#coffeelover आणि #Tealover लोकांचा स्वभाव नेमका असतो कसा?

#coffeelover आणि #Tealover लोकांचा स्वभाव नेमका असतो कसा?

समाजात दोन प्रकारचे लोक असतात एक #coffeelover आणि एक #Tealover या दोन प्रकारांमधील तुम्ही एक असाल किंवा अशा लोकांना ओळखत असाल तर तुम्हाला या दोन्ही लोकांमधील फरक नक्कीच जाणवेल. या दोन्ही पेय पिणाऱ्यांच्या स्वभावात कमालीचा फरक असतो. तुम्ही कधी या दोन प्रकारच्या लोकांसोबत वेळ घालवला तर तुम्हाला काही गोष्टी नक्की समजतील. चला तर जाणून घेऊया या दोघांच्या स्वभावात नेमका काय असतो फरक. टॅग करा तुमच्याी अशा मित्रांना जे #coffee आणि #Tealover आहेत. 

या राशींनी बदलला त्यांचा हा स्वभाव तर होतील कायम यशस्वी

#coffeelover ची खासियत

Instagram

तुमच्या ओळखीचे कॉफी लव्हर असतील तर तुम्हाला त्यांच्यामध्ये असणारी ही काही स्वभाव वैशिष्ट्ये हमखास दिसतील. 


 • अगदी कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही वेळी कॉफी ऑर्डर करणारी ही लोकं अत्यंत चुलबुल्या स्वभावाचे असतात. क्रिएटिव्हीटी ही त्यांच्या नसानसात भरलेली असते.
 • आपल्या भावना एकदम स्पष्टपणे मांडण्यात ही लोक एक्सपर्ट असतात. त्यांना मनात काही ठेवायला अजिबात आवडत नाही.  त्यामुळेच अनेकदा या व्यक्ती लाऊट वाटतात. पण पण त्यांचा आवाज जरी जास्त असला तरी त्यांच्यामध्ये कमालीचा समजुतदारपणा असतो.
 • शॉपिंग ही यांच्या नसानसात भरलेली असते. अगदी कुठेही फिरायला गेल्यानंतर त्यांच्या आवडीच्या कॉफीचा जरासा वासही त्यांना आला तरी देखील ती लोकं सगळी काम सोडून पहिले कॉफी शॉप गाठतात. कॉफी पित पित एकटे राहूनही हे आपला वेळ घालवू शकतात. 
 • कॉफी हे अनेकांसाठी रिच असे पेय आहे. त्यामुळे हे पिणाऱ्यांचे अनेक चोचले असतात.  त्यांना कॉफीसोबत काहीही चालत नाही. त्यांच्यासोबत सँडवीज किंवा गोड खायला आवडते.  त्यामुळे यांचा स्वभावही स्पाईसी आणि गोड असा मिक्स असतो. 
 • अगदी कोणत्याही गोष्टीच्या प्रेमात ही लोकं लगेच पडतात. त्यांना एखादी नवी गोष्ट आवडली की, ती गोष्ट मिळवण्यासाठी ही लोकं चांगलीच धडपडतात. त्यामुळे त्यांना मेहनत करायला खूप आवडते. पण अशी काम करताना कॉफीचा एक घोट मिळाला तरी त्यांचे मन तृप्त होते. 

डोळ्यांचा रंग सांगतो व्यक्तीचा स्वभाव

#Tealover ची खासियत

Instagram

जगातील सगळी लोकं एकीकडे आणि चहाप्रेमी एकीकडे. चहा पिणाऱ्यांचा एक वेगळाच अंदाज असतो. अमृतानंतर जर कोणते पेय असेल तर अशा व्यक्तींसाठी केवळ चहा हेच असते.या लोकांच्याही काही खासियत असतात. 

 • चहा पिणारी लोकं ही कायम समाधानी असतात. त्यांच्याकडे जे आहे त्यामध्ये ते खूश राहण्याचा प्रयत्न करतात. 
  शॉपिंग आवडत असली तरी देखील वायफळ खर्च न करण्याकडे यांच अधिक कल असतो.
 • प्रेमाच्या बाबतीत ही लोकं फार चौकस असतात. त्यांना उगाचच कोणाच्या प्रेमात पडायला आवडत नाही. ते फार विचार करतात. त्यांच्यासाठी योग्य जोडीदार मिळत नाही तोपर्यंत पाऊल उचलत नाही 
 • चहा आवडणाऱ्यांचे फार चोचले नसतात त्यांना अगदी कुठलाही चहा आवडतो त्यासोबत त्यांना फार काही फॅन्सी काही खायला आवडत नाही.
 • चहा पिणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामात माहिर असतात. त्यांन काम करायचे की नाही हे चांगले कळते. एखाद्या वेठीला धरायचे असेल तर ते त्यासाठीही मागे पुढे पाहात नाही. 
 • चहा पिणाऱ्यांचा स्वभाव हा शांत असला तरी धुर्त असतो. ते सहसा काही गोष्टींना फसत नाही. 


तर हे काही स्वभाव विशेष दोघांमध्ये दिसून येतात. तुम्हाला हे पटलं का?

तुमच्या नखांच्या आकारावरून ओळखा तुमचा स्वभाव

Make Up

MyGlamm Magic Potion - Mermaid

INR 995 AT MyGlamm