ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
जाड चेहरा स्लिम दाखविण्यासाठी घ्या मेकअपची अशी मदत

जाड चेहरा स्लिम दाखविण्यासाठी घ्या मेकअपची अशी मदत

मेकअप करणं ही नक्कीच एक कला आहे. यामुळे तुमचे नैसर्गिक सौंदर्य वाढते आणि चेहऱ्यावरील कमतरता अत्यंत सोपेपणाने लपवता येते. इतकंच नाही तर मेकअप करून तुम्ही तुमचा चेहरा अधिक स्लिमदेखील दाखवू शकता. प्रत्येक वेळी एक नवा लुक तुम्ही करू शकता. विशेषतः तुमचा चेहरा जर जाडसर असेल आणि तुम्हाला तुमचा चेहरा स्लिम दाखवायचा असेल तर तुम्ही मेकअपची मदत घेऊ शकता. पण त्यासाठी नक्की काय करायचे हे तुम्हाला या लेखातून आम्ही सांगत आहोत. मेकअप करण्याची एक विशिष्ट पद्धत असते आणि मेकअप करून तुम्हाला तुमच्या या चेहऱ्याच्या कमतरता झाकता येतात. बऱ्याच अशी चेहरा स्लिम दाखविण्यासाठी आहारात बदल करून डाएट करण्यात येते. पण तुम्हाला काही विशिष्ट कार्यक्रमामध्ये जाताना तुमचा चेहरा अधिक स्लिम दिसायला हवा असेल तर तुम्ही विशिष्ट गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी काही खास विशिष्ट ट्रिक्स आम्ही तुम्हाला सुचवत आहोत. 

डोळ्याखालील काळी वर्तुळं करा कव्हर

तुम्हाला कदाचित याची कल्पना नसेल की डोळ्यांखालील काळी वर्तुळं कव्हर केल्याने तुम्हाला स्लिम लुक देता येतो. डोळ्यांखाली आलेले काळी वर्तुळं चेहऱ्याला वाईड लुक देतात. त्यामुळे तुम्ही चांगले कव्हरेज देणारे फाऊंडेशन लावा आणि आपल्या डोळ्यांच्या बाहेरच्या कोपऱ्याला थोडीशी व्हाईट आयशॅडो हायलायटर लावा. यामुळे तुमचा चेहरा अधिक स्लिम दिसू शकतो. तसंच तुमचा चेहरा अधिक आकर्षकही दिसतो. 

डोळ्यांखाली झालेल्या काळ्या वर्तुळांपासून सुटका देईल मध

आयब्रो करा फिल

खूप पातळ आयब्रो असतील तर त्यामुळे तुम्ही केवळ वयस्क दिसत नाही तर तुमचा चेहराही जाडसर दिसतो. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा चेहरा बारीक दिसायला हवा असेल तर तुम्ही तुमच्या पातळ आयब्रो फिल करायला हव्यात. पण या आयब्रो फिल करताना त्या नैसर्गिक जाडसर वाटतील अशा तऱ्हेने फिल करा. त्याशिवाय आयब्रोचा आकारदेखील तितकाच महत्त्वाचा आहे. अर्थात जर तुमच्या आयब्रो या आर्च असतील तर तुमचा चेहरा अधिक आकर्षक दिसतो आणि चेहऱ्याला स्लिम लुक मिळतो. 

ADVERTISEMENT

सुंदर लुक हवा असल्यास, आयब्रोजचा आकार ठेवा योग्य, लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी – Eyebrow Shaping Tips In Marathi

कॉन्ट्यूरिंग करा

मेकअप ही अशी ट्रिक आहे जी अगदी सामान्य मुलींपासून व्यावसायिक आणि अभिनेत्रींपर्यंत सर्वच जण वापरतात. तुम्हाला तुमचा चेहरा बारीक दाखवायचा असेल तर तुम्ही कॉन्ट्यूरिंगचा वापर करू शकता. कारण जर चेहरा जाडसर असेल तर संतुलित करण्यासाठी याचा चांगला वापर करून घेता येतो. जर तुमचे कपाळ अधिक मोठे असेल अथवा तुमचे नाक मोठे असेल किंवा तुमचे गाल जाडसर दिसत असतील तर तुम्ही कॉन्ट्यूरिंग करून सहजपणे तुमच्या चेहऱ्याचे हे मोठे आणि जाडसर भाग बारीक करून दाखवू शकता.

लहान डोळ्यांसाठी परफेक्ट आय मेकअप

असा करा डोळ्यांचा मेकअप

तुम्हाला जर चेहरा बारीक दाखवायचा असेल  तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने आय मेकअप अर्थात डोळ्यांचा मेकअप करायला हवा. डोळ्यांचा मेकअप करताना तुम्ही कॅट स्टाईल अथवा विंग्ड आयलायनर लावा. लिक्विड आयलायनरचा उपयोग करत असाल तर डोळ्यांच्या वरच्या बाजूला ठेवा. यामुळे तुमचे डोळे अधिक सुंदंर दिसतील आणि तुमचा चेहरा अपलिफ्ट झालेला दिसून येईल. तुम्ही अधिक सुंदर दिसता. 

ADVERTISEMENT

या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचा चेहरा स्लिम दाखवू शकता. तसंच दिसायला तुम्ही नैसर्गिक आहात तसेच दिसता.  केवळ हा मेकअप अति होणार नाही याची काळजी घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT