घरातील स्वयंपाकघरामध्ये आवळ्याचे एक नक्कीच वेगळं स्थान असतं. विशेषतः लोणच्याच्या बाबतीत. अगदी प्रत्येकाच्या घरात आवळ्यां लोणचं तुम्हाला दिसतंच. आवळ्यामध्ये औषधीय गुणही असतात. जितका आवळा औषधीय आहे तितकीच आवळ्याची पावडरही उपयुक्त आहे. आवळा पावडर चे फायदे अनेक आहेत. केवळ शरीरासाठीच नाही तर आवळा पावडरचे फायदे हे केस आणि त्वचेसाठीही तितकेच परिणामकारक ठरतात. आवळा पावडरचा सर्वात मोठा फायदा होतो तो केसांसाठी. पण बऱ्याच जणांना आवळा पावडर केसांना कशी लावायची याची व्यवस्थित माहिती नसते. आवळा पावडरचे फायदे (Amla Powder Benefits In Marathi) नक्की काय आहेत आणि त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत.
आवळा पावडरची माहिती (Amla Powder Information In Marathi)
आवळा पावडर ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त समजण्यात येते. कारण यामध्ये अनेक पोषक तत्वांचा भरणा आहे. नक्की आवळा पावडरचे पोषण मूल्य काय आहे हे आपण जाणून घेऊया.
आवळा पावडरमध्ये कॅलरी, फायबर, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, मॉईस्चर, विटामिन बी1, विटामिन बी3, विटामिन सी, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस या सर्व गुणांचा भरणा आहे. या सर्व गुणांनी आवळा पावडर युक्त असल्याने तुमच्या केसांना आणि त्वचेला चांगले पोषण मिळते. विशेषतः केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषण तत्व यामध्ये उपलब्ध असते. त्यामुळेच अनेक शँपूमध्येही आवळा पावडरचा समावेश करण्यात आलेला असतो अथवा तज्ज्ञदेखील केसांना आवळ्याची पावडर लावण्याचा सल्ला याचसाठी देतात. मात्र याचा उपयोग कसा आणि किती प्रमाणात करायचा हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्याआधी आवळा पावडरचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊ.
घरीच बनवा या चटपटीत आवळा रेसिपीज
आवळा पावडरचे फायदे (Amla Powder Benefits In Marathi)
आवळा पावडरमध्ये कोणकोणती पोषक तत्व आहेत आणि त्याचे मूल्य काय आहे ते आपण पाहिले. आता पण आवळा पावडर चे फायदे काय आहेत ते पण पाहूया. संपूर्ण शरीराला आवळा पावडरचे वेगवेगळे फायदे होतात. त्याची माहिती आपण घेऊ.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त (Weight Loss)
आवळ्यामध्ये एथेनॉलिक (Ethanolic) नावाचे तत्व आढळते. यामध्ये अँटीहायपरलिपिडेममिक (चरबी कमी करणारे) आणि अँटिऑक्सिडंट्स गुण आढळतात. यामुळे आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुमचे वजन वाढत असेल तर ते नियंत्रणात येण्यास मदत मिळते. तसंच अतिरिक्त चरबी आवळा शरीरामध्ये जमू देत नाही. चयापचयाची क्रिया तुम्हाला व्यवस्थित करण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग होतो. तुम्ही नियमित कोमट पाण्यातून आवळा पावडर मिक्स करून प्यायल्यास तुमचा पचनक्रियेचा त्रास नक्कीच दूर होतो. तसंच वजनही नियंत्रणात राहते.
पचनक्रिया उत्तम होण्यासाठी (Improves Digestion)
आवळ्याला एक आदर्श फळच म्हटले जाते. कारण यामध्ये अनेक गुण असून शरीरासाठी याचे अनेक फायदे होतात. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया उत्तम होते. पचनक्रिया उत्तम झाली तर आपोआपच वजन कमी होण्यास सुरूवात होते. वास्तविक यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे त्रास कमी होतो. फायबर पचनक्रिया चांगली करण्यास आणि बद्धकोष्ठासंबंधी त्रास कमी करण्यास मदत करते. त्यामुळे आवळ्याच्या पावडरमुळे पचनक्रिया उत्तम होऊन अन्य त्रासापासून सुटका मिळते.
लिव्हर ठेवते निरोगी (For Lever)
अनेक अँटिबायोटिक आणि औषधांच्या गोळ्या अथवा सतत दारूचे सेवन हे लिव्हरमध्ये अनेक विषारी पदार्थांचे निर्माण करते. पण तुम्ही नियमित आवळा पावडरचा समावेश आपल्या आहारात करून घेतला तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमचे लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी याची मदत मिळते.
मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी (Control Diabetes)
आवळ्यामध्ये अँटीहायपोग्लायसेमिक आणि लिपीड कमी करणारे गुण आढळतात. तसंच आवळा पावडरमध्ये असणारे गुण हे मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतात. रोज आवळ्याची पावडर सेवन केल्याने रक्तातील असलेला ग्लुकोजचा स्तर कमी करण्यासाठी तुम्हाला उपयोग करून घेता येतो. तसंच याने केवळ मधुमेह नियंत्रणातच नाही आणता येत तर याच्या सेवनाने मधुमेह थांबविण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुम्ही याचा नियमित वापर करून योग्य डाएट फॉलो केल्यास, तुमचा मधुमेह आटोक्यात येऊ शकतो.
कॅन्सर थांबविण्यासाठी (For Cancer)
आवळ्यामधअये रेडिओमॉड्युलेटरी, केमोमोडायलेटरी, केमप्रोव्हेन्टिव्ह इफेक्ट, अँटिऑक्सिडंट्स आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुण असतात. जे कॅन्सरशी लढा देण्यासाठी मदत करतात. तसंच आवळ्यातील गुण हे कॅन्सरचा उपचार आणि कॅन्सर थांबविण्यासाठी बऱ्याच अंशी फायदेशीर ठरतात. त्यामुळे तुम्ही नियमित आपल्या आहारातही आवळा पावडरचा अथवा आवळ्याचा समावेश करून घ्यायला हवा.
हृदय स्वास्थ्यासाठी (Promotes Better Heart Health)
एका शोधामध्ये सांगितल्यानुसार आवळ्याची पावडर हृदय निरोगी राखण्यास मदत करते. याशिवाय याचा उपयोग हायपोलिपिडेमिक एजंट स्वरूपातही होतो. यामुळे रक्तदाबासारख्या रोगांशी लढा देणे सोपे होते आणि कोरोनरी आर्टरी डिसीज अर्थात धमन्यांच्या रोगाविरोधात सुरक्षा मिळते. यामुळे हृदय रोगापासून तुम्हाला दूर राहता येते आणि हृदयाची काळजीही अधिक चांगल्या पद्धतीने घेता येते.““`
हाडे मजबूत करण्यासाठी (For Strong Muscles)
आवळ्याच्या पावडरमध्ये कॅल्शियमचे प्रमाणा नैसर्गिकरित्या अधिक असते. हा कॅल्शियमचा चांगला नैसर्गिक स्रोत आहे. कॅल्शियम हाडांना मजबूती देते आणि कमजोर होऊ देत नाही. कॅल्शिमय कमी असेल तर हाडं खिळखिळी होतात आणि त्यात जोर राहात नाही. तसंच हाडं तुटण्याचाही धोका असतो. पण आवळ्याच्या पावडरच्या सेवनाने तुम्हाला हाडांचा अधिक चांगला विकास करता येतो आणि अन्य कोणत्याही गोष्टीची मदत घ्यावी लागत नाही. याचा तुम्ही नियमित वापर करून हाडे मजबूत करून घेऊ शकता. तसंच याचे योग्य प्रमाणात सेवन करावे. जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (To Boost Immunity)
रोज आवळ्याचे सेवन हे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असून इम्यूनोमॉड्युलेटरी गुण अधिक प्रमाणात असतात. ज्यामुळे प्रतिकारकशक्ती वाढते आणि आपल्याला रोगांपासून दूर राहण्यास मदत मिळते. तसंच तुम्ही नियमित आवळ्याच्या पावडरचे सेवन केल्यास अनेक रोगांपासून तुम्ही दूर राहू शकता. प्रतिकारकशक्ती अधिक वाढण्यासाठी याचा उपयोग होतो.
डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी (For Eyes And Skin)
आवळ्यामध्ये असणारे विटामिन सी हे डोळ्यांची दृष्टी चांगली राखण्यास मदत करते. तसंच आवळ्यात असणारे लोह आणि अनेक खनिजे ही डोळ्यांच्या अनेक समस्या दूर करण्यसाठीही फायदेशीर ठरतात. याचा उपयोग मोतीबिंदूच्या उपचारासाठीही करण्यात येतो. आवळ्याच्या पावडरमध्ये उत्कृष्ट नैसर्गिक अँटिएजिंग गुण असतात जे त्वचेवर वेळेआधी सुरकुत्या येऊ देत नाहीत. तसंच याचा उपयोग चेहऱ्यावर आलेल्या पुळ्या आणि पिंपल्स घालविण्यासाठीही तुम्ही करून घेऊ शकता.
चमकदार केसांसाठी (For Glowing Hair)
केसांसाठी आवळा वापरण्यात येतो हे सर्वांनाच माहीत आहे. आवळ्याच्या पावडरमध्ये अनेक गुण असतात जे केसांना पोषण देण्यासाठी उपयुक्त ठरतात. केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी, तसंच केसांना अधिक मजबूती मिळण्यासाठी आणि कोंड्यापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी आवळा पावडरचा उपयोग करता येतो. तसंच केसांची निगा राखण्यासाठी आणि केसांचा विकास होण्यसाठीही आवळा पावडरचा उपयोग होतो. यातील अँटिऑक्सिडंट्समुळे प्रदूषणाचा त्रास केसांना होत नाही आणि केस अधिक मजबूत राहतात. हल्ली बाजारात आवळ्याच्या घटकांनी युक्त असे बेस्ट आवळा शॅम्पू मिळतात. ज्यांचा उपयोगही तुम्हाला सुंदर केस मिळवण्यासाठी करता येईल.
आवळा पावडरचा वापर कसा करावा (How To Use Amla Powder In Marathi)
- डोक्याच्या त्वचेला अर्थात स्काल्पमध्ये पीएच बॅलेन्स नीट करायचा असेल तर तुम्ही आवळ्याचे तेल वापरू शकता. अथवा आवळा पावडरमध्ये थोडेसे पाणी भिजवून जाडसर पेस्ट करा आणि मेंदीप्रमाणे ही पेस्ट केसांना लावा. काही वेळ तसंच ठेवा आणि मग केस माईल्ड शँपूने धुवा. तुम्हाला परिणाम दिसून येईल. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही आवळा पावडरमध्ये नारळाचे तेल मिक्स करून हे मिश्रणदेखील केसांच्या मुळांपासून लावले तरीही तुम्हाला याचा फायदा मिळू शकतो
- नकारात्मक परिणामांपासून वाचण्यासाठी मात्र आवळा पावडरचा उपयोग हा योग्य प्रमाणात करायला हवा. अतिशयोक्ती करून अति प्रमाणात आवळा पावडर वापरू नका
- आवळ्यामध्ये ते सर्व पोषक तत्व असतात जे केसांना वेळेच्या आधी सफेद होण्यापासून रोखतात आणि केसांची चमक तशीच ठेवण्यास मदत करते. आवळा पावडर केसांना कशी लावायची तर, आवळा पावडर तुम्ही मेंदीसह मिक्स करा आणि ही जाडसर मेंदी आवळ्याची पेस्ट केसांना लावा. नैसर्गिक स्वरूपात तुम्हाला केस काळे करायचे असतील तर तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसंच तुमचे केस अधिक चमकदार होतात आणि तुटण्यापासून रोखतात.
- आवळ्यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिबॅक्टेरियल घटक असतात. जे केसांमधील सर्व घाण काढून टाकण्यास आणि केसातील कोंडा दूर करण्यास मदत करतात. कोंडा दूर झाल्यावर आपोआपच तुम्हाला केसगळतीपासून सुटका मिळते. यासाठी तुम्ही आवळला पावडर घ्या. 8-10 तुळशीची पाने घ्या आणि याची व्यवस्थित पेस्ट तयार करा. ही पेस्ट हाताने तुम्ही स्काल्पपासून केसांना लावा आणि साधारण अर्धा तास तसंच राहू द्या. केसांना थंड पाण्याने धुवा आणि सॉफ्ट क्लिन्झरने केस स्वच्छ करा
- आवळा पावडर आणि दही हे मिश्रण केसातील कोंडा दूर करून केसगळती थांबविण्यास मदत करते. यासाठी तुम्ही आवळा पावडरमध्ये शिकाकाई, लिंबाचा रस आणि दही मिक्स करून पेस्ट करून घ्या. ही पेस्ट तुम्ही अगदी व्यवस्थित स्काल्पपासून केसांना लावा. साधारण अर्धा तास हे केसांवर तसंच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. आठवड्यातून तुम्ही असे दोन वेळा करू शकता. हा उपाय तुम्हाला नक्की केसगळतीपासून सुटका मिळवून देऊ शकतो.
आवळा पावडरने काय होते नुकसान (Side Effects Of Amla Powder In Marathi)
कोणत्याही गोष्टीचा अतिवापर नक्कीच चांगला नाही. त्याचप्रमाणे आवळा पावडरचा वापरही योग्य प्रमाणात न केल्यास त्याने नुकसान पोहचू शकते.
- आवळा पावडरचा अतिरिक्त वापर हा रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी केला जातो. त्यामुळे हायपोग्लायसिमिया अर्थात ज्यांना लो ब्लड शुगरचा त्रास आहे त्या रूग्णांनी आवळा पावडरचे सेवन करू नये. त्यांच्यासाठी हे हानिकारक ठरते
- आवळ्याचे सेवन पटकन वजन कमी करण्यासाठीदेखील करण्यात येते. पण ज्यांचे वजन पहिल्यापासूनच कमी आहे त्यांनी आवळा पावडरचे सेवन करू नये. आवळा पावडरचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
- गर्भावस्थेदरम्यान याचे सेवन शक्यतो करू नये. कारण याचे प्रमाण जास्त झाल्यास, बद्धकोष्ठ, दस्त आणि अपचनाचे कारण निर्माण होऊ शकते. ज्याचा बाळावरही परिणाम होऊ शकतो
प्रश्नोत्तरे (FAQ’s)
ज्यांना लो ब्लड शुगर अथवा वजन कमी असण्याचा त्रास आहे त्यानी नक्कीच आवळा पावडरचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. अन्यथा त्याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात.
डोळ्यांच्या दृष्टीसाठी आवळा पावडर उपयुक्त ठरते. आवळ्यात असणारे लोह आणि अनेक खनिजे ही डोळ्यांच्या अनेक समस्या दूर करण्यसाठीही फायदेशीर ठरतात. आवळ्याच्या पावडरमध्ये असणारे विटामिन सी डोळ्यांची दृष्टी चांगली राखण्यास मदत करते.
कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा नक्कीच नुकसानकारक असतो. त्यामुळे आवळा पावडरचा वापरही योग्य प्रमाणात तुम्ही केसांवर करा. त्याचा अति उपयोग केल्यास, तुम्हाला त्वचेलाही हानी पोहचू शकते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxoआणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक