हेअर ब्रश करताना केलेल्या काही चुकांचा परिणाम तुमच्या केसांना भोगावा लागू शकतो. कारण चुकीच्या पद्धतीने कंगवा अथवा ब्रश केसांवरून फिरवल्यामुळे केस तुटतात आणि कमजोर होतात. म्हणूनच नेहमी केसांना ब्रश करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. या चुका टाळण्यामुळे तुमच्या केसांमध्ये काहीच दिवसांमध्ये आश्चर्यकारक बदल दिसू लागतील. केसांना फाटे फुटणे , कोंडा आणि केस गळणे थांबवण्यासाठी ही युक्ती फायद्याची ठरेल. यासाठी जाणून घ्या कोणत्या चुका हेअर ब्रशबाबत करणं टाळायला हवं.
केसांना मुळापासून टोकापर्यंत ब्रश करणे –
केस ब्रश करताना बऱ्याच जणी नकळत कंगवा अथवा हेअर ब्रश केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकापर्यंत फिरवतात. ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे. कारण यामुळे केसांमध्ये झालेल्या गुंत्यामध्ये कंगवा अथवा ब्रश अडकतो आणि केस ओढले जातात. ज्यामुळे तुमचे केस अधिक गुंतागुंतीचे होतात आणि तुटू लागतात. यासाठी नेहमी आधी टोकाकडील केसांचा गुंता सोडवा, मग हळू हळू मुळांच्या दिशेने ब्रश फिरवा. ज्यामुळे जोपर्यंत तुम्ही केसांच्या मुळांपर्यंत पोहचाल तुमचे केस मोकळे आणि सुटसुटीत होतील.
Shutterstock
केसांसाठी चुकीचे हेअर टूल्स वापरणे –
तुमच्या केसांच्या प्रकारानुसार केसांसाठी योग्य असे हेअर टूल्स वापरायचे असतात हे तुम्हाला माहीत आहे का ? जसं तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार स्किन केअर प्रॉडक्ट निवडता अगदी तसंच तुम्हाला तुमच्या केसांच्या प्रकारानुसार हेअर टूल्स निवडावे लागतात. केस विंचरण्याठी लागणारे कंगवे, पिन्स, क्लिप्स, हेअर बॅंड आणि हेअर ब्रश यांची रचना निरनिराळ्या केसांच्या प्रकारानुसार केलेली असते. त्यामुळे तुमच्या हेअर टाईपनुसार हे टूल्स निवडा. जसं की फ्रिझी केसांसाठी मोठ्या दातांचा कंगवा, पातळ केसांसाठी सॉफ्ट ब्रश अशी निवड करा.
केस धुण्याआधी केस न विंचरणे –
केसांची निगा राखण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केस धुण्याआधी केस विंचरणे मात्र ही स्टेप अनेक जण विसरतात. कारण यामुळे तुमच्या केसांमध्ये गुंता होतो आणि केस धुताना केस मोठ्या प्रमाणावर गळतात. यासाठी केस धुण्यापूर्वी केसांवर ब्रश फिरवा ज्यामुळे केसांचा गुंता सुटेल आणि केस व्यवस्थित धुता येतील.
Shutterstock
केस जास्त प्रमाणात विंचरणे अथवा मुळीच न विंचरणे –
सध्या बिची वेव्हज या हेअर स्टाईलचा ट्रेंड आहे. ज्यामुळे असा लुक करण्यासाठी बऱ्याचदा केस न विंचरणे हा पर्याय निवडण्यात येतो. मात्र असं केल्यामुळे तुमच्या केसांमधील गुंता अधिक वाढतो आणि केस निस्तेज दिसतात. कारण ब्रश केल्यामुळे तुमच्या केसांच्या मुळांमधील रक्ताभिसरण सुधारत असतं. शिवाय काही जणं सतत केसांना ब्रश करतात त्यामुळेही केसांचे नुकसान होऊ शकतं. यासाठीच दिवसभरात फक्त एक ते दोन वेळा हेअर ब्रश करणं योग्य ठरेल. त्यामुळे कधीतरी अशी स्टाईल करणं योग्य आहे मात्र नियमित केस विंचरणे हाच योग्य मार्ग आहे.
हेअर ब्रश स्वच्छ न करणे –
हेअर ब्रश अथवा कंगवा वेळच्या वेळी स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. कारण यामुळे तुमच्या केसांमध्ये इनफेक्शन होण्याचा धोका कमी होतो. केस आणि स्काल्पच्या आरोग्यासाठी ही एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुमच्या केसांमधून कंगवा अथवा हेअर ब्रशला तेल लागत असतं. बाहेरील धुळ आणि प्रदूषण त्यावर चिकटून हेअर ब्रशवर बॅक्टेरिआ निर्माण होऊ शकतात. यासाठी हेअर ब्रश स्वच्छ ठेवा.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
रविना टंडन केसांची निगा राखण्यासाठी करते ‘हा’ घरगुती उपाय