ADVERTISEMENT
home / Fitness
डिटॉक्ससाठी असा करा अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर

डिटॉक्ससाठी असा करा अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर

शरीर शुद्धीकरण अर्थात Detox करण्याचा विचार करत असाल तर आजचा विषय तुमच्यासाठी फार खास आहे. डिटॉक्स करण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. पण काही जण अॅपल सायडरचा उपयोग करुन डिटॉक्स करतात. दोन-चार दिवस तुमचंही खूप बाहेरचं खाणं झालं आहे. एक ते दोन दिवस पोटाला आराम देऊन तुम्हाला डिटॉक्स करायचे असेल आणि तुमच्या घरी अॅपल सायडर व्हिनेगर असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने अॅपल सायडरचा उपयोग डिटॉक्ससाठी करु शकता. चला जाणून घेऊया कसा करायचा याचा वापर

वजन कमी करण्यासाठी आहारात करा अळीवचा समावेश

कधी कराल डिटॉक्स

तुम्ही डाएट करत असाल किंवा नाही पण डिटॉक्स हे कोणीही करु शकते. आपण वेगवेगळे पदार्थ आठवड्याभरात खात असतो. पण बरेचदा असे होते की, लागोपाठ काही दिवस बाहेरचे पदार्थ खाल्ले जातात. किंवा सणसमारंभाच्या काळात तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ले जाते. 3 दिवस लागोपाठ तुम्ही असे खाद्यपदार्थ खात असाल तर त्यानंतर एक दिवस तरी तुम्ही पोटाला आराम द्यायला हवे. हा आराम देणारा दिवस म्हणजे ‘डिटॉक्स’ दिवस. तुम्ही कधीही डिटॉक्स करु शकत नाही. तुम्ही सतत काही दिवस बाहेरचे आणि जड पदार्थ खाल्ले नसतील तर तुम्ही उगाचच उपाशी राहून डिटॉक्स करायला जाऊ नका. जर तुम्हाला दिवसातून एकदा डिटॉक्स करायचे असेल तरी देखील तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचा उपयोग करुन डिटॉक्स करु शकता. 

वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करा ‘कमळकाकडी’चा

ADVERTISEMENT

अॅपल सायडर व्हिनेगरच्या मदतीने असे करा डिटॉक्स

अॅपल सायडर व्हिनेगरचा वापर

Instagram

  1. लेमन- अॅपल सायडर व्हिनेगर डिटॉक्स: एका ग्लासमध्ये एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर आणि 1 मोठा चमचा लिंबाचा रस घ्या. त्यामध्ये एक ग्लासभर कोमट पाणी घाला. तयार डिटॉक्स वॉटर तुम्ही दिवसभरात कधीही पिऊ शकता. 
  2. जिंजर- दालचिनी-अॅपल सायडर व्हिनेगर डिटॉक्स: अॅपल सायडर व्हिनेगरसोबत दालचिनी आणि आलं घालूनही तुम्हाला डिटॉक्सचे पाणी तयार करता येते. दालचिनी- आलं यामधील पाचक गुणधर्म तुमच्या आतड्यांना स्वच्छ करण्याचे काम करते. 
  3. अॅपल सायडर- मध डिटॉक्स:  अॅपल सायडर व्हिनेगरहे खूप कडू असते. ते पटकन पिता येत नाही. मधाचा उपयोग करुनही तुम्ही हे डिटॉक्स करु शकता. याची चवही चांगली लागते. 
  4. आलं- अॅपल सायडर व्हिनेगर डिटॉक्स: अनेक जणं आल्याच्या पाण्याचे रोज सेवन करतात. शरीरातून मल बाहेर काढण्यासाठी आलं अगदी उत्तम असते. अॅपल सायडर व्हिनेगरसोबत आलं हे एक उत्तम  डिटॉक्स आहे. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनेही ते पिऊ शकता. 

लिक्विड डाएटच्या मदतीने महिन्याभरात करा वजन कमी

या गोष्टींची घ्या काळजी

डिटॉक्स हे वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. म्हणजे काही जण दिवसाच्या शेवटी म्हणजे सगळी जेवणं झाल्यावरही तुम्हाला ते करता येते. काही जण सलग जड किंवा भरपूर जेवणानंतर एक ते दोन दिवस सलग डिटॉक्स करतात त्यावेळी ते अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा डिटॉक्स वॉचर घेतात. आता तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि शरीरानुसार त्याची निवड करा. 

ADVERTISEMENT

घरी असलेल्या अॅपल सायडर व्हिनेगरचा असा उपयोग करा. 

13 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT