ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
ट्रान्सपरंट साड्यांवर पेटीकोट आणि ब्लाऊजची निवड करताना

ट्रान्सपरंट साड्यांवर पेटीकोट आणि ब्लाऊजची निवड करताना

 फेस्टिव्हल सीझन किंवा पार्टीसाठी आपल्याला डिझायनर साड्या नेसायला आवडतात. अशा साड्या बहुतेकदा ट्रान्सपरंट किंवा नेटेड असतात. या साड्या दिसायला इतक्या सुंदर दिसतात की, आपण कसालाही विचार न करता त्यांची खरेदी करतो. पण साड्या घरी आणल्यानंतर त्यावर कोणत्या प्रकारचा ब्लाऊज घालायचा आणि कोणता पेटीकोट निवडायला हे कळत नाही. तुमच्याकडेही एखादी अशी साडी असेल आणि ती तशीच पडून असेल तर अशा साड्यांवर पेटीकोट आणि ब्लाऊजची निवड कशी करावी ते आता जाणून घेऊया. 

रेडिमेड ब्लाऊज विकत घेताना या गोष्टींची घ्या काळजी

ब्लाऊज हवा असा

ब्लाऊज हवा असा

Instagram

ADVERTISEMENT
  • एखादी साडी जाळीदार किंवा पातळ असेल तर अशी साडी कधी कधी थोडी डल दिसते. सॅटीन आणि ग्लॉसी ब्लाऊज या साड्यांवर उठून दिसतात. त्यामुळे एक वेगळा लुकही येतो. 
  • अनेकदा सॅटीन किंवा नेटेड साड्यांवर काही टिपिकल ब्लाऊज चांगले दिसत नाहीत. ते अगदीच रेग्युलर साड्यांप्रमाणेच वाटतात. पण सॅटीन, देवी सिल्क किंवा ग्लॉसी मटेरिअलचे ब्लाऊज या साड्यांना चांगलेच उठून दिसतात.
  • तुम्ही जर बाजारात जाऊन अशा प्रकारच्या ब्लाऊज पीसची खरेदी करा. या ब्लाऊज पीसच्या रंगाची निवड नेहमी गडद असू द्या. कारण असे रंग गडद असतील तरच ते अधिक चांगले दिसतात. 
  • सॅटीन, सिल्क मटेरिअलमधील ब्लाऊजची फिटिंग ही उत्तम असायला हवी. जर फिटिंग चांगली असेल तर तुमच्या साडीचा लुक अधिक चांगला उठून दिसतो

मकर संक्रांत स्पेशल: संक्रांतीला नेसण्यासाठी काळ्या रंगाच्या साड्यांचे ‘18’ प्रकार (Black Saree For Sankranti In Marathi)

पेटीकोट निवडताना

पेटीकोट निवडताना

Instagram

  • पातळ साड्या आणि नेटेड साडयांवर पेटीकोटची निवड खूप महत्वाची असते. कारण तुमच्या पेटीकोटवरच सगळा लुक अवलंबून असतो. जर तुम्ही कॉटनचा पेटीकोट निवडला  तर कॉटन पेटीकोट हे खूप बल्की दिसतात. यामुळे तुम्ही जाड दिसण्याची शक्यता जास्त असते. 
  • अशा साड्यांवर तुम्ही सॅटीन पेटीकोट निवडा. यामध्येही तुम्हाला फिश कट किंवा फ्लेरी असे दोन्ही प्रकार मिळतात. 
  • साड्या पारदर्शक असतील तर तुमच्या रंगाची निवडही फारच महत्वाची असते. ब्लाऊज जरी गडद निवडला तरी पेटीकोटच्या बाबतीत असे करुन चालत नाही. कारण पेटीकोटचा रंग साडीपेक्षा खूप जास्त गडद किंवा फिक्कट झाला की, साडीचा सगळा लुक निघून जातो. त्यामुळे पेटीकोटच्या रंगाची निवडही तितकीच महत्वाची आहे. पेटीकोटचा योग्य रंग निवडून मगच तुम्ही साडी निवडा. 
  • जॉर्जेट या बरेचदा पातळ असल्या तरी त्या नेटेडच्या तुलनेत फार त्रासदायक नसतात.  अशा साड्यावर बाजारात मिळणारे फिशकट होजिअरी पेटीकोट छान उठून दिसतात. त्यामध्ये तुम्हाला रंगाचा फार विचार करावा लागत नाही. थोडासा रंग इकडे- तिकडे झाला तरी चालून जाते. अशा साड्या या प्रकारातील पेटीकोटवर छान बसतात आणि पेटीकोटच्या फिटिंगमुळे साडीही तुम्हाला एकदम छान दिसते. 

आता पातळ किंवा ट्रान्सपरंट साड्यांची निवड करताना या गोष्टी लक्षात ठेवा.

ADVERTISEMENT

Cotton and Handloom Blouse Designs: कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स

22 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT