कोण घालू शकतात 'पुखराज',जाणून घ्या त्याचे फायदे-तोटे

कोण घालू शकतात 'पुखराज',जाणून घ्या त्याचे फायदे-तोटे

पिवळ्या रंगाचा पुखराज हा खडा तुम्ही आतापर्यंत खूप जणांनी घातलेला पाहिला असेल. सोने किंवा चांदीमध्ये हे रत्न जडवले जाते. पुखराज हा शक्तिशाली रत्नांपैकी एक आहे. हे रत्न सकारात्मक शक्तीने भरलेले असते. हे रत्न बृहस्पति ग्रहाचे म्हणजेच गुरु ग्रहाचे रत्न आहे. या खड्याला पुशराज असे देखील म्हटले जाते. पुश राज हे त्याचे संस्कृत नाव असून त्याचे अनेक फायदे आहेत. हे रत्न ज्याला लाभते. त्याला याचा खूपच फायदा होऊ लागतो. पैसा, यश, प्रेम,धर्म अशा वेगवेगळ्या कारणासाठी पुखरा हा धारण करण्याचा सल्ला दिला जातो. चला जाणून घेऊया पुखराज घालण्याचे फायदे

या कारणासाठी धारण करावा पाचू, होईल फायदाच फायदा

पुखराज घालण्याचे फायदे

Instagram

पुखराज घालण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. जाणून घ्या पुखराज घालण्याचे फायदे 

 • पुखराज हे रत्न तुमच्यामध्ये आत्मविश्वास आणण्याचे काम करते. हे रत्न धारण केल्यानंतर  तुमचे भविष्य बदलू शकते. 
  निर्णय घेताना तुम्ही कचरत असाल तर पुखराज तुमच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करतो.  जर तुम्हाला काही बाबतीत असे वाटत असेल की, तुम्ही निर्णय घेण्यास योग्य पद्धतीने घेत नाही अशावेळी तुम्ही पुखराज धारण केल्यास फायदा मिळतो. 
 • पुखराज हा लोकांना तुमच्याकडे आकर्षित करण्याचे काम करतो. तुमच्यामधील आकर्षण वाढवतो. 
 • ज्यांच वय झाले असूनही लग्नाचे योग जुळून येत नसतील अशांनी पुखराज घातल्यामुळे अशांचे लग्न जुळण्यास मदत होते. 
 •  जर तुम्ही न्यायवस्थेशी निगडीत अशा क्षेत्रात काम करत असाल तरी देखील हे रत्न तुम्हाला अधिक लाभदायी ठरते. या रत्नामुळे या क्षेत्रात तुम्हाला चांगली प्रगती मिळते. 
 • पोटाचा त्रास असलेल्यांसाठी पुखराज हा खूपच फायद्याचा आहे. पोटाची बिघडलेली यंत्रणा, कमजोर पचन यंत्रणा यातून सुटका करण्याचे काम पुखराज करते.
 • शिक्षण क्षेत्राशी निगडीत अशा विद्यार्थी वर्गासाठीही पुखराज फारच फायद्याचे रत्न आहे. शिक्षणात उत्तम प्रगती करण्यासाठी हे रत्न फारच फायद्याचे ठरते. 

  ‘हिरा है सदा के लिए’ पण तो कोणी घालावा,जाणून घ्या

पुखराजचे तोटे

Instagram

पुखराज हा खडा तज्ज्ञांच्या सल्ल्याने घालणे हे नेहमीच योग्य असते.

 •  पुखराज हा खडा काही खास राशींना घालण्यासाठी दिला जातो. तुम्ही थेट पुखराज घालू शकत नाही. कारण असा खडा तुम्हाला लाभ देत नाही. तर तो तुम्हाला अधिक त्रास देऊ लागतो. 
 • तुम्ही घेतलेला पुखराज हा खडा जर चकचकीत आणि गुळगुळीत नसेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी होण्याचीही शक्यता असते. 
 • जर पुखराज खडा पाहिल्यानंतर जर तुम्हाला त्यामध्ये खोल खड्डा दिसत असेल तर असा खडा परिधान केल्यामुळे लक्ष्मी येण्याऐवजी लक्ष्मी जाऊ शकते. 
 • जर तुम्ही खरेदी केलेल्या पुखराजवर काळे डाग असतील तर असा पुखराज गृहशांतीसाठी फारच नुकसानदायी ठरु शकते. असा खडा गृहशांती भंग करु शकतो. 
 • असं म्हणतात की,पुखराज या खड्यामध्ये जर जाळी आलेली असेल तर असा खडा परिधान केल्यामुळे  संतानप्राप्ती होण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे असा खडा अजिबात घालू नका. 

पुखराज अर्थात टोपाज याचे फायदे आणि नुकसान लक्षात घेऊन योग्य सल्ल्यानिशी त्याचा वापर करा.

कोणत्या राशीच्या लोकांना कोणता खडा घालणं शुभ आहे, जाणून घ्या (Know Which Zodiac Is Best For People To Wear In Marathi)