भारतीय खाद्यसंस्कृतीत प्रत्येक पदार्थ बनवण्यामागे एक खास उद्दिष्ट दडलेला असतो. कधी कधी ते पदार्थ वातावरणात होणाऱ्या बदलांनुसार बनवले जातात. तर कधी तुम्ही राहत असलेल्या भौगोलिक परिस्थिती आणि हवामानाचा विचार करून केले जातात. उन्हाळा सुरू झाला की पावसाळ्याआधी घरोघरी लोणचं बनवण्याची पद्धत भारतात आहे. वर्षभराचा मसाला, साठवणीचे पदार्थ आणि लोणचं तयार करणं हा एक खास कार्यक्रमच असतो. लोणच्याच्या सर्व प्रकारांमध्ये लिंबाचे लोणचं हे सर्वाधिक लोकप्रिय आहे. कारण ते चवीला तर चटकदार असतंच शिवाय आरोग्यासाठीही उत्तम असतं. यासाठीच जाणून घेऊ या नियमित लिंबाचे लोणचे खाण्याचे आरोग्यावर काय चांगले परिणाम होतात.
लिंबाच्या लोणच्याचे फायदे ( Health Benefits of Lemon Pickle)
लिंबाच्या लोणच्याचे अनेक फायदे आहेत तोंडाची चव आणण्यापासून प्रतिकार शक्ती वाढवण्यापर्यंत अनेक फायदे तुम्हाला या लोणच्यामुळे मिळू शकतात.
रोगप्रतिकार शक्ती वाढते
सध्या कोरोना महामारीमुळे प्रत्येकालाच प्रतिकार शक्ती वाढवण्याची गरज आहे. कारण जर तुमच्या शरीरात पुरेशी प्रतिकार शक्ती असेल तर कोणत्याही आजारापणातून तुमची सहज सुटका होऊ शकते. प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी योग्य आहाराची गरज आहे. व्हिटॅमिन सी युक्त फळांमधूनही प्रतिकार शक्ती वाढू शकते. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी अशतं यासाठीच लिंबाच्या लोणच्याचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.
रक्तदाब नियंत्रित राहतो
निरोगी आरोग्यासाठी तुमचे रक्ताभिसरण व्यवस्थित असायला हवं. रक्तदाबात नेहमीच चढ उतार होत असतात. मात्र जर ते बराच वेळ कमी अथवा जास्त असेल तर मात्र ते आरोग्यासाठी चांगले नाही. यासाठीच रक्तदाबावर नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे. लिंबाचे गुणधर्म लिंबाच्या लोणच्यात असतात. त्यामुळे या लोणच्यातून तुमच्या शरीराला पुरेसं लोह, तांबे, कॅल्शिअम, पोटॅशिअम असे शरीराला आवश्यक खनिजे मिळतात. शरीराला रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे घटक गरजेचे असतात. लिंबाचे लोणचे खाण्यामुळे तुमच्या शरीराला हे पोषक घटक मिळतात आणि तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. एवढंच नाही तर यामुळे तुमच्या संपूर्ण ह्रदयावरच चांगला परिणाम होतो.
हाडे मजबूत होतात
माणसाचं वय जस जसं वाढत जात तस तसं त्याच्या हाडांची झीज होत जाते. वयानुसार हाडे कमजोर होतात आणि हाडांच्या समस्या निर्माण होतात. महिलांच्या शरीरातील हाडांची झीज त्यांच्या वयाच्या पस्तिशी, चाळीशीनंतर होऊ लागते. यासाठीच त्यांना योग्य प्रमाणात लोह आणि कॅल्शिअमयुक्त पदार्थ आहारात वाढवण्याचा सल्ला दिला जातो. लिंबामध्ये व्हिटॅमिनए, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम भरपूर असतं. हाडांसाठी लिंबाचे सेवन यासाठीच उपयुक्त ठरतं. यासाठीच जर तुमच्या आहारात लिंबाचे लोणचे असेल तर तुमची हाडे मजबत राहू शकतात.
पचनशक्ती सुधारते
लिंबामध्ये शरीर डिटॉक्स करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे लिंबाचा आहारात समावेश असेल तर तुमचे पोट व्यवस्थित स्वच्छ होते. ज्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो आणि तुम्ही खाल्लेले पदार्थ व्यवस्थित पचतात. ज्यांना पोटाचे विकार, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस अशा समस्या आहेत त्यांनी प्रमाणात लिंबाचे लोणचे जेवताना खाण्यास काहीच हरकत नाही.
सूचना- लिंबाच्या लोणच्याचे फायदे जाणून घेताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा लोणचे हे नेहमी लोणच्या ऐवढे म्हणजेच प्रमाणातच खावे. कारण अती प्रमाणात लोणचे खाण्यामुळे तुम्हाला इतर आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
घरी तयार केलेलं लोणचं ‘या’साठी असायला हवं तुमच्या आहारात
लिंबाच्या साली फेकू नका तर असा करा उपयोग
उन्हाळ्यातील बोअरींग जेवणाला करतील ही झटपट लोणची चटकदार