरल्यास, तुम्हाला लवकरच गुलाबी रंगाचे ओठ नैसर्गिकरित्या प्राप्त होतील. तसंच तुमचे ओठ मऊदेखील होतील. याचा उपयोग प्राचीन काळापासून अत्तरामध्येही करण्यात येतो. विटामिन सी असल्यामुळे गुलाबाच्या पाकळ्या या त्वचेला अधिक मुलायम करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
काळे ओठ गुलाबी करण्यासाठी घरगुती उपाय, सोप्या पद्धती (Home Remedies For Dark Lips)
वेलचीचा स्क्रबही ठरतो गुणकारी
Shutterstock
वेलची आणि मध हे कॉम्बिनेशन गुलाबी ओठांसाठी उत्कृष्ट ठरतं. तुम्ही मधामध्ये वेलची पावडर मिसळून तुम्ही व्यवस्थित ओठांवर हलक्या हाताने स्क्रब करा. हे स्क्रब केल्याने तुमच्या ओठांवरील मृत त्वचा निघून जाते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध आणि वेलचीमुळे तुमच्या ओठांवर चांगलं स्क्रब होतं आणि तुम्ही नेहमी लावत असलेली लिपस्टिक असं केल्याने ओठांवरून निघून जाते. अर्थात जर ओठांमध्ये लिपस्टिक साचून राहिली असेल तर ती निघण्यास याचा फायदा होतो. तुम्हाला घरी जर तयार करायचा नसेल आणि घरगुती लिप बामसारखा इफेक्ट हवा असेल तर तुम्ही MyGlamm चा लिप बाम वापरू शकता.
गुलाबी ओठ हवे असतील तर करा वेलचीचा वापर
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक