त्वचेला आणि केसांना नवी चमक देण्यासाठी वापरा कोरफड, अफलातून फायदे

त्वचेला आणि केसांना नवी चमक देण्यासाठी वापरा कोरफड, अफलातून फायदे

कोरफडचे अनेक फायदे होतात हे आपण नेहमीच लहानपणीपासून ऐकत आलो आहोत. कोरफड आपल्या त्वचा, केस, पोट आणि संपूर्ण शरीराची वेगवेगळ्या तऱ्हेने काळजी घेत असते. चेहऱ्यावर कोरफड लावल्यापासून ते अगदी कोरफडचा ज्युस पिण्यापर्यंत अनेक प्रकारात आपल्या शरीराला, त्वचेला याचा फायदा होत असतो. अगदी या ज्युसचा पण वेगवेगळ्या प्रकारे वापर करण्यात येतो. खरं तर कोरफडला आयुर्वेदामध्ये संजीवनी म्हटलं जातं. यामध्ये अमीने अॅसिडचं प्रमाण जास्त असतं आणि विटामिन 12 असल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास याची मदत मिळते. कोरफड त्वचेची काळजी घेण्यापासून ते केसांचं सौंदर्य वाढवण्यापर्यंत आणि शरीरावर झालेले घाव भरण्यापासून ते कॅन्सरपासून सुटका मिळवण्यापर्यंत सर्व समस्यांवर गुणकारी औषध आहे. या लेखातून आपल्या त्वचेपासून ते केसांपर्यंत नक्की कोरफडचा कसा फायदा (Benefits of aleo vera for hair and skin) होतो ते आपण पाहणार आहोत. 

1. त्वचेसाठी कोरफड (Aloe Vear for Skin)

Shutterstock

उष्णतेच्या दिवसात घरातून बाहेर पडल्यानंतर त्वचा अधिक टॅन होते. आपल्या सर्वांनाच सनबर्न अर्थात सूर्यकिरणांचा त्रास या काळात होतो. असं असताना तुम्ही घरात आल्यानंतर कोरफडचा वापर करू शकता. तुम्हाला शरीरावर ज्या ठिकाणी टॅन झालं असेल त्या ठिकाणी तुम्ही कोरफडची जेल लावा. याचा तुम्हाला लवकर उपयोग होतो. तसंच टॅन काढून टाकण्यास आणि शरीरावरील स्ट्रेटमार्क काढून टाकण्यासाठीही याचा उपयोग करून घेता येतो. कोरफड पानांचा आतला भाग अर्थात कोरफड जेल जर चेहऱ्यावर लावली तर त्याचा त्वचेसाठी उत्तम फायदा मिळतो. तसंच या जेलमुळे चेहऱ्यावरील टॅनिंगही निघून जातं. कोरफडमध्ये अँटिएजिंग, अँंटिबायोटिक्स गुण असल्याने चेहऱ्यावरील उजळपणा अधिक दिसून येतो. 

कोरफड कशी आहे उपयुक्त आणि काय आहे नुकसान

  • डोळ्यांसाठी कोरफडचा फायदा होतो. आपण सतत लॅपटॉप अथवा कॉम्प्युटरवर काम करत असतो. तसंच टीव्ही अथवा मोबाईलदेखील जास्त पाहतो. त्यामुळे डोळ्यांवर याचा अधिक वाईट परिणाम होत असतो. पण  त्यासाठी तुम्ही कोरफड ज्युसचा वापर केल्यास तुमची ही समस्या दूर होऊ शकते. चष्मा लवकर लागत नाही. 

2. केसांसाठी कोरफडचे फायदे (Benefits of Aloe Vera for hair)

Shutterstock

प्रत्येकाला केसांची काही ना काही समस्या असतेच.  त्यावर कोरफड जेल हा रामबाण इलाज आहे. केसांचा कोरडेपणा, केसगळती आणि केसांमधील कोंडा यासारख्या कोणत्याही समस्येवर तुम्ही कोरफड जेलचा वापर केल्यास, ही समस्या अगदी सहज निघून जाण्यास मदत मिळते. कसा वापर करायचा आपण पाहूया - 

कोरफडाच्या ‘या’ 12 गुणांमुळे वाढेल तुमचे सौंदर्य

  • तुम्हाला मोठे केस हवे असतील तर त्यासाठी तुम्ही कोरफड जेल घ्या त्यात मेथीचे दाणे, तुळशीची पावडर आणि 2 चमचे कॅस्टर ऑईल मिक्स करा. हे पेस्ट तुम्ही केसांना लावा आणि काही तास तसंच ठेवा. नंतर शँपू लावा आणि केस धुवा. हे नियमित केल्यास तुमच्या केसांची वाढ पटकन होते. 
  • केसामध्ये कोंडा झाल्याची समस्या असेल तर कोरफड जेल एक तासासाठी तुम्ही केसांना लावून ठेवा. त्यानंतर केस धुवा. नियमित तुम्ही याचा वापर केलात तर केसांमधील कोंडा निघून जाण्यास मदत मिळते. 
  • आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात केसांकडे बरेचदा दुर्लक्ष होत असते. तर बऱ्याच जणांना कमी वयातच टक्कल पडतं. केसगळती ही तर कॉमन समस्या  झाली आहे. पण कोरफडचा वापर करून या समस्येपासून सुटका मिळवता येते. यासाठी नियमित कोरफड ज्युसचा वापर करावा लागेल. केसांना कंडिशनर लावताना अथवा शँपू लावताना त्यात कोरफड ज्युस दोन चमचे मिक्स करून लावावा. यामुळे ही समस्या दूर होते. 

वजन कमी करण्यासाठी कोरफड ठरते फायदेशीर (Aleo Vera for Weight Loss)

Shutterstock

तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही कोरफडचा उपयोग हमखास करू शकता. त्यासाठी नियमित कोरफड ज्युस पिणं आवश्यक आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा दिवसातून तुम्ही हा ज्युस प्यायल्यास तुमचं लवकर वजन कमी होईल. त्याशिवाय तुम्हाला जास्त व्यायाम करण्याची आवश्यकताही भासणार नाही. 

वजन कमी करण्यासाठी घरीच तयार करा उत्कृष्ट डिटॉक्स ड्रिंक्स

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.