ADVERTISEMENT
home / Fitness
दंड टोन्ड करण्यासाठी जीममध्ये करा हे 5 व्यायाम, दिसेल फरक

दंड टोन्ड करण्यासाठी जीममध्ये करा हे 5 व्यायाम, दिसेल फरक

स्लिव्हलेस किंवा ट्युब टॉप घालण्याचा विचार आपण जेव्हा करतो त्यावेळी अनेक जणं असे कपडे दंडामुळे घालणे टाळतात. खूप जणांचा दंडाच्या आकार हा त्यांच्या शरीराच्या इतर अवयवाच्या तुलनेत थोडा जास्त असतो. थुलथुलीत आणि जाड दंड जर टोन्ड करण्याचा तुमचा विचार असेल तर तुम्ही 5  व्यायाम प्रकार घरच्या घरी केले तरी देखील तुमच्या दंडामध्ये तुम्हाला फरक जाणून येईल. बघुया असेच काही सोपे व्यायामप्रकार

चालताना अथवा धावताना धाप लागत असेल तर या टिप्स करा फॉलो

ट्रायसेप डिप्स ( Tricep Dips)

Giphy

ADVERTISEMENT

दंडाशी निगडीत पहिला असा व्यायामप्रकार म्हणजे ट्रायसेप डिप्स ( Tricep Dips). खूर्चीच्या मदतीने हा व्यायाम करता येतो. या व्यायामामुळे ट्रायसेपवर चांगलाच ताण पडतो. या व्यायामामुळे तुमच्या दंडाना एक चांगला आकार मिळतो. हा व्यायाम करण्यासाठी एखादी लाकडी किंवा न हलणारी खूर्ची घ्या. खूर्चीची अगदीच भीती वाटत असेल तर तुम्ही कोचाच्या कडक भागावरही हा व्यायाम करु शकता. कोचाकडे पाठ करुन उभे राहा. दोन्ही हात समांतर ठेवून खूर्ची किंवा कोचावर ठेवा आणि हातावर जोर देत खाली बसा, पुन्हा वर व्हा. असे तुम्ही सुरुवातील 20 करा मग वाढवा. पहिल्या दिवशी तुम्हाला दंड दुखल्यासारखे वाटतील नंतर आराम मिळेल.

आठवड्याभरात नितंब आणि मांड्या कमी करण्याचे उपाय (How To Reduce Butt Fat)

ट्रायसेप एक्सटेन्शन (Tricep Extension)

Giphy

ADVERTISEMENT

जीममध्ये जात असाल तर हमखास केला जाणाारा व्यायाम प्रकार म्हणजे ट्रायसेप एक्सटेन्शन (Tricep Extension). डंबेल्सच्या साहाय्याने हा व्यायाम केला जातो. तुम्हाला जमतील अशा आकाराचे एक डंबेल घ्या. दोन पायामध्ये खांद्याला समांतर अंतर घेऊन उभे राहा. दोन हातांच्या मध्ये डंबेल घेऊन हात उंच करा. पाठीच्या दिशेने डंबेल खाली खांद्यापर्यंत खाली आणा. असे करताना हाताचे कोपरे कानाच्या जवळ राहील इतके बघा. याचेही सेट तुम्ही जमेल तसे सुरु करा.

पुशअप्स विथ चाईल्ड पोझ ( Pushups With Child Pose)

पुशअप्स विथ चाईल्ड पोझ

Giphy

पुशअप्स हा सर्वांग बॉडीसाठी उत्तम असा व्यायाम आहे. याला थोडेसे पुढे नेत पुशअप्स विथ चाईल्ड पोझ ( Pushups With Child Pose)  हा व्यायाम प्रकार तयार करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला नी पुशअप्सच्या पोझिशनमध्ये बसायचे आहे. सगळ्यात आधी पुढे वाकत पुशअप्स कराययचे आहे. पुशअप्स पोझमधून वर आल्यानंतर तुम्हाला चाईल्ड पोझमध्ये जायचे आहे असे करताना तुमच्या दंडावर चांगलाच ताण पडतो. 

ADVERTISEMENT

घरच्या घरी पायाचा थुलथुलीतपणा कमी करतील Ankle weights वाचा कसे

फ्रंट अॅण्ड साईड अप्स ( Front And Side Ups)

 डंबेल्समध्ये करणारा आणखी एक प्रकार फ्रंट अॅण्ड साईड अप्स… हे करण्यासाठी तुम्हाला डंबेल्स लागेल. आधी लाईट वेटने सुरु करा. एका हात फ्रंट रेझ आणि दुसऱ्या हाताने साईड रेझ असा हा व्यायामप्रकार आहे. दोन्ही हात अल्टरनेट करुन तुम्ही हा व्यायाम करा. असे करताना तुम्हाला दंडावर ताण पडल्यासारखे वाटेल. हा व्यायाम खूपच परिणामकारक आहे. जो करायला काहीच हरकत नाही.

बेंडेंट साईड रेस (Bended Side Raise)

Giphy

ADVERTISEMENT

साईड रेस हा व्यायामप्रकार सगळ्यांनाच माहीत असेल. जीम्स जाणाऱ्यांना हा व्यायाम हमखास माहीत असतो. यासाठी तुम्हाला डंबेल्स लागतील. दोन्ही हातात डंबेल्स हातात घेऊन कंबरेतून खाली वाका. आता साईड रेस करायला घ्या. वर जाताना जोरात आणि खाली येताना अलगद या त्यामुळे तुमच्या दंडावर चांगला परिणाम होतो. 

आता दंड बारीक आणि टोन्ड करायचे असतील तर तुम्ही हे सगळे व्यायामप्रकार ट्राय करा.

28 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT