तुमचे केस हे प्रमाणापेक्षा जास्त कोरडे झाले आहेत का? केसांमध्ये कोंडा झालाय किंवा केसगळतीमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर या सगळ्या समस्यांमधून सुटका करून व्हायला हवी असेल तर काही सोपे हेअरमास्क आहेत. अगदी तुम्ही एका रात्रीतही (overnight) हा फरक केसांमध्ये दिसून येईल. महागड्या पार्लरमध्ये जाऊन ट्रिटमेंट घेण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अगदी एका रात्रीतही हा फरक जाणवून घेऊ शकता. केसांना चमकदार बनविण्यासाठी आणि केसांचा कोरडेपणा घालविण्यासाठी हेअरमास्कचा वापर हा उत्तम उपाय आहे. अशाच काही ओव्हरनाईट अर्थात एका रात्रीत केसांमध्ये फरक आणणाऱ्या हेअरमास्कविषयी जाणून घेऊया.
ओव्हरनाईट हेअरमास्कचे फायदे (Benefits of overnight hairmask)
Shutturstock
हेअरमास्कचे फायदे नक्कीच होतात. तुम्हाला तुमच्या केसांची योग्य काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला याचा उपयोग आणि फायदे दोन्ही माहीत असायला हवे.
- ओव्हरनाईट हेअर मास् हे केसांमधील मऊपणा व्यवस्थित ठेऊन केसांमधील कोरडेपणाची समस्या घालविण्यास मदत करतो
- कोंड्याची समस्या सोडविण्यासाठी याचा उपयोग होतो
- ज्या व्यक्तींचे केस मजबूत नाहीत अशा व्यक्तींच्या केसांना मजबूती देण्याचे काम या हेअरमास्कद्वारे होते. केसांच्या समस्यांवर उत्तम उपाय आहे
कसा करावा याचा वापर
याचा वापर करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे. हाताला आलं आणि लावलं केसाला असं नक्कीच होत नाही. हे कशा पद्धतीने वापरायचे ते आपण पाहूया.
- हेअरमास्क वापरण्याच्या आधी आपल्या केसांसाठी ज्या साहित्याचा आपण वापर करणार आहोत, ते सर्व साहित्य अनुकूल आहे की नाही हे पडताळून घ्या. कोणत्याही पदार्थांची आपल्याला अलर्जी तर नाही ना हे आधी तुम्हाला तपासून घ्यायला हवे
- हेअरमास्क लावण्यापूर्वी केसांना मऊपणा द्या ज्यासाठी तुम्ही टॉवेलचा उपयोग करून घेऊ शकता
- आपल्या केसांना अधिक घनदाट बनविण्यासाठी हेअरमास्कचा उपयोग होतो. तुम्ही याचा वापर करताना व्यवस्थित केसांचे भाग पाडून घ्या आणि मग हेअरक्लिपचा उपयोग करा
- केसांच्या मुळापासून मास्क लावा. तसंच स्काल्पलादेखील मास्क व्यवस्थित लावा
- तुमचे केस लांब असतील तर मास्क लावताना बॉबी पिन्सचा वापर करा. जेणेकरून तुमच्या केसांचा गुंता होणार नाही
हेअर मास्क लावल्यावर केस शॉवर कॅपने झाका - अतिरिक्त काळजी घेण्यासाठी तुम्ही उशीवर एक टॉवेल ठेवा आणि मगच त्यावर डोकं ठेवा
- रात्रभर तुम्ही हे असंच ठेवा आणि सकाळी उठल्यानंतरर तुम्ही कोमट पाण्याने आणि माईल्ड शँपूचा वापर करून आपले केस धुवा
नारळ तेल आणि मधाचा हेअर मास्क
Freepik.com
लागणारे साहित्य
- एक कप नारळाचे तेल
- 2 चमचे मध
बनविण्याची पद्धत
- एका पॅनमध्ये नारळाचे तेल घेऊन ते कोमट तापवा
- हे तेल एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि त्यात मध मिक्स करा
- दोन्ही व्यवस्थित मिक्स झाल्यावर हा हेअर मास्क तुम्ही वर दिलेल्या पद्धतीने केसाला लावा. हेअरमास्क संपूर्ण केसांना
- आणि स्काल्पला व्यवस्थित लागला आहे की नाही याची खात्री करून घ्या
- रात्रभर हे केसांना असंच राहू द्या आणि सकाळी केस व्यवस्थित धुवा
- हा हेअरमास्क आठवड्यातून दोन वेळा वापरा. केसांना नक्की चमक येईल
नारळाचे तेल आणि कोरफड जेल हेअरमास्क
Shutterstock
लागणारे साहित्य
- एक कप नारळाचे तेल
- 2 चमचे कोरफड जेल
बनविण्याची पद्धत
- एका बाऊलमध्ये नारळाचे तेल कोमट करून घ्या आणि त्यात कोरफड जेल मिक्स करा
- दोन्ही नीट मिक्स करून हेअरमास्क तयार करून घ्या. वर सांगितल्याप्रमाणे केसांना लावा
- रात्रभर तसंच ठेवा आणि सकाळी माईल्ड शँपूने केस धुवा. कंडिशनर लाऊ नका
- केसांवर हा हेअरमास्क आठवड्यातून एकदा वापरल्याने केसांची गळती कमी होते
कॅस्टर ऑईल आणि रोझ मेरी ऑईल हेअर मास्क
Shutterstock
लागणारे साहित्य
- एक कप कॅस्टर ऑईल
- 1 चमचा रोझ मेरी ऑईल
बनविण्याची पद्धत
- दोन्ही तेल व्यवस्थित मिक्स करून घ्या. कॅस्टर ऑईलने केसांना फायदा मिळतो
- या हेअरमास्कने व्यवस्थित केसांवर मसाज करका आणि वर सांगितल्याप्रमाणे मास्क लावा
- रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी माईल्ड शँपूने केस धुवा
- हा हेअरमास्क आठवड्यातून एकदा वापरा आणि कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळवा
विशेष सूचना – या लेखात सांगण्यात आलेल हेअरमास्क हे नैसर्गिक आहेत. पण केसांसंबंधी तुम्हाला काहीही त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. यापैकी कोणत्याही तेलाची अलर्जी असल्यास, वापरू नका.
अधिक वाचा –
Baal Badhane ka Tarika
Hair Fall Solution in Hindi
Dandruff Hatane ke Upay
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक