नवे वर्ष नवी उमेद घेऊन येते. गेलेले वर्ष मागे ठेवून नव्या वर्षात नव्य कोणत्या गोष्टी करु याचा संकल्प केला जातो. संकल्प करणे आणि त्यांचे पालन करणे हे देखील आपल्या हातात असते. येत्या नव्या वर्षात तुम्ही भरपूर फिरण्याचा संकल्प केला असेल तर आज पैशांच्या नियोजनासंदर्भात काही खास टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही पिकनिकसाठी पैसा जमवण्याचा विचार करत असाल तर पैशांचे नियोजन कशा पद्धतीने करायला हवे ते आज आपण जाणून घेऊया. जेणेकरुन नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला काही गोष्टींचा श्री गणेशा करता येईल आणि फिरण्याचा तुमचा संकल्प पूर्ण करता येईल.
2021 मध्ये परदेशात जायचे असेल तर हे देश बसतील बजेटमध्ये
थोडीशी बेरीज वजाबाकी
पैशांचे नियोजन करताना तुम्हाला आधीच्या काही जमाखर्चाचा हिशोब लावणे गरजेचे असते. पगार सुरु झाल्यानंतर भविष्याची तरतूद म्हणून आपण अनेकदा पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवून ठेवतो. त्याचे हफ्ते आपल्याला पुन्हा एकदा जाणून घेणे गरजेचे असते. कारण त्यानंतरच तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पिकनिक करता येतील हे कळू शकते. त्यामुळे सगळ्यात आधी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायची आहे ती म्हणजे सगळी बचत केल्यानंतर तुमच्या हातात अजून किती रक्कम शिल्लक राहते. याचा हिशोब मांडून घ्या.
‘या’ सोप्या टिप्स वापरून करा बचत आणि व्हा श्रीमंत
आता खऱ्या बचतीला सुरुवात
आता नव्या वर्षी फिरायचे प्लॅनिंग आहे म्हणजे तुम्हाला तडकाफडकी पटकन उठून जाता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पैशांचा तरतूद स्वत:च करावी लागेल. त्यामुळे जानेवारीपासून याची सुरुवात करताना तुमच्या इच्छित स्थळी जाण्याचा खर्च किती आहे याचा अंदाज घ्या. त्यानुसार महिन्याला RD काढायला सुरुवात करा. ठिकाण निवडतानाच तुम्ही असे ठिकाण निवडा. जे तुमच्या पगारामध्ये आणि बजेटमध्ये बसणारे असेल
उदा. तुमचा पगार 30 हजार आहे. तुमचा महिन्याचा खर्च 10 हजार आणि तुमची बचत 10 हजाराची असेल. तर उरलेल्या पैशातून तुम्ही हवी असलेली RD ची रक्कम काढू शकता. तुम्ही 2 हजार इतकी रक्कम काढली तरी तुम्हाला 6 महिन्यांनी 12 हजार रुपये मिळतील. या बजेटमध्ये तुम्ही तुमची पिकनिक काढा
लवकर पिकनिकचे प्लॅन करण्यासाठी पैशांची बचत
काहींना RD काढणे आणि त्यासाठी थांबणे हे परवडणारे नसते. अशावेळी तुम्हाला जर लवकर पिकनिक काढायच्या असतील तर आहे त्या पगारात महिन्याचा खर्च कमी करुन पैसै जमवावे लागतील. तुमच्या पगारातील खर्च करण्याच्या पैशांवर तुम्हाला थोडा चिमटा काढावा लागेल. त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत लागेल. पहिल्यांदा या गोष्टी जमणार ही नाहीत. पण जशी तुम्हाला सवय होईल तशी तुम्ही पैशांची बचत करु शकाल. जर तुम्हाला काय कमी करावे कळत नसेल तर तुम्ही थोडासा विचार करा. तुमचे उगीचच पैसे कुठे जातात असे तुम्हाला वाटते?
उदा. हॉटेलिंग, कपड्यांवरचा अतिरिक्त खर्च या गोष्टी बंद करु नका पण थोड्या कमी करुनही तुम्हाला थोडे का असेना पैसै वाचवता येतील.
ट्रॅव्हलिंगमध्ये कसे वाचवावेत पैसे, पर्याय आणि टीप्स
असे करा बुकिंग
जर तुम्ही अशा ठिकाणी जात असाल जिथे बुकिंगपासून सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर काही गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायला हवी. म्हणजे फ्लाईट बुकिंग किंवा ट्रेन बुकिंगसाठी थोडे पैसै आधीच जमवा. या बुकिंगनंतर जर तुमचे बजेट डगमगले असेल तर तुम्ही तो महिना थोडी कळ सोचा आणि त्यानंतरच्या महिन्यानंतर पैसै वाचवा. या बुकिंगमध्ये आणि प्लॅमध्ये किमान 2-3 महिन्यांचे अंतर असू द्या.
आता नव्या वर्षात नक्की फिरा फक्त आम्ही दिलेल्या टिप्सचा नक्की विचार करा.