हिटचा वापर करुन केस कुरळे करत असाल तर अशी घ्या काळजी

हिटचा वापर करुन केस कुरळे करत असाल तर अशी घ्या काळजी

कुरळ्या केस असलेल्यांना सरळ केस आवडतात आणि सरळ केस असलेल्यांना कुरळे केस हवे असतात. आपल्या देशात 100 पैकी 70 लोकांचे केस सरळ असतील तर उरलेल्यांचे कुरळे. आता जास्तीत जास्त लोकांचे केस सरळ असल्यामुळे वेगवेगळ्या हेअरस्टाईल या त्यांना नक्कीच ट्राय करता येतात. त्यामुळे केसांना वेगवेगळ्या स्टाईल करण्यासाठी मशीन्सचा वापर केला जातो. केसांवर हिटचा प्रयोग करणे कोणत्याही केसांसाठी चांगले नाही. सरळ केस करताना फार काळजी घ्यावी लागत नाही. पण केस कुरळे करताना केसांवर हिटचा मोठ्या प्रमाणात वापर करावा लागतो. केस कुरळे करताना नेमकी कशी काळजी घ्यावी लागते ते आता जाणून घेऊया.

केस घ्या विंचरुन

Instagram

केसांची कोणतीही स्टायलिंग करतना केस विंचरुन घेणे महत्वाचे असते. केस कुरळे करताना त्यांचा गुंता झाला असेल तर हा त्रास जास्त वाढू शकतो. त्यावर हिटचा प्रयोग केला तर केस तुटू शकतात. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही केस विंचरुन घ्या. केस व्यवस्थिच विंचरुन झाल्यावर मगच त्यावर टाँग किंवा हिटटा प्रयोग करा. त्यामुळे तुमच्या केसांचा गुंता होणार नाही.

गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

केस सतत विंचरु नका

केस कुरळे केल्यानंतर केस सतत विंचरणे हे चांगले नसते. कारण केसांवर हिटचा प्रयोग करुन तुम्ही केसांना कुरळे करता आणि त्याच केसांची घडी तुम्ही केस विंचरुन खराब करता त्यामुळे तुम्ही केस सतत विचंरु नका.  केसांना हिट दिल्यामुळे केस आधीच नाजूक झालेले असता. त्यामुळे तुम्ही केसांना मुळीच विंचरण्याचा प्रयत्न करु नका. 

मोहरीचा हेअरमास्क वापरून केस होतील अधिक घनदाट

सीरमचा करा वापर

Instagram

केसांवर कोणताही प्रयोग करायचा असेल तर तुम्ही केसांना आधी सीरम लावा. केसांना सीरम लावल्यामुळे केसांवर एक प्रोटेक्शन कव्हर तयार होते. त्यामुळे तुमचे केस डॅमेज होत नाही. त्यामुळे तुम्ही सीरमचा उपयोग करायला विसरु नका. कुरळ्या केसांसाठी एका खास सीरम मिळते. या सीरमच्या उपयोगाने तुम्हाला नक्कीच फायदे मिळतात आणि केस डॅमेज होण्यापासून सीरम अडवते. 

केसांना लावा तेल

जर तुमचे केस मुळात कुरळे नसतील आणि तुम्ही केले असतील तर त्यावर होणारा हिटचा प्रयोग हा जास्त असतो. केसांची मुळ यामध्ये दुखावली गेली नसतील तरी देखील केसांना यामुळे हानी पोहचू शकते. केसांना फाटे फुटणे केस अर्धवट तुटणे असे त्रास यामुळे होऊ लागतात. त्यामुळे तुम्ही ज्या दिवशी केस कुरळे करत असाल त्या रात्री तुम्ही केसांना तेल लावून चांगला मसाज करा. त्यामुळे तुमच्या केसांना चांगला आराम मिळेल.  केस गरम करुन ज्यावेळी तुम्ही स्काल्पला लावता त्यावेळी तुमचे केस अधिक मॉश्चरायईज होतात. केसांची मूळ अधिक मजबूत होतात. त्यामुळे तुम्हाला जेव्हा हवे त्यावेळी तुम्ही तुमचे केस स्टाईल करु शकता.

 

आता हिटचा प्रयोग करुन तुम्ही केस कुरळे करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही  केसांची अशापद्धतीने काळजी घेऊ शकता. 

शॅम्पूच्या वापरानंतर केस होत असतील असे तर आताच सोडा शॅम्पू