लिपस्टिक हा प्रत्येक महिलेच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळेच मेकअपचा खास भाग लिपस्टिक असते. सध्या लिपस्टिकमध्ये चलती आहे ती न्यूड लिपस्टिकची. तसं तर लाल आणि गुलाबी या शेड्स जास्त वापरल्या जातात असं दिसून येतं. पण प्रत्येक ठिकाणी हे दोन गडद रंग वापरता येत नाहीत. ऑफिस अथवा अन्य ठिकाणी तुम्हाला न्यूड लिपस्टिकच्या शेड्स उपयुक्त ठरतात. अशा ठिकाणी गडद लिपस्टिक लावणं बऱ्याचदा वाईट दिसतं. तसंच आजकाल न्यूड लिपस्टिकचा ट्रेंड आणि प्रसिद्धीही वाढत चालली आहे. या हलक्या आणि लाईट शेड्समध्ये असतात आणि असं असूनही तुम्हाला ग्लॅमरस लुक मिळवून देतात. स्किनटोननुसार योग्य न्यूड लिपस्टिक शोधणं हे नक्कीच जिकिरीचे काम आहे. त्यामुळे आपल्या स्किनटोननुसार कोणती न्यूड लिपस्टिक वापरावी आणि ती कशी निवडावी हे आम्ही तुम्हाला या लेखामधून सांगत आहोत. तुम्हाला लिपस्टिक शेडची निवड करताना नक्कीच त्याचा उपयोग होईल.
न्यूड लिपस्टिक निवडण्याची सर्वात चांगली पद्धत म्हणजे नैसर्गिक स्किन टोनपेक्षा हलकासा गडद आणि वॉर्म अशी लिपस्टिक शेड तुम्ही निवडावी. याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही न्यूड लिपस्टिकची खरेदी करायला जाता तेव्हा चेहऱ्यावर अजिबात फाऊंडेशनचा वापर करू नका. त्यामुळे तुम्हाला योग्य शेड शोधायला अडचण येणार नाही. अगदी हलका गडद रंग असणारी न्यूड लिपस्टिक तुमच्या टोननुसार तुम्हाला निवडावी लागते. यामुळे तुमची लिपस्टिक आणि त्वचा हे दोन्ही नैसर्गिक शेडमध्ये संतुलन ठेवते जे दिसायलाही अधिक आकर्षक दिसते आणि तुम्ही अधिक ग्लॅमरस दिसता. तसंच तुम्हाला यामुळे आत्मविश्वासही मिळतो. तुम्हाला लाल आणि गुलाबी रंगापासून काही दिवस सुटका हवी असेल तर लिपस्टिक खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की, न्यूड लिपस्टिक अशी खरेदी करा जी तुम्हाला अत्यंत कॅज्युअल लुक देईल आणि वेगळी दिसेल.
तुमची त्वचा लाईट असेल तर तुमचे ओठ नैसर्गिक गुलाबी अ्सतात. त्यामुळे तुम्हाला ब्राईट शेड्सच्या न्यूड लिपस्टिक खरेदी करणं आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला कॉन्ट्रास्ट लुक मिळतो. लाईट स्किनवर न्यूड लिपस्टिक लावल्यानंतर तुम्ही लिप ग्लॉस लावलात तर ग्लॉसी शाईनिंग येते आणि तुम्ही अधिक आकर्षक दिसता. त्यामुळे हा लुक नक्की ट्राय करून पाहा. तुम्हाला तुमच्या स्किन टोननुसार मॅच करणारी न्यूड लिपस्टिक खरेदी करायला हवी. MyGlamm मनिष मल्होत्रा हाय शाईन (MyGlamm Manish Malhotra Hi-shine Lipstick (Barely Nude) लिपस्टिक तुमच्या ओठांवर अधिक सुंदर दिसेल.
लिक्विड लिपस्टिक लावताना होतोय त्रास, तर जाणून घ्या योग्य पद्धत
तुमची त्वचा ब्राऊन असेल तर तुम्हाला न्यूड लिपस्टिक अतिशय सुंदर दिसते. ऑफिस असो अथवा कॉकटेल पार्टी असो ब्राऊन स्किनच्या मुलींना मॅक मोचा शेड (MAC Mocha Shade of brown) अथवा न्यूड मॅक वेलवेट टेडी शेड (pinkbeige nude MAC velvet teddy) चांगल्या दिसतात. या शेड्स तुमच्या स्किनसह व्यवस्थित ब्लेंड होतात. तसंच नैसर्गिक लुकसाठी या शेड्स चांगल्या ठरतात. याशिवाय ब्राऊन स्किनवर लॅक्मेची कॉफी कलर 9 to 5 (Lakme 9 to 5 color in Coffee) लिपस्टिक शेडदेखील चांगली दिसते.
भारतीय रंग अर्थात डार्क स्किन अर्थात सावळ्या त्वचेच्या महिलांसाठी न्यूड लिपस्टिक शोधणं हे जरा जास्त शोधाचं काम असू शकतं. पण यासाठीही अनेक लिपस्टिक तुम्हाला मिळतील. सावळ्या महिलांसाठी मेबिलिन कलर सेन्सेशन बफ इन अनटेंटेड स्पाईस लिपस्टिक (Maybelline color sensational buff in untainted spice Lipstick) चांगली समजण्यात येते. ही ओठांना नैसर्गिक लुक देते आणि जास्त काळ टिकून राहाते. ही लिपस्टिक तुम्ही रोज लावली तरीही तुमचे ओठ खराब होणार नाहीत.
तुम्हाला जर वाटत असेल की यामध्ये शोधणंं कठीण आहे तर असं अजिबात नाही. अनेक न्यूड लिपस्टिक शेड्स अशा स्किनच्या महिलांना शोभून दिसतात आणि ओठांना आकर्षक लुक देतात. या स्किन टोनच्या महिलांना रेव्हलॉन सुपर ल्यूस्ट्रस क्रिमी लिपस्टिक (Revlon Super Lustrous Creme Lipstick) अधिक सुंदर दिसते अथवा मॅक न्यूड लिपस्टिकही (MAC Lipstick) यांच्यावर शोभून दिसते. तुम्हाला अशा प्रकारच्या लिपस्टिकची शेड शोधायला हवी.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक