ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
स्तनांच्या बाजूची चरबी वाढू न देण्यासाठी ब्रा घालताना टाळा या चुका

स्तनांच्या बाजूची चरबी वाढू न देण्यासाठी ब्रा घालताना टाळा या चुका

ब्रा हा प्रत्येक महिलेच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. पण ब्रा योग्य तऱ्हेने घालणं अत्यंत गरजेचे असते. ब्रा बद्दल अनेक गैरसमजही मनामध्ये असतात. पण ब्रा घालताना तुम्ही जर काही चुका केल्यात तर तुम्हाला त्या नक्कीच भारी पडू शकता. विशेषतः ब्रा घालताना जर तुम्ही आम्ही सांगत आहोत अशा काही चुका करत असाल तर तुमच्या स्तनांच्या बाजूची चरबी वाढू शकते. त्यामुळे स्तनांच्या बाजूची चरबी वाढू द्यायची नसेल तर तुम्ही ब्रा घालताना काही चुका करणं टाळा. यामुळे तुमच्या शरीराचा आकारही बिघडू शकतो. तसंच तुमच्या स्तनांच्या आजूबाजूला इतकी चरबी साठते की स्तन आणि शरीर दोन्ही बेढब दिसू लागते. काही जणींचा वरचा भाग बेढब दिसण्याची हीच प्रमुख कारणं असतात. यासाठी कोणताही व्यायाम नाही तर ब्रा संदर्भातील योग्य माहिती तुमची मदत करू शकते. काय आहेत या चुका आपण पाहूय आणि या चुका नक्की टाळण्याचा प्रयत्न करा.  

सलग दोन – तीन दिवस तीच ब्रा वापरणे

Shutterstock

काही जणींना सलग दोन – तीन दिवस एकच ब्रा वापरायची सवय असते. पण ही सवय अत्यंत वाईट आहे. याचे सरळ आणि साधे कारण म्हणजे ब्रा मध्ये असणारे इलास्टिक. जर इलास्टिक घालण्यासाठी एक दिवसाचा गॅप दिला नाही तर ते खेचले जाते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरील त्वचेवर होतो. इलास्टिक पुन्हा आपल्या मुख्य स्वरूपात येते आणि मग त्यामुळे तुमच्या स्तनांवर त्याचा परिणाम होतो. इलास्टिक खराब होते ही गोष्ट असली तरीही त्याचा मुख्य परिणाम तुमच्या स्तनांचा आकार बिघण्यावर होतो.

ADVERTISEMENT

जास्त काळ एकाच ब्रा चा वापर

साधारण तीन ते चार महिन्यांनी तुम्ही वापरत असलेली ब्रा बदलली पाहिजे. पण तुम्ही एकच ब्रा सतत वापरत असाल आणि साधारण एक वर्ष तीच ब्रा घालत असाल तर त्याचा असा वापर करणे योग्य नाही. ब्रा वर एक्सपायरी तारीख नसली तरीही साधारण 8-9 महिन्याच्या कालावधीनंतर तुम्ही ब्रा बदलायला हवी. तुमच्या शरीराच्या आकारानुसार कमीत कमी वर्षातून दोन वेळा तरी ब्रा बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. विशेषतः नुकत्याच ब्रा घालायला लागलेल्या मुलींनी आणि त्यांच्या आईने हे लक्षात ठेवायला हवे. 

रात्री झोपताना ब्रा घालणंं योग्य की अयोग्य?

प्रत्येक कपड्यांवर एकाच स्वरूपाची ब्रा घालणे

Sutterstock

ADVERTISEMENT

आता या वाक्याचा आणि स्तनांवरील चरबी वाढण्याचा काय संबंध असा विचार नक्कीच तुमच्या मनात आला असेल. पण काही कपड्यांमध्ये एका विशिष्ट प्रकारची ब्रा घालावी लागते. ज्याचा आकार प्लेन असतो. शर्ट्स अथवा अन्य कपड्यांमध्ये तुम्ही पुश अप ब्रा घालण्याची गरज नाही. तसंच वेगवेगळ्या कपड्यांसह वेगवेगळ्या ब्रा च्या आकाराची गरज भासते. अन्यथा तुमच्या अपर बॉडीला स्तनांचा योग्य सपोर्ट मिळत नाही. तुम्ही जर सतत एकाच स्वरूपाची ब्रा घालत राहिलात तर ब्रा चे वजन वाढते आणि स्तनांवर त्याचा परिणाम होतो. दिसायलाही ते चांगले दिसत नाही. 

वर्षानुवर्षे ब्रा आणि अंडरगारमेंट्स राहतील टिकून, वापरा या सोप्या टिप्स

ब्रा चा हुक वर चढणे

Shutturstock

ADVERTISEMENT

बऱ्याचदा ब्रा कॉटनची असेल तर ही समस्या उद्भवते. जेव्हा कॉटनच्या कपड्याचा धुऊन धुऊन आकार बदलतो तेव्हाही जर ती वापरली गेली तर त्याचा हुक ओढला जातो आणि तो वरच्या बाजूला चढतो. पण अशा तऱ्हेने ब्रा घालणे योग्य नाही. ब्रा चा हुक हा नेहमी समोरच्या बाजूने असायला हवा आणि जर ब्रा वरच्या बाजूने जास्त वर येत असेल ततर त्याचा उपयोग नाही आणि शरीराला ती योग्यरित्या सपोर्ट करत नाही. अशावेळी तुमच्या पाठीवरील चरबी वाढण्याची शक्यता असते. तसंच तुमच्या मानेवरील भागातही यामुळे चरबी वाढण्याची शक्यता असते. कारण तुम्ही तुमचे स्तन अशावेळी जबरस्तीने त्या ब्रा मध्ये फिट करण्याचा प्रयत्न करत असता आणि त्याचा चुकीचा परिणाम त्वचेवर होतो. 

सर्वात टाईट हुकमध्ये ब्रा घालणे

बँडच्या आकारावर तुम्ही श्वास घेतल्यानंतर ब्रा किती खेचली जाते हे ठरते. त्यामुळे तुम्ही नेहमी ब्रा चा शेवटचा हुक लावायला हवा असे नाही. तुम्हाला श्वास घेता येईल अशा तऱ्हेनेच योग्य हुकमध्ये ब्रा घाला. सर्वात जास्त त्रास शरीराची त्वचा ताणली गेल्याने होते. जेव्हा ब्रा खरेदी करता तेव्हा लक्षात ठेवा की, सुरूवातीला नेहमीच ब्रा चा पहिला हुक लावला. शेवटचा हुक लाऊ नये. 

किती तऱ्हेच्या असतात ब्रा, जाणून घ्या कोणती ब्रा कधी वापरायची (Different Types Of Bra In Marathi)

लहान ब्रा घालणे

बऱ्याचदा चुकीची ब्रा निवडली जाते. बऱ्याचदा महिलांना आपल्या कप साईजचा आकार कळत नाही आणि आकारापेक्षा लहान ब्रा घेतली जाते. त्यामुळे खरेदी करताना दोन्ही कप साईज योग्य आहे की नाही हे तुम्हाला पाहावेच लागते. 

ADVERTISEMENT

ब्रा धुताना करू नका या चुका –

ब्रा धुताना तुम्ही लक्षात ठेवा की, जर तुम्ही ब्रा वॉशिंग मशीनमध्ये धुत असाल तर त्याचा आकार बदलू शकतो. जर ब्रा अंडरवायर आणि पॅडेड असेल तर ती तुम्ही हाताने धुणेच योग्य आहे. अशा ब्रा धुताना ब्रश वापरून घासू नका. जर वूल ब्रा फॅब्रिक सॉफ्टनरने धुत असाल तर त्याने इलास्टिक खराब होऊ शकते. वूल फॅब्रिक सॉफ्टनर कपड्यांना अधिक मऊ आणि मुलायम ककरते. त्यामुळे ब्रा चा कप आणि त्याच्या इलास्टिकसह खराब होण्याची शक्यता असते. तुम्ही या चुका टाळल्यास तुमच्या स्तनांचा आकार व्यवस्थित राहील आणि तुमच्या स्तनांना घेऊ द्या मोकळा श्वास!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

10 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT