सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही आजवर अनेक ब्युटी प्रॉडक्ट वापरले असतील. मात्र तुम्हाला हवा तसा परिणाम मिळाला असेलच असं नाही. खरंतर महागड्या ब्युटी प्रॉडक्टपेक्षा घरातील काही टाकाऊ पण नैसर्गिक वस्तू जास्त फायदेशीर ठरू शकता. शिवाय हे उपाय करताना कोणतेही दुष्परिणाम आणि कसलाही खर्च होत नाही. पोळ्या करताना गव्हाचे पीठ चाळल्यावर निघणारा कोंडा आपण नेहमी फेकून देतो. गावाकडची मंडळी हा कोंडा गाईला चारा म्हणून देतात. मात्र शहरामध्ये ही गोष्ट टाकाऊच समजली जाते. मात्र हा कोंडा तुमच्यासाठी बेस्ट स्क्रब ठरू शकतो.
कोंडा म्हणजे गहू दळल्यावर गव्हाचे निघणारे आवरण… हा कोंडा तुमच्या सौंदर्यासाठी वरदान ठरू शकतो. कोरड्या, निस्तेज, सनटॅन झालेल्या त्वचेवर या कोंड्याचा अफलातून परिणाम होतो. त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यासाठी आणि त्वचा नितळ होण्यासाठी तुम्ही हा उपाय एकदा तरी करून पाहायला हवा.
Shutterstock
गव्हाच्या कोंड्याचे त्वचेवर होणारे अफलातून फायदे –
गव्हाच्या कोंड्याचे त्वचेवर फारच चांगले परिणाम होतात. ज्यामुळे त्वचेवर या कोंड्याचा फेस स्क्रब अथवा बॉडी स्क्रबप्रमाणे वापर करणं नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.
- गव्हाच्या सालींमुळे त्वचेवरील सनटॅन कमी होतं
- डेड स्किन निघून गेल्यामुळे त्वचा स्वच्छ होते
- त्वचेचे पोअर्स मोकळे झाल्यामुळे त्वचेला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते
- त्वचेवरील धुळ, माती, प्रदूषण, मेकअप निघाल्यामुळे त्वचा स्वच्छ, मऊ आणि मुलायम होते
- त्वचेवरील अस्वच्छता दूर झाल्यामुळे त्वचेवरील डाग कमी होतात आणि त्वचा उजळ दिसू लागते
- त्वचेवरील जुनाट डाग, व्रण, पिगमेटेंशन, काळसरपणा कमी होतो
- त्वचेला गव्हातील पोषक घटकांमुळे योग्य पोषण मिळाल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा नैसर्गिक रित्या मॉईस्चराईझ होते
वाचा – DIY Masoor Dal Face Packs In Marathi
गव्हाच्या कोंड्यापासून कसा तयार कराल स्क्रब –
गव्हापासून तयार केलेला हा स्क्रब तुम्ही चेहरा आणि संपू्र्ण शरीरावरील त्वचेवर वापरू शकता.
साहित्य –
- गव्हाचा कोंडा
- कच्चे दूध
- मध
- लिंबाचा रस
- कसा तयार करावा फेस स्क्रब अथवा बॉडी स्क्रब
- गव्हाचे पीठ चाळून त्यातील कोंडा काढून घ्या
- एका वाटीत हा कोंडा घ्या
- गव्हाचे मोठे कण त्यातून काढून टाका
- कोंड्यामध्ये दूध, मध आणि लिंबाचा रस टाका
- मिश्रण एकजीव करून जाडसर स्क्रब तयार करा
कसा कराल वापर –
- हा स्क्रब तुम्ही फेस स्क्रब अथवा बॉडी स्क्रब प्रमाणे वापरू शकता
- मान, गुडघे, बिकिनी लाईन अशा ठिकाणचा काळसरपणा यामुळे कमी होतो
- स्क्रब वापरण्यापूर्वी त्वचा पाण्याने स्वच्छ करा
- कोरड्या फडक्याने त्वचेवरील पाणी टिपून घ्या
- त्यानंतर त्वचेवर हलक्या हाताना गव्हाच्या कोंड्यापासून तयार केलेला स्क्रब लावण्यास सुरूवात करा
- हाताच्या बोटांनी हलक्या आणि हळूवारपणे सर्क्युलर मोशनमध्ये त्वचेवर मसाज करा
- पाच ते दहा मिनिटे मसाज करा आणि थोडावेळ स्क्रब त्वचेवर तसाच राहू द्या
- स्क्रब सुकल्यावर कोमट पाण्याने त्वचा धुवून टाका
- या स्क्रबमुळे त्वचेवरील डेडस्किन, धुळ, माती, प्रदूषण, घाम निघून जातो
- ज्यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते आणि त्वचेचे पोअर्स मोकळे होतात
- सामान्यपणे स्क्रबमुळे त्वचा जास्त कोरडी होते मात्र कोंड्यामुळे त्वचेला चांगले पोषण मिळते ज्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते
- यासाठी हा स्क्रब वापरल्यावर गरज असेल तरच मॉईस्चराईझर लावा
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
धुतलेल्या तांदळाच्या पाण्याचा वापर करून खुलवा तुमचे सौंदर्य
गव्हाच्या पिठाच्या या तीन फेसपॅकमुळे त्वचा होईल अधिक चमकदार
अभिनेत्री दीपिका कक्कड शिजलेल्या भाताने करते फेशिअल, जाणून घ्या पद्धत