केसांसाठी लाकडाचा कंगवा वापरण्याचे फायदे

केसांसाठी लाकडाचा कंगवा वापरण्याचे फायदे

केस विंचरण्यासाठी फार पूर्वी लाकडाचा कंगवा वापरला जात असे. पुढे सोयीप्रमाणे आणि खिशाला परवडणारे प्लास्टिकचे कंगवे बाजारात आले. आजही काही ठिकाणी शोभिवंत लाकडी कंगवे विकत मिळतात. तज्ञ्ज सांगतात केसांची योग्य निगा राखण्यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक प्रसाधने आणि साधनांचा वापर करायला हवा. यासाठीच केस विंचरण्यासाठी लाकडी कंगवा वापरणे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. जाणून घ्या लाकडी कंगवा वापरण्यामुळे केसांना नेमका काय फायदा होतो.

लाकडी कंगवे केसांसाठी आरामदायक असतात

लाकडी कंगवा हा लाकडासारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला असतो. तुमचे केस, स्काल्प आणि डोक्याची हाडे यांना लाकडी कंगवा वापरण्यामुळे आराम मिळतो. लाकडी कंगव्याने केस विंचरताना जास्त गुंता होत नाही अथवा गुंता पटकन सोडवण्यास मदत होते. लाकडी कंगव्यामुळे त्वचेच्या इनफेक्शनचा धोका कमी होतो.

Instagram

केसांच्या मुळांना तेल योग्य पद्धतीने मिळते -

केस लाकडी कंगव्याने विंचरल्यामुळे केसांना लावलेले तेल केसांच्या मुळांना योग्य पद्धतीने मिळेत. शिवाय कंगव्याला लागलेले अतिरिक्त तेल कंगव्याच्या लाकडामध्ये मुरते. प्लास्टिकच्या कंगव्याला मात्र या तेलामुळे चिकटलेल्या धुळ, माती अशा गोष्टी केसांमध्ये अडकतात. ज्यातून पुढे इनफेक्शनचा धोका निर्माण होतो. जर तुमचे केस कोरड्या प्रकारचे असतील तर लाकडी कंगव्यामुळे केसांचे जास्त नुकसान होत नाही.

लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते -

नैसर्गिक घटकांपासून बनलेला असल्यामुळे लाकडी कंगवा जास्त टोकदार नसतो. ज्यामुळे तुमच्या स्काल्पवर ओरखडे अथवा जखमा त्यामुळे होत नाहीत. उलट लाकडामुळे तुमच्या केसांच्या मुळांखालील रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. लाकडाचे दात केसांच्या नाजुक मुळांना हळूवार मसाज करतात. ज्यामुळे तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा चांगला होतो. केसांच्या मुळांमधील रक्तप्रवाह सुधारल्यामुळे मेंदू तरतरीत होतो आणि केस तजेलदार दिसतात. याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरही होतो आणि तुम्ही फ्रेश दिसू लागता.

Instagram

नियमित लाकडी कंगवा वापरल्यामुळे केसांची वाढ चांगली होते -

तेल लावल्यावर केस लाकडी कंगव्याने विंचरल्यामुळे केसांच्या मुळांना मालिश होते. ज्यामुळे केसांच्या वाढीवर चांगला परिणाम होतो. केसांची घनता आणि लांबी यामुळे वाढू लागते. केस गळणे कमी होते आणि केस घनदाट व लांब होतात. लाकडी कंगव्यामुळे केसांच्या मुळांना चालना मिळते आणि केसांमध्ये इनफेक्शन होण्याचा धोका कमी होतो.

केसांमध्ये कोंडा कमी होतो -

जर तुम्हाला वारंवार कोंडा होत असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण कोंडा हे केसांमध्ये होणाऱ्या इनफेक्शनचा एक भयंकर परिणाम आहे. नियमित लाकडी कंगवा वापरण्यामुळे हे इनफेक्शन होणं टाळता येऊ शकतं. शिवाय लाकडी कंगव्याने केस विंचरल्यामुळे केसांमधील कोंड्याचे कण बाहेर टाकले जातात. याउलट प्लास्टिकच्या कंगव्याला मात्र लाकडी कोंड्याचे कण चिकटून राहतात आणि दिवसेंदिवस इनफेक्शन वाढत जातं. 

थोडक्यात अनेक कारणांसाठी प्लास्टिकपेक्षा लाकडी कंगवा केस विंचरण्यासाठी वापरणे फायदेशीर ठरते. बाजारात विविध प्रकारचे लाकडी कंगवे मिळतात. मात्र सावधपणे खरेदी करा कारण बऱ्याचदा लाकडी कंगव्याच्या नावाखाली प्लास्टिकचे कंगवेच विकले जातात. लाकडी कंगवा वापरताना त्याची स्वच्छता राखावी आणि ओल्या केसांमध्ये लाकडी कंगवा वापरू नये.  कारण कंगवा ओला झाल्यास तो लवकर खराब होऊ शकतो. 

Beauty

WIPEOUT Baby Safety Wipes

INR 299 AT MyGlamm