ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
Bralette म्हणजे काय माहीत आहे का? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

Bralette म्हणजे काय माहीत आहे का? जाणून घ्या वापरण्याची योग्य पद्धत

फॅशन दर दिवसाला बदलत असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण काही फॅशन अशी असते जी किमान काही महिने किंवा वर्ष टिकून राहते. वेस्टर्नवेअरसोबतच ट्रे़डिशनलवेअरमध्ये वेगवेगळी फॅशन पाहायला मिळते. स्ट्रेट फिट पँट, पलाझो पँट, डीप नेक टॉप, सिंग्लेट टॉप, फ्लेअर्ड हँड्स यासोबतच सध्या bralette हा प्रकार अगदी हमखास पाहायला मिळत आहे. हो बांगडी तुम्ही ऐकत आहात ते अगदी खरं आहे. त्यामुळे तुम्हाला या बद्दल माहीत असायला हवे.

Bralette म्हणजे काय (What Is A Bralette)

Instagram

ADVERTISEMENT

जर तुम्ही आतापर्यंत bralette म्हणजे काय ते माहीत नसेल तर ते तुम्हाला माहीत हवे. ब्रालेट हे तुमच्या ब्रा पेक्षा मोठे असते. त्यामुळेच त्याचा उपयोग टॉप म्हणून करतात. त्यामध्ये इतके वेगळे प्रकार असतात की, तुम्हाला तुमच्या कोणत्याही वेअरवर त्याची फॅशन करता येते. सध्या ब्रालेटची फॅशन इन असून तुम्ही जर ती आतापर्यंत bralette घातली नसेल तर तुम्ही त्याचा वापर करु शकता.

बाजारात मिळतात वेगवेगळ्या पॅटर्नच्या Bralette (Pattern Of Bralette)

आता तुम्ही bralette घालण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या bralette बद्दलही अधिक माहिती असायला हवी. जर तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्नच्या ब्रालेट कळल्या तर तुम्हाला तुमच्या आऊटफिटनुसार ते निवडायला सोपे जाईल. जाणून घेऊया ब्रालेटचे वेगवेगळे पॅटर्न 

ओव्हरसाईज टी-शर्टने असा करा स्टायलिश लुक

ADVERTISEMENT

1. हाय नेक (High Neck Bralette)

Instagram

हायनेक ब्रालेट हा प्रकार गळ्यालगत असतो. यामध्ये फुल कव्हरेज असतो. त्यामुळे याचा भाग पुढील भाग हा पूर्ण भरलेला असतो. त्यामुळेच त्याला हायनेक ब्रालेट असे म्हणतात. हायनेक ब्रालेटमध्येही तुम्हाला विविधता मिळते. जर तुम्हाला डीप नेक घालायचा नसेल त्यावेळी तुम्हाला हाय नेक ब्रालेट घालता येईल. 

2. रेसर बॅक (Racerback Bralette)

ADVERTISEMENT

Instagram

आता जर तुम्हाला स्पोर्ट्स लुक आवडत असेल तर तुमच्यासाठी रेसर बॅक हा प्रकार चांगला आहे किंवा काहींसाठी फ्रंट नेकपेक्षा बॅक नेक हा फारच महत्वाचा असतो, अशावेळी तुम्हाला रेसर बॅकचा पर्याय निवडता येईल. यामध्ये तुम्हाला टी बॅक किंवा असे काही पर्याय मिळतात. 

3. फ्लोरल लेस (Floral Lace Bralette)

Instagram

ADVERTISEMENT

अनेकांना ब्रामध्ये फ्लोरल डिझाईन आणि लेस पॅटर्न आवडतात. अशा पॅटर्नमध्ये तुम्हाला ब्रालेट मिळू शकतात. हा पॅटर्न दिसायलाही एकदम सेक्सी दिसतो.

4. हॉल्टर नेक (Halter Neck Bralette)

Instagram

ब्रालेटमध्ये हॉल्टर नेक असा पर्यायदेखील मिळतो. हॉल्टरनेकमध्ये तुम्हाला गळ्याभोवती पट्टा बांधायचा असतो. तुम्हाला हुक किंवा गाठ मारण्याची दोन्ही सोय यामध्ये मिळते.हा ब्रालेटचा प्रकार सेक्सी असल्यामुळे तुम्हाला हा पार्टी किंवा मस्त आऊटींगसाठी वापरता येऊ शकतो.

ADVERTISEMENT

5. ट्रँगल शेप (Triangle Shape Bralette)

Instagram

ट्रँगल शेप ब्रालेट या हॉल्टरनेकपेक्षा थोड्आ वेगळ्या असतात. याचा आकार पुढच्या बाजूने वेगळा असतो. आता यामध्ये समोरचा भाग जास्त ओपन असतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्या ठिकाणी या ब्रालेट घालता येत नाहीत. तर काही खास ठिकाणीच तुम्ही या ब्रालेट घालू शकता. जर तुमच्या स्तनांचा आकार मोठा असेल तर तुम्हाला या प्रकारच्या ब्रालेट या तुमच्या ब्रा प्रमाणे वाटून शकतात.

अशा प्रकारे तुम्हाला घालता येईल ब्रालेट (Ideas To Wear Bralette)

Bralette चे प्रकार जाणून घेतल्यानंतर तुम्हाला त्या नक्की ट्राय करायची  इच्छा झाली असेल. पण तुम्हाला ब्रालेट कोणत्या कपड्यांवर आणि कशी घालायला हवी. त्याची फॅशन कशी करायला हवी हे तुम्हाला माहीत हवे. म्हणूनच तुमच्या कामांच्या स्वरुपांनुसार किंवा तुमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांनुसार तुम्ही ते घालू शकता. म्हणून तुमच्या bralette घालण्यासाठीच्या या आयडियाज

ADVERTISEMENT

1. ऑफिसवेअर ब्रालेट (Officewear)

आता जर तुम्ही ऑफिसवेअरचा विचार करत असाल तर तुम्हाला खूप ट्रान्सफरंट आणि रंगीबेरंगी ब्रालेट घालता येणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला थोड्या जाड असा ब्रालेट वापरणे योग्य असते. जर तुम्ही ऑफिसमध्ये ब्रालेट घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हायनेक किंवा कमी क्लीवेज दाखवणाऱ्या ट्रँगल ब्रालेट निवडा. ब्रालेट घालत असाल तर तुम्ही त्यावर जॅकेट घालणेही गरजेचेआहे. जर तुम्हाला सतत क्लायंटला भेटायचे असेल. तुम्ही सतत मिटींगमध्ये असाल तर समोरच्याला तुमच्या फॅशनमुळे अडथळा यायला नको याची काळजी घेत ही फॅशन केली पाहिजे. पाहा ब्रालेटचे हे खास लुक

लुक 1 (Look 1)

Instagram

हल्ली मोठ्या बॉटमची पँट फॅशन इन आहे. जर तुमची उंची चांगली असेल आणि तुम्ही अशाप्रकारच्या पँट घालत असाल तर तुम्हाला अशा प्रकारची फॅशन करता येईल. तुम्ही लाँग पँट घालणार असाल तर त्यावर सिंग्लेट ब्रालेट घाला. त्याची उंची थोडी लांब असू द्या.

ADVERTISEMENT

लुक 2 (Look 2)

Instagram

हल्ली लेडी बॉस फॅशनही खूप चालते. तुम्हाला ऑफिसमध्ये थोडे वेगळे दिसायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ड्रेसिंग करु शकता. आता यात पिंक जॅकेट आणि पिंक पँट घातली असून आत काळ्या रंगाचे ब्रालेट घातले आहे.

लुक 3 (Look 3)

ADVERTISEMENT

Instagram

जर तुम्ही ऑफिसला जमसुट घालणार असाल तर बरेचदा ते फारच साधे दिसतात. अशावेळी तुम्ही जर या आतमध्ये ब्रालेट घातली तर तुमचे ड्रेस अधिक खुलून दिसेल. त्यामुळे तुम्हाला यावर हायनेक ब्रालेट घालायला काहीच हरकत नाही.

लुक 4 (Look 4)

Instagram

ADVERTISEMENT

हल्ली ऑफिसला जाण्यासाठी काहीतरी प्लेनच घालायला हवे असे काही राहिले नाही. तुम्ही अगदी आरामात प्रिंटेट कपडे घालू शकता. त्यापैकीच एक प्रकार आहे तो म्हणजे अॅनिमल प्रिंटेट पँट. आता त्यावर तुम्हाला थोडा जास्त ट्रेंडी लुक देताना ब्रालेट घालता येऊ शकेल.

लुक 5 (Look 5)

Instagram

पांढरा रंग हा सगळ्यांवरच चांगला दिसतो. ऑफिससाठी काही तरी लेसी घालायचा तुमचा विचार असेल तर तुम्हाला अगदी आरामात अशाप्रकारची स्टाईल करता येईल. 

ADVERTISEMENT

2. पार्टीवेअर (Party Wear)

आता जर तुम्हाला पार्टीसाठीकाही घालायचे असेल तर तुमच्यासाठी ब्रालेट या एकदम परफेक्ट आहेत. कारण तुम्हाला हवे असलेले सेक्सी प्रकार यामध्ये अगदी हमखास मिळू शकतात. विशेष म्हणजे तुम्ही हॉल्टर नेक, डीप नेक, रेसर बॅक असे सगळे प्रकार यामध्ये ट्राय करु शकता. आता पार्टी वेअरचा विचार करता तुम्हाला रंगाचाही फार विचार करावा लागत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी बिनधास्त फॅशन करु शकता. नॅरो बॉटम पँट, टाईट स्कर्ट, लो वेस्ट स्कर्ट अशा कोणत्याही पॅटर्नवर तुम्हाला या ब्रालेट चांगल्या दिसू शकतात.

लुक 1 (Look 1)

Instagram

पार्टीसाठी काळा रंग हा नेहमीच बेस्ट असतो. त्यातच तुम्हाला काही सेक्सी आऊटफिट हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ब्रालेट घालायला काहीच हरकत नाही.

ADVERTISEMENT

लुक 2 (Look 2)

Instagram

जर तुम्ही काहीतरी पांढरे घालण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे काही घालायला काहीच हरकत नाही. त्यामुळे तुम्ही पांढऱ्या रंगाची लेसी ब्रालेट वापरुन अशी स्टाईल करु शकता. तुमचा एखादा ट्रान्सफरंट टॉप तुम्ही यासाठी वापरु शकता.

लुक 3 (Look 3)

ADVERTISEMENT

Instagram

तुम्हाला पार्टीला सॅटीन मटेरिअलमध्ये काही घालायचे असेल तर मग तुम्ही अगदी हमखास हे घालू शकता. तुम्हाला तुमच्या सॅटीन पातळ ड्रेसवर ब्रालेट घालता येईल. तुम्ही त्यावर मॅचिंग किंवा वेगळ्या रंगाचे ब्रालेट घालू शकता.

लुक 4 (Look 4)

Instagram

ADVERTISEMENT

तुम्हाला जर फ्रंट पॅटर्नममध्ये काहीतरी काही हवे असेल तर तुम्ही तुमच्या ब्रालेटचा उपयोग अशापद्धतीने करु शकता. लेसी पॅटर्न असलेला ड्रेसवर तुम्हाला या ब्रालेट वापरता येतील.

लुक 5 (Look 5)

Instagram

पार्टीसाठी लाल रंगसुद्धा चांगला दिसतो. स्लीट स्कर्ट तर अगदी यातली हमखास फॅशन आहे. तुम्हाला तुमच्या स्लीट स्कर्ट ड्रेसवर तेच तेच घालून कंटाळा आला असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या  ब्रालेट घालता येतील.

ADVERTISEMENT

3. कॅज्युअल वेअर (Casual Wear)

आता जर तुम्ही इतरवेळी कधीही ब्रालेट घालायचा विचार करत असाल तर मग तुम्ही इतरवेळीही अशा प्रकारच्या ब्रालेट घालू शकता. ट्रँगल शेप,हॉल्टर नेक अशा प्रकारच्या ब्रालेट तुम्ही घालू शकता. तुम्हाला तुमच्या कॅज्युअलवेअरला थोडा ट्रेंडी लुक यामध्ये देता येईल. तुम्ही जीन्स किंवा एखादा स्कर्ट घातला असेल तर तुम्ही क्रॉप टॉप म्हणून याचा वापर करु शकता.

लुक 1 (Look 1)

Instagram

 हल्ली लुझ शर्टची फॅशन असून त्यांचा लुक वाढवण्याचे काम ब्रालेट करते. आता हे अगदी साधे ब्रालेट आहे. पण  ते तुमचा लुक नक्कीच खुलवू शकते.

ADVERTISEMENT

लुक 2 (Look 2)

Instagram

जीन्सच्या जॅकेटच्या आतमध्ये तुम्ही अशापद्धतीने लेस ब्रालेट वापरु शकता. तुम्हालाही एखाद्यावेळी अशी ब्रालेट घालता येईल. तुम्ही यामध्ये जितकं कलरफुल ट्राय कराल तितकं ते तुम्हाला अधिक चांगलं दिसेल.

लुक 3 (Look 3)

ADVERTISEMENT

Instagram

 पलाझो पँट आणि लुझ पँटसवर तुम्ही अशा टाईट ब्रालेट घातल्या तर चांगल्या दिसू शकतात. तुम्हाला वेगवेगळ्या मटेरिअलचे ब्रालेट मिळतात त्याचा तुम्हाला उपयोग करता येऊ शकतो. तुम्ही देखील असे नक्की ट्राय करुन पाहा.

लुक 4 (Look 4)

Instagram

ADVERTISEMENT

तुम्हाला अगदीच काही वेगळं काही करायचं असेल तर ही फॅशनही तुमच्यासाठी बेस्ट आहे. हल्ली अनेकांना स्कर्ट घालायला आवडते. त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करा. 

लुक 5 (Look 5)

Instagram

तुम्ही कॉलेज गोईंग असाल तर तुम्हाला असे काही नक्की ट्राय करायला हवे. वेगवेगळ्या रंगाच्या ब्रालेट घालून तुम्ही जीन्स आणि शर्ट असे कपडे घालू शकता. 

ADVERTISEMENT

4. फ्युजन वेअर (Fusion Wear)

हल्ली फ्युजन कपडे घालण्याचा एक ट्रेंड आहे. म्हणजे तुम्ही कितीही शॉर्ट आणि हॉट टॉप घातला असेल तर त्याखाली एखादे ट्रेडिशनल कपडे घालू शकता. साडी हा असा पर्याय आहे ज्यावर प्रत्येकाला सेक्सी ब्लाऊज घालायला आवडतात.अशावेळी फ्युजन करताना तुम्हाला ब्रालेट घालता येईल. शिवाय हल्ली जॅकेट घालायची फॅशन आहे. म्हणजे एखाद्या ट्रेडिशनल लांब जॅकेटच्या आत तुम्ही ब्रालेट घालू शकता.

लुक 1 (Look 1)

Instagram

सणासुदीच्या दिवसात काहीतरी वेगळं घालायला अनेकदा आवडतं. मुलींकडे एकतरी शरारा किंवा लेहंगा असतो. पण त्यावर ब्लाऊजची व्हरायटी आणायची असेल तर मग तुम्हाला अगदी आरामात असे काही तरी करता येईल.

ADVERTISEMENT

लुक 2 (Look 2)

Instagram

तुमच्या स्कर्टवर घालता येईल असा हा ब्रालेटचा दुसरा पॅटर्न आहे. हायनेक ब्रालेट असल्यामुळे तुम्हाला ती अगदी कधीही कोणत्याहीवेळी घालता येऊ शकेल.

लुक 3 (Look 3)

ADVERTISEMENT

Instagram

या फोटोमध्ये तुम्हाला सॅटीनचा स्कर्ट दिसेल या स्कर्टवर तुम्हाला अशा फॅन्सी ब्रालेट अगदी हमखास घालता येतील. यावर तुम्ही ओढणी घेतली तर ती अधिक चांगली दिसू शकेल.

लुक 4 (Look 4)

Instagram

ADVERTISEMENT

साडी ही कधीच फॅशन बाहेर जाऊ शकत नाही. पण साडीवर चांगला ब्लाऊज हवा असेल तर तुम्हाला ब्रालेटही वापारायला हरकत नाही. कारण या ब्रालेट नेहमीच चांगल्या दिसतात. शिवाय तुम्हाला एक चांगला लुक यामुळे मिळू शकतो.

तुमच्या शरीरयष्टीनुसार निवडाल कपडे तर तुम्ही नेहमीच दिसाल सुंदर 

लुक 5 (Look 5)

Instagram

ADVERTISEMENT

एखादा टॉप तुम्हाला अगदीच उघडा वाटत असेल किंवा तुम्हाला क्लीवेज दिसत आहे असे वाटत असेल तर मग तुम्ही असे काही तरी ट्राय करायला हरकत नाही. हा टॉप समर वाईब्स देणारा असला तरी त्या आतमध्ये ब्रालेट घातल्यामुळे त्याचा लुक बदलला आहे. 

5. व्हॅकेशन वेअर (Vacation Wear)

मस्त बीच किंवा तुम्ही एखाद्या व्हेकेशनला जाणार असाल तर तुम्हाला हमखास घालायला हवेत. तुम्ही शॉर्टस किंवा एखाद्या स्लीट स्कर्ट्सवर तुम्ही अशा प्रकारचे ब्रालेट घालू शकता जे तुम्हाला चांगले  दिसू शकतात. उदा. गोवा किंवा बीचसाईडसाठी हा उत्तम पर्याय आहे.  

लुक 1 (Look 1)

Instagram

ADVERTISEMENT

गोवा किंवा बीच अशा ठिकाणी जाताना तुमचे कपडे कुल असायला हवे. अशावेळी तुम्ही वेगळ्या प्रकारच्या जीन्स घालता म्हणजे बॉयफ्रेंड किंवा अशा जीन्सवर तुम्ही असे ब्रालेट घालू शकता.

लुक 2 (Look 2)

Instagram

बाहेर गेल्यानंतर तंग कपड्यांपेक्षा काहीतरी सैल घालावेसे वाटते. पण असे कपडे घालत असताना तुम्हाला अगदीच सैल कपडे घालून चालत नाही. म्हणजे तुम्ही पलाझो पँटस घालत असाल तर त्यावर तुम्ही अशा ब्रालेट घालू शकता.

ADVERTISEMENT

लुक 3 (Look 3)

Instagram

बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कलरफुल किंवा फ्रेश असे काही घालायचे असेल तर ब्रालेटमधील असा प्रकार तुम्ही नक्की गालू शकता. लोकरीपासून तयार झालेले असे ब्रालेट तुम्ही नक्की घालू शकता.

लुक 4 (Look 4)

ADVERTISEMENT

Instagram

हल्ली ब्रालेट पॅटर्नमध्ये ड्रेस अगदी सहज मिळतात. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे ब्रालेट ड्रेस निवडून घालू शकता. पण अशावेळी तुम्ही लांब ब्रालेट निवडू शकता.

लुक 5 (Look 5)

Instagram

ADVERTISEMENT

ट्रँगल शेप ब्रालेट अनेकांना आवडतात. शॉर्ट स्कर्टवर ते चांगले दिसतात. तुम्हाला या मध्ये अनेक पॅटर्न मिळू शकतील त्यामुळे तुम्ही हे नक्की ट्राय करायला हवे.

तुम्हाला पडले आहेत का प्रश्न (FAQ’S)

1. ब्रा आणि ब्रालेटमध्ये काय फरक आहे? (What is difference between bralette and bra?)

ब्रा ही तुम्हाला इनरवेअर म्हणूनच वापरता येतात. तर ब्रालेट तुम्हाला दाखवता येतात. ब्रा आणि ब्रालेटच्या आकारामध्ये ही फरक असतो. ब्रालेट आकाराने थोडी मोठी असते. अनेकदा ती कंबरेपर्यंत असते.ब्रा प्रमाणे त्यातून तुमच्या बुब्सचा भाग फार उठून दिसत नाही. त्यामुळे ब्रा आणि ब्रालेटमध्ये थोड्याफार प्रमाणात फरक असतो.

2.ब्रालेट दिसण्यासाठी असते का? (Are bralette means to be seen)

ब्रालेट हा प्रकार साधारण एखाद्या क्रॉप टॉपप्रमाणे असतो. तो तुम्हाला दाखवण्यासाठीच असतो.  त्यामुळे तुम्ही तुमची ब्रालेट आरामात फ्लॉन्ट करु शकता.ब्रालेट या दिसण्यासाठीच असतात.

ADVERTISEMENT

3. ब्रालेटमुळे ब्रेस्ट सॅगिंग होण्याची शक्यता असते का? (Do bralette cause breast sagging?)

अनेकांना हा प्रश्न पडतो किंवा काळजी वाटते की, स्तनांशी निगडीत काहीही चुकीचे घातले तर स्तनांचा आकार सैल होऊ शकतो. पण ब्रालेटची रचना ही तुमच्या ब्रा प्रमाणेच असते. त्यामुळे तुम्हाला वाटणारी भीती तुम्ही मनातून काढून टाका. कारण त्यामुळे तुमच्या स्तनांचा आाकार बदलत नाही. फक्त तुम्ही चांगली ब्रालेट घालण्याची गरज आहे.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

29 Oct 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT