गाजर हलवा बनविण्याची सोपी रेसिपी, असा होतो फायदा

गाजर हलवा बनविण्याची सोपी रेसिपी, असा होतो फायदा

साधारण डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये बाजारामध्ये अप्रतिम गाजरं दिसू लागतात. गाजराचा आपण नेहमी भाजीमध्ये अथवा पुलावामध्ये उपयोग करून घेत असतोच. पण या महिन्यात गाजराचा हलवा जास्त प्रमाणात करण्यात येतो. गाजरचा हलवा वेगवेगळ्या पद्धतीने बनविण्यात येतो. तूप, खवा आणि सुक्या मेव्याने बनलेला गाजरचा हलवा तर तोंडात अक्षरशः पाणी आणतो. पण गाजरचा हलवा खाण्याने काही फायदा होतो का की यामुळे काही नुकसान होते असा प्रश्नही अनेकांना मनात येतो. कारण गाजरच्या हलव्यात असणारी साखर, यामुळे वजन वाढेल की नाही किंवा काही त्रास होईल का असंही मनात येतं. पण या सगळ्या शंका मनातून काढून टाका आणि गाजराचे फायदे जाणून घ्या आणि रूचकर गाजर हलवा कसा बनवायचा ते या लेखातून नक्की शिका.

नारळाची इन्स्टंट बर्फी बनवा घरच्या घरी, सोपी रेसिपी

गाजर हलवा खाण्याचे फायदे

गाजराचा हलवा बनविण्यासाठी मूळ घटक लागते ते म्हणजे  गाजर. गाजरामध्ये विटामिन ए, विटामिन सी, विटामिन के आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. गाजरामध्ये असणारे विटामिन ए हे आपली दृष्टी सुधारण्यास मदत करते. तर हलव्यात वापरण्यात येणारे दूध हे कॅल्शियम आणि प्रोटीन देते. तसंच यातील काजू आणि बेदाणे हे प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंटयुक्त असतात. हलव्यातील शुद्ध तूप आपल्या शरीराला आवश्यक असे फॅट मिळवून देतात. तसंच गाजरचा हलवा खाल्ल्याने हृदयरोगापासूनही तुम्ही दूर राहू शकता. घरात जर लहान मूल असेल तर त्यांना नुसतं गाजर खायला आवडत नाही. पण स्वादिष्ट,  चविष्ट आणि गोड असा गाजरचा हलवा मात्र  आवडतो. एकंदरीतच गाजरचा हलवा खाण्याचे बरेच फायदे आहेत. 

 • यामध्ये फायबर असते जे वजन नियंत्रणात ठेवते 
 • गाजर कोलेस्ट्रॉलशी लढा देण्यासाठी उत्तम आहे आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राखले जाते 
 • गाजर हे  पचनासाठी चांगले आहे. तसंच यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही 
 • विटामिन, मिनरल, अँटीऑक्सिडंटने युक्त गाजर हे प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करते
 • गाजर हलव्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या सुक्या मेव्यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट, विटामिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. शरीरासाठी याची आवश्यकता असते. विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये. त्यामुळे तुम्हाला नुसते खायला आवडत नसतील तर गाजर हलव्याचा स्वाद वाढविण्यासाठीही याची मदत होते 
 • आपल्या त्वचेलाही सूर्याच्या किरणांपासून वाचविण्यसाठी याची मदत मिळते. गाजरातील बीटा कॅरेटिनमुळे त्वचेची सुरक्षा मिळते
 • कॅल्शिमयने उपयुक्त असणाऱ्या दुधाचा यामध्ये वापर करण्यात येतो. त्यामुळे शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते

दुधाच्या या रेसिपी तुमचं वजन घटविण्यासाठी ठरतील फायदेशीर

गाजर हलवा बनविण्याची रेसिपी

गाजरचा हलवा आरोग्यासाठी नक्कीच चांगला आहे. पण यामध्ये खूप कॅलरीही असतात. त्यामुळे तुम्हाला वजन वाढवायचं नसेल तर तुम्ही शुगर प्री वापरा अथवा तुम्ही लो फॅट मिल्क आणि लो फॅट साखरेचाही वापर करू शकता. पण हे तुमच्या आवडीनुसार आहे.  

साहित्य 

 • अर्धा किलो किसलेले गाजर
 • एक मध्यम आकाराची वाटी साखर 
 • वेलची पावडर
 • सुका मेवा कापलेला 
 • अर्धी वाटी मावा (खवा)
 • दोन मोठे चमचे तूप 
 • दूध (हवी असल्यास दुधाची साय वा क्रिम)

कृती 

 • गाजर किसून घ्या. कढईत तूप घाला आणि त्यात किसलेले गाजर घालून परता
 • एका बाजूला पातेल्यात दूध तापवा 
 • गाजर वाफवून थोडे शिजल्यावर त्यात वरून साखर, दूध आणि खवा मिक्स करा
 • हे नीट मिक्स करून पुन्हा शिजवा. शिजत आल्यावर वरून वेलची पावडर आणि सुका मेवा घालून नीट मिक्स करा आणि मस्तपैकी वाटीतून गरम गरम खायला द्या

परफेक्ट उकडीचे मोदक कसे बनवायचे, मराठीत रेसिपी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक