ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

फक्त लिपस्टिक नाही तर ‘हे’ 5 Lip Balm करतील तुमच्या ओठांना अधिक आकर्षक

लिपस्टिक लावणं हे प्रत्येक मुलीला आवडतं पण रोज लिपस्टिक लावल्याने ओठ काळे पडण्याचा धोका असतो शिवाय तुमचे ओठ सतत लिपस्टिक लावल्याने फाटतात. याचा अर्थ असा नाही की फक्त लिपस्टिकमुळे ओठ फाटतात. प्रदूषण आणि बदलत्या वातावरणामुळेदेखील आपल्या नाजूक ओठांना हे सहन करावं लागतं. तसं तर आपले ओठ मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी घरगुती उपायदेखील करू शकतो. पण प्रत्येकवेळी आपल्याकडे यासाठी वेळ असेलच असं नाही त्यामुळे आपण शॉर्टकट शोधत असतो. जेणेकरून जास्त वेळ लागणार नाही आणि ओठदेखील मऊ आणि मुलायम राहतील. ओठांना दिवसभर मऊ ठेवण्यासाठी लिप बामपेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही. तुम्हाला लिप बाममध्येही खूप पर्याय सापडतील ज्यामुळे तुमच्या ओठांची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. तर आता आपण बरीच शेडमध्ये लिप ग्लॉस किंवा लिप बाम मिळवू शकता. आम्ही तुम्हाला असेच काही लिप बाम सांगणार आहोत जे तुमच्या ओठांना लावल्यानंतर तुमचे ओठ दिसतील अधिक आकर्षक!

लॅक्मे लिप लव्ह चॅपस्टिक

लॅक्मेचा लिप बाम कॅरामल, पीच, चेरी, मँगो, स्ट्रॉबेरी अशा प्रकारच्या साधारण अकरा शेड्समध्ये मिळतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये असणाऱ्या एसपीएफ 15 मुळे सूर्याच्या येणाऱ्या किरणांपासूनही तुमच्या ओठांची काळजी करण्यासाठी या लिप बामची मदत होते. याशिवाय हा लिप बाम तुमचे ओठ कोरडे पडू देत नाही आणि जास्त काळापर्यंत तुमचे ओठ मॉईस्चराईज ठेवण्यास या लिप बामची मदत होते.

रेटिंग- 4 स्टार। किंमत- ₹ 135

चॅपड ओठ कसे टाळता येतील याबद्दल देखील

ADVERTISEMENT

लॉरियल पॅरिस इंफेलिबिल सेक्सी बाम

लॉरियल पॅरिस ब्रँडचा हा लिप बाम साधारण तुमच्या ओठांना 12 तास मऊ आणि मुलायम ठेवण्यास मदत करतो. तसंच तुमच्या प्रत्येक मूड आणि कार्यक्रमांकरिता तुम्हाला हा लिप बाम वापरता येतो कारण यामध्ये अनेक शेड्स आहेत. तुमचं बजेट थोडं जास्त असेल तर तुम्ही हा बाम रोज तुमच्या ओठांवर लावू शकता. त्यामुळे तुम्हाला लिपस्टिक लावायची गरज भासणार नाही. शिवाय हा बाम तुमच्या ओठांवर शेड्समुळे लिपस्टिकप्रमाणेच दिसेल. 

रेटिंग- 4.2 स्टार। किंमत- ₹ 475

मेबेलिन न्यू यॉर्क बेबी लिप्स कलर बाम

मेबेलिनचा हा लिप बाम केवळ ओठांचीच काळजी घेत नाही तर तुमचे ओठ फाटले असतील तर त्याचीदेखील काळजी हा बाम घेतो. याचं मॉईस्चर दिवसभरात साधारण 8 तास टिकून ओठांना मऊ आणि मुलायम ठेवण्याचं काम करतं. तसंच या लिप बाममध्ये असणारे एसपीएफ 20 हे UV किरणांपासून ओठ काळे होण्यापासून वाचवतं. त्याशिवाय याचा फ्रूटी सुगंध दिवसभर तुमच्या ओठावर राहातो. कोरड्या ओठांसाठी लिप बाम वापरुन पहा.

रेटिंग- 4.3 स्टार। किंमत- ₹ 153  

ADVERTISEMENT

वाचा – ओठातून रक्तस्त्राव

 

 

निविया शाईन लिप बाम

हा लिप बाम ओठांना नैसर्गिक स्वरुपात नरम आणि मुलायम ठेवतो. यामध्ये कलिंगड, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी असे अनेक शेड्स उपलब्ध आहेत. महत्त्वाचं म्हणजे याचे शेड्स ग्लॉसी असल्यामुळे ओठांवर शाईन येते. तसंच हा लिप बाम बराच काळ तुमच्या ओठांवर टिकून राहातो. तसंच ओठ फुटले असतील तर त्यासाठीदेखील या बामचा उपयोग होतो.

ADVERTISEMENT

रेटिंग- 4.3 स्टार। किंमत- ₹ 148

लिंबू रस बद्दल देखील वाचा

 

हिमालया हर्बल्स पीच शाइन लिप केअर

विटामिन ई, अँटिऑक्सिडंन्ट्स आणि नैसर्गिक रंगानी असलेला हिमालया हर्बलचा लिप केअर बाम हा जास्त काळासाठी तुमच्या ओठांचं संरक्षण करतो. तसंच तुमचे ओठ जास्त वेळ मॉईस्चराईज ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये असलेलं कॅस्टर ऑईल हे ओठांना मुलायम बनवतं आणि ओठांचा नैसर्गिक रंग जपण्यास मदत करतं.

ADVERTISEMENT

रेटिंग- 4.2 स्टार। किंमत- ₹ 138

हेदेखील वाचा –

ओठांवरील लिपस्टिक काढण्याच्या या आहेत योग्य पद्धती

Perfect Pout साठी ट्राय करा ‘या’ सोप्या 5 Tricks!

ADVERTISEMENT

ओठ काळे पडले असतील तर करा 10 घरगुती उपाय

 कोरड्या ओठांसाठी लिप बाम

04 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT