भारतीय घराच उडीदाचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. उडीदाच्या डाळीचा उपयोग करुन इडली, मेदू वडा, डालवडा असे चमचमीत आणि हटके पदार्थ केले जातात. पण उडीद ही आरोग्यासाठी चांगली की, वाईट याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? अख्खे आणि सोललेल्या दोन्ही उडीदामध्ये असे काही घटक असतात जे आरोग्याशी निगडीत वेगवेगळ्या कारणाने फायदेशीर असतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून उडीदाची डाळ किती फायदेशीर आहे ते जाणून घेऊया. करुया सुरुवात
अधिक काळ तूप टिकविण्याच्या सोप्या टिप्स, स्वाद राहील टिकून
व्हिटॅमिन्सचा भंडार
उडीदाच्या डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअम असते. यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे तुम्ही त्याचे सेवन करु शकता. कारण डाळीचा प्रकार असूनही यामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा ही फार कमी प्रमाणात असते. उडदाची डाळ ही त्यामुळे व्हिटिॅमिन्सचा भंडार असलेल्या डाळींचा तुम्ही समावेश करायला हवा. त्यामुळे तुम्ही आहारात उडीदाचा समावेश करा.
पोट राहते साफ
उडीदाची डाळ ही थोडी बुळबुळीत असते. ती वाटल्यानंतरच ती डाळ हाताला बुळबुळीत लागते. म्हणूनच पोट साफ करण्यासाठीही उडदाची डाळ ही महत्वाची असते. जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही आहारात उडीदाच्या डाळीचा समावेश करावा. उडीदाचा उपयोग करुन तुम्हाला नेमके काय बनवायचे असा विचार करत असाल तर तुम्ही उडीदाच्या डाळीचे घुटे किंवा इडली असे पदार्थ बनवून खा. त्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत मिळेल.
मुंगी चावल्यामुळे होणारी त्वचेची जळजळ थांबवण्यासाठी घरगुती उपाय
चेहरा करा स्वच्छ
त्वचेसाठीही उडीदाची डाळ फारच फायदेशीर असते. उडदाच्या डाळीचा उपयोग हा पूर्वीच्या काळीही त्वचेसाठी केला जात असे. आजही अनेक जण चेहऱ्यासाठी उडीदाचा उपयोग करतात. उडीदाची डाळ रात्रभर भिजत ठेवून त्यामध्ये लिंबू, दूध घालून वाटून घ्यावे. त्याचा मास्क तयार करुन चेहऱ्याला लावून ठेवावी. त्यामुळे चेहऱ्याची चमक मिळते. जर तुमची त्वचा खूपच तेलकट असेल तर तुम्ही याचा उपयोग करायलाच हवा. चेहऱ्यावर अनावश्यक असलेले केसही उडीदामुळे कमी होतात.
सांधेदुखीसाठी उत्तम
सांधेदुखीच्या त्रासावरही उडीदाची डाळ ही फारच उत्तम आहे. सांधेदुखीच्या रुग्णांनी एका सुती कपड्यात उडीदाची डाळ बांधावी. तव्यावर गरम करुन त्याचा शेक ज्या ठिकाणी सांधे दुखत आहेत. त्या ठिकाणी शेक द्या. त्यामुळे आराम मिळतो. या शिवाय जर तुम्हाला मालिश करण्यासाठी तेल हवं असेल तर तुम्ही कोणत्याही तेलात उडीद गरम करुन घ्या. त्याचा अर्क उतरला की, त्या तेलाने मालिश करता येते. लहानमुलांनाही तुम्ही हे तेल मालिशसाठी वापरु शकता. अर्धांगवायू असलेल्यांनाही अशापद्धतीने मालिश केल्यास त्यांनाही आराम मिळतो.
प्रवासातील बद्धकोष्ठता टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
वजन वाढते
एखाद्याची शरीरयष्टी कृश असेल तर अशांनी उडीदाच्या डाळीचे सेवन करा. उडीदाच्या सेवनामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत मिळते. जर एखाद्याचे वजन त्यांच्या उंचीच्या मानाने फारच कमी असेल तर अशांनी उडीदापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खावे.
अशा प्रकारे उडीदाच्या डाळीचा समावेश आहारात करावा आणि त्याचे फायदे मिळवावेत.