नवीन कपड्यांचा पोत, रंग नेहमी आकर्षक असतो पण धुतल्यानंतर त्याच कपड्यांचा रंग आणि तलमपणा पहिल्यासारखा नक्कीच राहत नाही. त्यामुळे काहीजणांना नवीन कपडे न धुता एकदा तरी वापरावे असं वाटत असतं. पण असं करणं तुमच्या त्वचेसाठी नक्कीच चांगलं नाही. कारण असं केल्यामुळे त्वचेला इनफेक्शन होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आजकाल आपण शॉपिंग एकतर ऑनलाईन करतो अथवा मॉलमध्ये. या ठिकाणी अनेकांनी हाताळलेले हे कपडे जर तुम्ही न धुता घातले तर त्यामुळे तुमच्या त्वचेचं फार मोठं नुकसान होऊ शकतं. याशिवाय अशी अनेक कारणे आहेत ज्यासाठी नवीन कपडे घालण्यापूर्वी स्वच्छ धुवायलाच हवेत. जाणून घ्या ही कारणे…..
Shutterstock
कपडे तुमच्यापर्यंत येईपर्यंत किती जणांचे हात त्याला लागू शकतात –
कपडे एखाद्या गारमेंट फॅक्टरीमध्ये तयार होतात. ते कापड कापण्यापासून पॅकिंग करेपर्यंत अनेक कामगार त्यांना हाताळतात. शिवाय फॅक्टरीमधून एखाद्या शॉप अथवा डिलरकडे पोहचेपर्यंत वाहतूकीमध्ये त्यांचा अनेक गोष्टींशी संपर्क होत असतो. कोणताही ड्रेस अथवा शर्ट तुम्ही एखाद्या आवडत्या ब्रॅंडमधून जरी खरेदी केला तरी तो कुठे तयार झाला, कुठून कुठे पाठवण्यात आला, कुठे स्टोअर केला केला हे नेमकं कुणालाच सांगता येत नाही. सहाजिकच या सर्व प्रक्रियेमध्ये तुमचे कपडे अनेक जीवजीवाणूंच्या संपर्कात आलेले असू शकतात. जर तुम्ही कपडे न धुता घातले तर हे जीवाणू तुमच्या थेट त्वचेच्या संपर्कामध्ये येतात.
Shutterstock
तुमच्याआधी हे कपडे अनेकांनी ट्राय केलेले असू शकतात –
सध्या कोरोनामुळे ट्रायल आणि एक्स्चेंज बंद असलं तरी यापूर्वी या दोन्ही सुविधा सर्व दुकांनांमध्ये अगदी ऑनलाईन शॉपिंग केल्यावरही मिळत होत्या. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या आवडीच्या कपड्यांची फिटिंग तपासण्यासाठी ते ट्रायल करायची सवय आहेच. विचार करा तुम्ही खरेदी केलेले कपडे असे किती लोकांनी ट्रायल केलेले असतील. इतरांच्या शरीरावरील घाम, मृतपेशी, बॅक्टेरिआ या कपड्यांवरून तुमच्या त्वचेच्या संपर्कात येऊ शकतात. जर नवीन कपडे न धुता घातले तर तुमच्या त्वचेला खाज, पुरळ आणि अॅलर्जी होण्याची दाट शक्यता असते. यासाठी नेहमी नवीन कपडे धुवूनच वापरावे. शिवाय सध्या कोरोनामुळे बाजारातून आणलेली कोणतीही गोष्ट निर्जंतूक करून अथवा धुवूनच वापरणं सोयीचं राहील.
कपड्यांना रंगवण्यासाठी अनेक केमिकल्सचा वापर केला जातो –
निरनिराळ्या फॅशनचे आणि पॅर्टनचे कपडे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर कापडाच्या फॅक्टरीमध्ये तयार केले जात असतात. फॅक्टरीमध्ये एकाच प्रकारचे असे अनेक कपडे तयार करण्यासाठी आणि त्यांना एकसारखं रंगवण्यासाठी मोठया प्रमाणावर केमिकल्सचा वापर केला जातो. असे केमिकलयुक्त कपडे न धुता नवीन घातल्यामुळे या केमिकल्सचा संपर्क थेट तुमच्या त्वचेसोबत येऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. यासाठीच नवीन कपडे कधीच न धुता घालू नका. नवीन कपडे तसेच घालण्याचा मोह आवरा नाहीतर तुमच्या त्वचेचं यामुळे भंयकर नुकसान होऊ शकतं. शिवाय सध्या कोरोनाच्या काळात कोणतंही इनफेक्शन फक्त त्वचेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे नवीन कपडे आधी स्वच्छ धुवा आणि मगच परिधान करा. शिवाय कपड्यांची शॉपिंग करतानाही स्वतःची योग्य ती काळजी घ्या.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
कोरोनाच्या काळात स्पा अथवा पार्लरमध्ये जाताना अशी घ्या स्वतःची काळजी
अंडरआर्म्स स्वच्छ करण्यासाठी करा स्क्रबचा वापर, होईल फायदा