असे बरेच ड्रेस असतात जे आपल्याला वाटतं की, केवळ बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल्स घालू शकतात. त्यापैकीच एक आहे बॉडीकॉन ड्रेस. पण असं अजिबात नाही. फिटेड आणि बॉडी हगिंग सिल्युएटमुळे आपल्याला बॉडीकॉन ड्रेस वापरता येणार नाही असंच बऱ्याच जणींना वाटतं. यासाठी अगदी परफेक्ट फिगर हवी अथवा उंची हवी असंही बऱ्याच जणींना वाटतं. पण असं अजिबात नाही. तुम्हीही बॉडीकॉन ड्रेस नक्कीच वापरू शकता. बॉडीकॉन ड्रेस घालण्याच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. तुमचे हेच गैरसमज दूर करण्यसाठी आम्ही काही टिप्स तुम्हाला देणार आहोत.
नेहमी चांगले आणि जाडसर फॅब्रिक निवडा
बॉडीकॉन ड्रेसेसमध्ये फॅशनमध्ये बऱ्याचदा डिझास्टर फॅशनचा धोका असतो कारण हे अगदीच शरीराला चिकटणारे कपडे असतात. त्यामुळे या ड्रेसमधून पँटीलाईन, निपल्स अथवा ब्रा चा आकार दिसावा असं तुम्हाला नक्कीच वाटणार नाही. त्यामुळे यासाठी योग्य इनरवेअर निवडणे जितके गरजेचे आहे तितकेच जाडसर फॅब्रिकचा बॉडीकॉन ड्रेस निवडणेही गरजेचे आहे. जर्सी अथवा पॉलिस्टर असे कापड सहसा निवडू नका कारण यातून सहज तुमच्या शरीराचा आकार दिसणार. तसंच तुम्हाला हे सतत खाली खाली ओढत राहावे लागणार. रिब्ड पॅटर्न आणि पॅनलिंग सारखे डिटेल्स तुम्हाला अशा तऱ्हेच्या ड्रेसमध्ये पॉलिश्ड, नीट आणि स्ट्रक्चर्ड लुक देतात. यावर तुम्ही मिनिमल मेकअप केला आणि लिपस्टिक लावली की तुमचा लुक परफेक्ट होतो. त्यासाठी तुम्ही MyGlamm ची उत्पादने नक्की वापरू शकता.
शेपवेअरचा नक्की करा वापर
Shutterstock
जसे आपले शरीर आहे तसे बॉडीकॉन ड्रेसमधून दिसते. पण तुमचे पोट जरादेखील मोठे असेल तरीही तुम्ही त्यावर शेपवेअर हा उत्तम उपाय करू शकता. शेपिंग अंडरवेअर केवळ तुमच्या बल्जेजना कन्सील करायचं काम करत नाही तर पँटीलाईन्स लपविण्याचेही काम करते. शेपवेअरचा वापर केल्यास बॉडीकॉन ड्रेसचा लुक अधिक उठावदार दिसतो. हे तुमच्या लुकला अधिक उठावदार दाखविण्याचे काम करते.
उत्कृष्ट फिचर करा हायलाईट
बॉडीकॉन ड्रेस जरी तुमच्या शरीराला चिकटून बसत असतील तरीही तुमचे कर्व्हेज दाखविण्यासाठी हा उत्तम फॅशनेबल ड्रेस आहे. तसंच आपल्या शरीराचा उत्कृष्ट आणि चांगले फिचर्स दाखविण्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे. जसे तुमची मान आणि खांद्याचा भाग तुमच्या दृष्टीने चांगला असेल तर एक स्ट्रॅपलेस, हॉल्टरनेक अथवा प्लंजिंग नेकलाईनवाला बॉडीकॉन ड्रेस तुमच्या हाडांना आणि सुंदर मानेला अधिक सुंदर दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतो. तुम्ही जर तुमचे सुंदर पाय दाखवू इच्छित असाल तर एखादा शॉर्ट बॉडीकॉन घालणं सोयीस्कर आहे.
लेअर करा
तुम्हाला जर वाटत असेल की, नुसता बॉडीकॉन ड्रेस घालणं हे बोअरिंग आहे अथवा तुम्ही नुसता बॉडीकॉन घालण्यामध्ये कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही लेअरदेखील करू शकता. हा घालण्याचा एक सोपी पद्धतही आहे. तुम्ही हा जॅकेट्सपासून ते फ्लोई श्रग्ज अथवा ट्रेंच कोट्स अशा कपड्यांसह लेअर करू शकता. ओव्हरसाईज्ड डेनिम जॅकेटसह बॉडीकॉन ड्रेस पेअर करणे एक चांगला उपाय आहे. तसंच हे लेअरिंग अधिक चांगले शोभून दिसते. लेअरिंगसाठी तुम्ही शिअर फॅब्रिक कापड निवडा.
हिल्ससह घाला
असा नियम नाही. मात्र बॉडीकॉन ड्रेससह हिल्स घातले तर अधिक आकर्षक लुक दिसतो. अधिक चांगली फॅशन, ग्लॅमर आणि अधिक आकर्षक लुक हवा असेल तर हिल्स घालयला हवे. असं नाही की तुम्ही अगदी उंच टाचांचे अथवा पेन्सिल हिल्सच घालायला हवेत. तुम्ही ब्लॉक, किटेन अथवा वेज कोणतीही हिल्सची स्टाईल निवडू शकता. फ्लॅट्स चप्पलसह बॉडीकॉन ड्रेस चांगला वाटत नाही.
योग्य दागिन्यांची निवड करा
आपण घातलेल्या बॉडीकॉन ड्रेसवर तुम्ही ओव्हर एक्सेसरीज अर्थात जास्त दागिने घातले तर त्याचा पूर्ण लुक खराब होऊ शकतो. त्यामुळे बॉडीकॉन ड्रेस घातल्यावर तुमचा ड्रेस आणि त्यामध्ये तुम्ही आकर्षक दिसणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही जर ऑफ शोल्डर अथवा क्लोज्ड नेक ड्रेस घालणार असाल तर चोकर अथवा गळ्यासह असणारे नेकलेस घाला. अथवा लहान डँगलर्स अथवा हुप्सदेखील घालू शकता. यासह घड्याळ आणि क्लच इतकंच बस झालं.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक