धनप्राप्ती, वजन नियंत्रणात ठेवणे, मन:शांती अशा विविध कारणांसाठी काही खास रत्न वापरले जातात. जर रत्नांवर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर तुम्हाला ‘हिलिंग स्टोन’ या प्रकारविषयी तुम्हाला माहीत असायला हवे. वेगवेगळ्या रंगाचे दिसणारे हे स्टोन वेगवेगळ्या कारणांसाठी घातले जाता. इतर कोणत्याही फॅन्सी स्टोनप्रमाणे दिसणारे हे खडे वेगवेगळ्या रंगाचे असतात. हे स्टोन घातल्यानंतर त्याच्या वापरामुळे आपोआप काही फायदे होत राहतात. नवग्रहाला अनुसार हे स्टोन घालण्याचा सल्ला दिला जातो. हिलिंग स्टोन म्हणजे काय तो कसा फायदेशीर ठरतो? तो कोणी घालावा? आणि त्याचे वेगवेगळे फायदे जाणून घेऊया
शिवाला प्रिय अशा ‘रुद्राक्ष’ घालण्याचे फायदे
हिलिंग स्टोन कोणी घालावा ?
ज्या प्रमाणे एखादे रत्न घालण्यासाठी रितसर सल्ला घ्यावा लागतो. काही रत्न हे कोणत्याही सल्ल्याशिवाय घालता येत नाही. उदा. हिरा हे रत्न कोणीही घालू शकत नाही. तो लाभणे गरजेचे असते. पण हिलिंग स्टोनच्या बाबतीत असे मुळीच होत नाही. हिलिंग स्टोन हा तुम्ही काय इच्छिले आहे आणि तुम्हाला काय हवे आहे याचा विचार करुन निवड करावी लागते. हिलिंग स्टोन हे स्टायलिश असल्यामुळे त्याचे ब्रेसलेट करुन घालता येते. हिलिंग स्टोनचे फायदे पाहता ते अगदी कोणालाही घालता येते. तो घालण्यासाठी तुम्हाला फार काही विचार करावा लागत नाही. जर तुम्ही हिलिंग स्टोन घेण्याचा विचार करणार असाल तर तुम्ही नेमकं कशासाठी हिलिंग स्टोन परिधान करणार असाल याची काही कारणं काढून ठेवा.
हाताच्या रेषांवरून जाणून घ्या तुमची श्रीमंती
हिलिंग स्टोनमधील प्रकार
हिलिंग स्टोनमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. त्याचे रंग हे वेगवेगळे नसतात. तर यामध्ये क्वार्टस, रोझ क्वार्टस, स्मोकी क्वार्ट्झ,जास्पर, अगथिस असे काही प्रकार असतात. जर तुम्ही एखाद्या एक्सपर्टकडून तुमच्यासाठी ब्रेसलेट घेणार असाल तर तुमच्या फायद्यानुसार तुम्ही त्याची निवड करा. काही हिलिंग स्टोन हे तुमच्यातील नकारात्मक उर्जा काढून टाकून सकारात्मक उर्जा भरण्याचे काम करतात. खूप जणांना हिलिंग स्टोनमधील वेगवेगळे प्रकार घातल्यानंतर फायदे झाले आहेत.
साधारणपणे 7 चक्र यामध्ये असतात
एमिथिस्ट – क्राऊन चक्र
कॅरनेलिअन – स्कारल चक्र
यलो जेड- सोलर प्लेक्सस
ग्रीन अॅव्हेच्युराईन-हार्ट चक्र
लापीस लेच्युली- थ्रोट चक्र
क्लिअर क्रिस्टल- थर्ड चक्र
रेड जास्पर – रुट चक्र
असे वेगवेगळे चक्र यामध्ये असतात. ज्याचे वेगवेगळे फायदे आहेत.
घरात लावली घोड्याची नाल तर येईल भरभराट (Ghodyachi Naal For Home According To Vastu)
हिलिंग स्टोनचे फायदे
हिलिंग स्टोनच्या फायद्यांचा विचार करता याचे फायदे अनेक आहेत. त्याचे काही फायदे जाणून घेऊया
- नजरदोषापासून मिळते मुक्ती
- वजन नियंत्रणात ठेवण्यास करते मदत
- सकारात्मक उर्जा देते आणि नव्या कामांना चालना देते
- उत्तम त्वचा मिळण्यास फायदेशीर
- शरीर सुदृढ करण्यास करते मदत
- अचल संपत्ती मिळवण्यास करते मदत
हिलिंग स्टोनचे फायदे जाणून घेत तुम्ही योग्य ठिकाणाहून तुम्ही हिलिंग स्टोनचा वापर करु शकता.