कोविडच्या काळात लग्न करताय, मग मेकअप आर्टिस्ट ठरवताना अशी घ्या काळजी

कोविडच्या काळात लग्न करताय, मग मेकअप आर्टिस्ट ठरवताना अशी घ्या काळजी

लग्न ही प्रत्येकासाठी एक खास गोष्ट असते. शिवाय लग्नात आपण सर्वात बेस्ट दिसावं असं प्रत्येक वधूला वाटत असतं. ब्रायडल मेकअप करण्यासाठी खास कौशल्याची गरज असते. म्हणूनच लग्नात वधूच्या मेकअपसाठी खास ब्रायडल मेकअप आर्टिस्टची निवड केली जाते. मात्र सध्या कोविडच्या काळात जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर तुम्हाला लग्नविधीत अनेक बंधने पाळावी लागणार आहेत. शिवाय तुमच्या लुकसाठी मेकअप आर्टिस्ट अथवा त्यांची टीम ठरवताना सुरक्षाही पाळावीच लागणार  यासाठीच याकाळात लग्नासाठी मेकअप आर्टिस्ट ठरवण्यापूर्वीच त्यांच्याशी या गोष्टींबाबत मोकळेपणा बोला.

कोविडच्या काळात मेकअप आर्टिस्टला विचारण्यासाठी प्रश्न -

Make Up

MyGlamm K.Play Flavoured Lipstick

INR 499 AT MyGlamm

लग्नासाठी मेकअप आर्टिस्ट ठरवण्यापूर्वी थोडा विचार करा आणि रिसर्चही...ज्यामुळे तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळू शकेल. यासाठी कोणताही मेकअप आर्टिस्ट ठरवण्यापूर्वी त्याला हे काही प्रश्न जरूर विचारा.

Instagram

सध्याच्या परिस्थितीत ब्रायडल मेकअप करताना सुरक्षेसाठी ते काय काळजी घेणार ?

कोणताही मेकअप आर्टिस्ट ठरवताना तुमचा हा सर्वात पहिला प्रश्न असायला हवा. कारण तुम्ही त्यांना हायजिनबाबत आणि सुरक्षेबाबत ते काय नियम पाळणार हे आधीच विचारणे गरजेचं आहे. ते मेकअप करताना मास्क, पीपीई किट,ग्लोव्हज, सॅनिटाईज केलेले मेकअप टूल्स वापरणार असतील तरच त्यांना फायनल करा.

ट्रायल सेशन कधी देणार आणि त्यासाठी किती खर्च असेल ?

जरी तुम्हाला मेकअप आर्टिस्टच्या कामावर पूर्ण विश्वास असला तरी लग्नापूर्वी तुमच्या लुकची ट्रायल ही घ्यायलाच हवी. कारण त्यामुळे तुम्हाला  लग्नात नेमका कसा मेकअप हवा हे त्यांना आधीच सांगता येईल. शिवाय यातून ते मेकअप करताना काय काय काळजी घेतात हेही तुम्ही पाहू शकता. पण सध्या या सर्व गोष्टी सोप्या नक्कीच नाहीत. त्यामुळे तुम्हाला  जास्तीचा किती खर्च मोजावा लागेल आणि तो तुमच्या बजेटमध्ये आहे का हे आधीच ठरवून घ्या. 

ब्रायडल मेकअपचे संपूर्ण पॅकेज कितीपर्यंत असेल आणि ते तुम्हाला कस्टमाईज पॅकेज करून देऊ शकतात का ?

तुम्हाला मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टाईलिस्ट वेगवेगळे हाअर करायचे आहे का हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता लग्नात तुमच्या आजूबाजूला कमीत कमी माणसं वावरणं  हेच सुरक्षेचं आहे. यासाठी अधिक लोकांना मेकअपसाठी अपॉईंट करण्यापेक्षा एकाच व्यक्तीला त्याची मेकअप टीम आणि संपूर्ण पॅकेज देणं तुम्हाला सोयीचं पडू शकतं.

मेकअप आणि हेअर स्टाईल करण्यासाठी किती वेळ लागेल ?

सध्या लग्नाची धुमधाम नेहमीपेक्षा कमीच आहे. त्यामुळे लग्नकार्यासाठी बराचवेळ खर्च करणं सोयीचं नाही. त्यामुळे मेकअप आणि हेअरस्टाईलसाठी लग्नात नेमका किती वेळ लागेल हे तुम्हाला माहीत असायला हवं.

लग्नात मेकअपसाठी कोणते मेकअप प्रॉडक्ट वापरले जाणार आहेत ?

तुम्हाला कशाची अॅलर्जी आहे अथवा तुम्हाला कोणते प्रॉडक्ट सूट होतात हे फक्त तुम्हालाच माहीत असतात. त्यामुळे ट्रायल घेतानाच ते कोणते प्रॉडक्ट ब्रायडल मेकअपसाठी वापरणार हे तुम्हाला माहीत असायला हवं.

तुमचं पर्सनल मेकअप किट ते वापरू शकतील का ?

कोरोनाच्या काळात सध्या कोणात्याही वस्तू शेअर करणं सुरक्षेचं नाही. यासाठी शक्य असल्यास मेकअप आर्टिस्टला तुमचा मेकअप बॉक्स अथवा किट वापरण्याची विनंती करा. 

Instagram

एकच व्यक्ती मेकअप करणार की मेकअप आर्टिस्टची टीमही त्यांच्यासोबत असणार ?

कोविडच्या काळात हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असू शकतो. कारण सध्या तुम्हाला कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न करावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या निमंत्रितांना मॅनेज करण्यासाठी मेकअप आर्टिस्टची टीम वाढवून चालणार नाही. 

बूकींग टर्म आणि पेमेंट कसं करावं ?

सध्या सर्वच गोष्टी ऑनलाईन करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे तुम्हाला हव्या असणाऱ्या दिवसाचं बूकिंग कसं करायचं आणि पेमेंटसाठी कोणती पद्धत वापरली जाणार हे तुम्हाला मेकअप आर्टिस्ट बूक करण्यापूर्वीच माहीत असायला हवं.

कॅन्सलेशन पॉलिसी काय असेल ?

जरी तुमच्यासाठी हा अगदी महत्त्वाचा दिवस असला तरी बूकींग प्रमाणेच त्यांच्यी कॅन्सलेशन पॉलिसी काय आहे हे माहीत असणं नेहमीच फायद्याचं ठरेल. कारण त्यामुळे तुम्हाला तुमचा ब्लॅन बी ठरवणं सोपं जाईल. 

 

Beauty

Manish Malhotra Face And Body Highlighter

INR 1,250 AT MyGlamm

अॅक्सेसरीज स्वतःच आणाव्या लागतील का ?

ब्रायडल मेकअपसाठी तुम्हाला विविध अॅक्सेसरीज लागतात. परफेक्ट नेलपॉलिश, फेक आयलॅशेस, साडीपिन्स, ज्वेलरी, हेअर अॅक्सेसरीज  सुरक्षित असाव्यात यासाठी स्वतःच कॅरी करणं योग्य ठरू शकतं. मात्र त्याबाबत तुम्ही आधीच तुमच्या मेकअप आर्टिस्टसोबत बोलून ठेवायला हवं. 

Instagram