परफेक्ट लुकसाठी आयब्रोजचा शेप चांगला असणं गरजेचं आहे. आयब्रोजला शेप देण्यासाठी आपण काहीच लोकांवर विश्वास ठेवू शकतो. कारण जर चुकून जरी पार्लरमध्ये तुमच्या आयब्रोजचा शेप बिघडला तर तुमचा लुकच खराब होऊ शकतो. जर तुमच्या आयब्रोज दाट आणि रेखीव नसतील तर यासाठी तुम्हाला प्रत्येकवेळी थ्रेडिंगच करण्याची गरज नाही. काही मेकअप टिप्सनेही तुम्ही तुमच्या आयब्रोजना शेप देऊ शकता. आयब्रोज पेन्सिल, स्टेन्सिल, टिंट, टॅटूज, लॅमिनेशन यामुळे तुमच्या आयब्रोजना रंग आणि शेप देणं सहज शक्य आहे. मात्र यासाठी तुम्हाला थोड्या सरावाची नक्कीच गरज आहे. पण एक असं एकमेव प्रॉडक्ट आहे ज्याने तुम्ही हे काम त्वरीत करू शकता. ते म्हणजे आयब्रोज जेल… यासाठी जाणून घ्या भुवयांवर कसं वापरावं आयब्रोज जेल
जाणून घ्या आयब्रोज जेल वापरण्याचे फायदे –
आयब्रोज जेलचा एक स्ट्रोक दिल्याने तुमच्या भुवयांना व्हॉल्युम, रंग आणि शेप नक्कीच मिळू शकतो. जर तुमच्या आयब्रोज खूपच पातळ असतील तर आयब्रोज जेल तुमच्यासाठी खूपच फायद्याचं ठरेल. ते तुमच्या भुवयांवर एखाद्या हेअर स्प्रेप्रमाणे काम करतं. आयब्रोजला आकार आणि रंग दिल्यानंतर त्या सेट करण्यासाठी शेवटी तुम्ही आयब्रोज जेलचा नक्कीच वापर करू शकता.
आयब्रोज जेलचे प्रकार –
आयब्रोज जेलचा वापर कसा करायचा हे तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल पण या ब्रोज जेलचे प्रकारही तुम्हाला माहीत असायला हवे.
क्लिअर आयब्रोज जेल –
नावाप्रमाणेच हे एक जेल बेस प्रॉडक्ट असून त्यामध्ये कोणताही रंग नसतो. त्यामुळे जरी तुमच्या भुवयांना रंग देण्याची आवश्यक्ता नसली तरी त्यांना शेप देण्यासाठी तुम्ही हे जेल तुमच्या आय़ब्रोजवर लावू शकता. नो मेकअप लुकसाठी हे आयब्रोज जेल अगदी परफेक्ट ठरेल.
कसा कराल वापर –
- आयब्रो ब्रशने तुमच्या भुवया नीट करा
- जर तुम्हाला दाट भुवयांचा लुक हवा असेल तर त्यांना वरच्या दिशेने वळवा
- त्यानंतर क्लिअर आयब्रोज जेलचा एक स्ट्रोक द्या आणि त्या सेट करा
- अशा आयब्रोजसोबत ट्रान्सफरंट मस्कारादेखील तुम्ही पापण्यांवर लावू शकता.
टिंट आयब्रोज जेल –
भुवयांना रंग आणि शेप देण्यासाठी हे अगदी उत्तम प्रॉडक्ट आहे.
कसा कराल वापर –
- पहिल्यांदा वापर करताना आयब्रोज ब्रशने भुवयांना शेप द्या
- त्यानंतर त्यावर टिंट जेलचा स्ट्रोक द्या.
- आयब्रोज जेलचा कोट संपूर्ण भुवयांवरून पसरवा
- पहिल्यांदा वापरताना खूप कमी प्रॉडक्ट भुवयांवर लावा त्यानंतर गरजेनुसार पुन्हा त्याचा वापर करा. कारण त्याचा गडदपणा किती आहे हे तुम्हाला सरावाने समजू शकते
क्रिम बेस आयब्रोज जेल –
जर तुम्हाला खूप वेळ टिकेल असं एखादे आयब्रोज जेल हवं असेल तर हे प्रॉडक्ट वापरा. कारण यामुळे तुमच्या भुवया बराच वेळ सेट राहू शकतील.
कसा कराल वापर –
- हे प्रॉडक्ट वापरताना ते तुम्हाला हवं तितकंच घ्या
- भुवयांवर ते लावल्यावर त्याने मनाप्रमाणे शेप द्या
आयलायनर कम आयब्रोज जेल –
आयलायनर जेलचा वापर तुम्ही तुमच्या भुवयांना शेप देण्यासाठी करू शकता.
कसा कराल वापर –
- आयब्रोजसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅंगल ब्रशने भुवयांना शेप द्या
- खालून वरच्या दिशेने काही स्ट्रोक द्या
- भुवयांवर जेल लावून झाल्यावर ब्रशच्या मदतीने ते संपू्र्ण भुवयांवर व्यवस्थित पसरवा ज्यामुळे शेप रेखीव दिसेल
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का
सणासुदीला खास दिसायचं असेल तर असा करा ‘आय मेकअप’ (Festive Eye Makeup In Marathi)
डार्क सर्कल दूर करतील अॅलोवेरापासून बनवलेले हे अंडर आय क्रिम