ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
घरीच तयार करा कोणत्याही त्वचेसाठी हायड्रेटिंग सीरम

घरीच तयार करा कोणत्याही त्वचेसाठी हायड्रेटिंग सीरम

त्वचा हायड्रेट राहावी म्हणून तुम्ही काय करता? असा प्रश्न विचारल्यानंतर तुमच्याकडे याची बरीच उत्तरे असतील आणि बरेच उपायही असतील. पण तुम्ही कधी स्वत:साठी काही ब्युटी प्रोडक्टस बनवण्याचा विचार  केला आहे. DIY  ब्युटीचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील त्यातील आम्हाल चांगलेल्या काही सीरम रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.  हे सीरम आम्ही वापरले असून त्याचा उपयोग कधी कोणत्याही त्वचेला करता येऊ शकतो असा आहे. चला तर आज जाणून घेऊया हायड्रेटिंग सीरम बनवण्याची रेसिपी

फेस सीरम तुमच्या त्वचेवर आणेल ग्लो, जाणून घ्या बेस्ट फेस सीरम

ग्रीन टी सीरम

ग्रीन टी सीरम

Instagram

ADVERTISEMENT

ग्रीन टी त्वचेसाठी फारच फायदेशीर आहे हे आतापर्यंत अनेकांना माहीत असेल. ग्रीन टी मध्ये असलेले अँटी- ऑक्सिडंट त्वचेवरील जुने व्रण कमी करण्यास मदत करतात. याच्या नित्य उपयोगाने त्वचेच्या अनेक समस्या नियंत्रणात येतात. त्वचा आतून हायड्रेट ठेवण्याचे काम हे सीरम करते. 

साहित्य: ग्रीन टी, लिंबाचा रस, अॅलोवरा जेल, पाणी 

कृती : 

  • एका भांड्यात पाणी गरम करुन त्यामध्ये ग्रीन टीचे पाकिट उघडा. 
  • हे पाणी चांगले उकळू द्या. पाण्यामध्ये ग्रीन टी चांगली मिसळत नाही तोपर्यंत याला उकळी येऊ द्या. 
  • त्यात लिंबाचा रस घालून भांडे आचेवरुन उतरवा. थोडेसे थंड झाल्यावर त्यामध्ये अॅलोवेरा जेल घाला 
  • एकत्र करुन एका स्प्रे बॉटलमध्ये हे मिश्रण एकत्र करुन घ्या. दिवसातून दोनवेळा या स्प्रेचा उपयोग करा. तुम्हाला तुमच्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल.

घरच्या घरी बनवा असे फेस सीरम जे देतील तुमच्या त्वचेला ग्लो (Homemade Face Serum)

ADVERTISEMENT

अॅलोजेल फेस सीरम

अॅलोजेल फेस सीरम

Instagram

कोरफडीचा गर हा अनेक ब्युटी रेजिममध्ये वापरला जातो. थंडावा देण्यासोबतच त्वचा अधिक चांगली करण्याचे काम अॅलोवेराज जेल करते.  त्यामुळे त्याचा उपयोग करुनही तुम्ही एक सीरम जेल बनवू शकता. जे तुम्हाला अगदी कधीही वापरता येईल. मेकअप काढल्यानंतर जर तुमची त्वचा कोरडी पडत असेल तर हे सीरम तुम्हाला वापरता येईल. 

साहित्य: अॅलोवेरा जेल, गुलाबपाणी, व्हिटॅमिन E एक कॅप्सुल 

ADVERTISEMENT

कृती:

  • एका भांड्यात अॅलोवेरा जेल घ्या, त्यामध्ये अॅलोवेरा जेलच्या दुप्पट गुलाबपाणी घ्या. 
  • गुलाबपाणी घातल्यानंतर अॅलोवेरा जेलला थोडा फेस येईल तो चांगला एकजीव करुन घ्या. त्यामध्ये एक व्हिटॅमिन E कॅप्सुल घाला. एकजीव करुन एका बरणीत भरा. ब्रश किंवा  कशाच्याही मदतीने हे सीरम लावा. 

फेस टोनर की फेस सीरम उत्तम त्वचेसाठी कशाची करावी निवड (Face Toner Vs Face Serum)

रोझ फेस सीरम

रोझ फेस सीरम

Instagram

ADVERTISEMENT

गुलाब पाण्याचे त्वचेसाठी फारच उपयोग आहे . पण गुलाबपाण्यासोबत काही आणखी चांगल्या घटकांचा समावेश करण्यात आला तर ते सीरम अधिक फायदेशीर ठरते. हे सीरम बनवायला फारच सोपे आहे. 

साहित्य: गुलाबाच्या पाकळ्या, बदामाचे तेल एक चमचा, इसेन्शिअल ऑईल 

कृती : 

  • एका भांड्यात एक ग्लासभर पाणी गरम करुन त्यामध्ये साधारण एक वाटीभर गुलाब पाकळ्या उकळून घ्या. पाकळ्यांचा रस यामध्ये उतरेल याची काळजी घ्या. 
  • तयार पाण्यामधील पाकळ्या काढून टाका. त्यामध्ये बदामाचे तेल आणि इसेन्शिअल ऑईल घाला आणि मिश्रण थंड होऊ द्या. 

स्प्रे बॉटलमध्ये मिश्रण भरुन ते दिवसातून दोनवेळा वापरा.

ADVERTISEMENT


हे फेस सीरम जास्त काळ टिकवायचे असेल तर तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवा. काही त्रास होत असेल तर त्याचा वापर लगेचच करणे बंद करा. 

26 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT