आपले ओठ मऊ आणि मुलायम असावे असं कुणाला वाटत नाही. पण जेव्हा त्वचेची निगा राखण्याची वेळ येते तेव्हा नकळत ओठांकडे थोडं दुर्लक्ष केलं जातं. जेव्हा थंडीत ओठ फुटतात, कोरडे होतात तेव्हा अचानक आपल्याला जाग येते आणि मग आपण लगेचच एखादं लिप बाम ओठांवर फिरवू लागतो. कधी कधी फुटलेल्या ओठांमधून रक्त येणं, वेदनाही जाणवतात. यासाठीच शरीरावरील इतर त्वचेप्रमाणेच ओठांचीदेखील खास काळजी घेणं आवश्यक आहे. एकतर ओठांवर घाम येत नाही. कारण ओठांच्या त्वचेखाली घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथी नसतात. त्यामुळे ते कोरडे होतात आणि सुकून त्वचेचे पापूद्रे निघू लागतात. यासाठीच ओठांची काळजी कशी घ्यावी हे प्रत्येकाला माहीत असायला हवं.
Shutterstock
ओठ एक्सफोलिएट करा –
ओठांना एक्सफोलिएट करण्यासाठी तुम्ही एखादं चांगलं लिप स्क्रब अथवा लिप मास्क वापरू शकता. लिप स्क्रबचा ओठांवर लगेच चांगला परिणाम दिसू लागेल तर लिप मास्कमुळे ओठांवरील डेड स्किन निघण्यास थोडा वेळ लागेल. तुम्हाला जर घरगुती आणि नैसर्गिक उपाय करणं आवडत असेल तर तुम्ही मध. साखर, वॅनिला इसेन्सचा वापर करून घरीच हे स्क्रब तयार करू शकता. ओठांवर लिप स्क्रब लावा आणि टूथब्रशने ओठ स्वच्छ करा. यासाठी ओठांवर हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करा. ज्यामुळे तुमच्या ओठांखालील त्वचेचं रक्ताभिसरण सुधारेल आणि ओठांवरील डेड स्किन निघून जाईल.
नियमित लिप बाम वापरा –
ओठांना स्वच्छ आणि डेड स्किनपासून फ्री ठेवण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करता. मात्र तुम्ही जवळून तुमचे ओठ पाहिले तर ते कोरडे आणि डिहायड्रेटेड दिसतात. यासाठी आजच चांगल्या दर्जाचं लिप बाम खरेदी करा. असं लिप बाम ज्यामुळे तुमच्या ओठांना आराम मिळेल आणि ते ओलसर राहतील.
ओठांवर लिप ऑईल लावा –
ओठांची काळजी घेण्यासाठी हा उपाय तुम्ही आजवर नक्कीच केला नसेल. ओठांना मऊ आणि मुलायम केल्यावर जेव्हा तुम्ही लिप बाम लावाल त्यावर एखाद्या चांगल्या लिप ऑईलचा कोट द्या. ज्यामुळे तुमच्या ओठांमधील मऊपणा, मॉईस्चर लॉक होईल. शिवाय या लिप ऑईलच्या ग्लॉसी टेक्चरमुळे तुमचे ओठ प्लम आणि ज्युसी वाटू लागतील. जर तुमच्याकडे लिप ऑईल नसेल तर काळजी करू नका यासाठी तुम्ही तुमच्या घरातील नारळाचे तेल, जोजोबा ऑईल अथवा रोझशिप ऑईलही वापरू शकता. तुम्ही जसं तुमच्या त्वचेसाठी या तेलांचा वापर करता अगदी तसाच आता ओठांसाठी करायचा आहे. ज्यामुळे तुमच्या इतर त्वचेप्रमाणे ओठही मऊ आणि मुलायम होतील.
या महत्त्वाच्या टिप्ससोबत ओठांची काळजी घेण्यासाठी भरपूर पाणी प्या ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहिल, धुम्रपान टाळा, ओठ फुटणार नाहीत याची काळजी घ्या. कारण तुमचे ओठ फुटणं हे फक्त तुमचे ओठ कोरडे असण्याचं एक लक्षण नाही तर तुमचे शरीर डिहायड्रेट असण्याचा एक संकेतही आहे. आपल्या शरीराला शारीरिक कार्य सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पुरेशा पाण्याची गरज असते. जेव्हा ही पाण्याची पातळी कमी होते तेव्हा शरीर असे संकेत देऊ लागतं. जेव्हा तुम्ही बाहेरून आल्यावर मेकअप आणि लिपस्टिक काढाल तेव्हा या टिप्स फॉलो करण्यास विसरू नका. कारण जर तुमची लिपस्टिक मॅट फिनिशची असेल तर तुमचे ओठ त्यात वापरण्यात आलेल्या घटकांमुळे कोरडे होतात. काही वेळा तुम्ही यासाठी लिप स्क्रब वापरणंल वगळू शकता मात्र लिप बाम आणि लिप ऑईल वापरण्यास मुळीच दुलर्क्ष करू नका. कारण या दोन स्किन केअर मुळे तुमचे ओठ नियमित मऊ आणि मुलायम राहतील.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
15 दिवसात मिळेल चमकदार त्वचा,अशी घ्या काळजी
कोणत्याही ब्युटी प्रॉडक्टशिवाय दिसा सुंदर, जीवनशैलीत करा असे बदल