कोरोनामुळे करण्यात आलेला लॉकडाऊन आता हळूहळू कमी करण्यात येत आहे. त्यामुळे जनजीवन पुन्हा एकदा नव्याने सुरू होत आहे. लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचा धोका आजही कायम आहे. जोपर्यंत कोरोनावर लस निर्माण होत नाही तोपर्यंत प्रत्येकाने कोरोनापासून वाचण्यासाठी योग्य ती काळजी घ्यायलाच हवी. जर तुम्ही या काळात पार्लर अथवा स्पामध्ये जाणार असाल तर नेमकी कशी काळजी घ्यावी हे अवश्य वाचा. लॉकडाऊन हळू हळू कमी करत आता मॉल, पार्लर अशा अनेक गोष्टी सुरळीत सुरू झालेल्या आहेत. लवकरच शाळा, कॉलेज, ऑफिस, बिझनेस, वेकेशन अशा गोष्टींसाठी पूर्वीप्रमाणे प्रवासालाही सुरूवात होईल. इतके दिवस घरातच असल्यामुळे पार्लर आणि स्पामध्ये जाण्याची फार गरज वाटत नव्हती. मात्र आता कामानिमित्त घराबाहेर जायचं म्हणजे पार्लरमध्ये जाणंही ओघाने आलंच. जर तुम्ही या काळात त्वचा, केसांची काळजी घेण्यासाठी पार्लर, स्पामध्ये जाणार असाल तर काही गोष्टी जरूर लक्षात ठेवा.