लैंगिक आजारांकडे करु नका दुर्लक्ष, होतील गंभीर त्रास

लैंगिक आजारांकडे करु नका दुर्लक्ष, होतील गंभीर त्रास

आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची आपल्या सगळ्यांनाच सवय झाली आहे. काही नाही होत म्हणत आपण बऱ्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तर लैंगिक आजाराविषयीच बोलायलाच नको. खूप जण हा त्रास असूनही तो मानत नाही. याचा परिणाम पुढे फार गंभीर होतो. लैंगिक आजाराविषयी खूप जणांना बोलायला आवडत नाही. स्त्री असो वा पुरुष दोघांनीही या कडे दुर्लक्ष करणे अजिबात चांगले नाही. पण असे कितीही सांगितले तरी अगदी सुशिक्षित वर्ग सुद्धा समाजाने बोट उचलू नये म्हणून या सगळ्या गोष्टी टाळतात. लैंगिक आजार म्हणजे काय? आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर नेमके काय होऊ शकते. हे जाणून घेणे फारच गरजेचे आहे.

Sex Facts जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत

लैंगिक आजार म्हणजे काय?

साध्या शब्दात सांगायचे झाले तर लैंगिक आजार म्हणजे प्रजनन मार्गासंदर्भातील आजार.  हा आजार पुरुष आणि स्त्री या दोघांशी निगडीत असू शकतो. पण जास्त करुन पुरुषांमधील काही कारणास्तव आलेली कमतरता ही लैगिंक आजाराकडे घेऊन जाते. महिलांमध्येही याचे प्रमाण जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये संक्रमित होऊन हा आजार येतो. त्यामुळे याचे प्रमाण महिलांमध्ये जास्त दिसून येते. महिलांच्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळया टप्प्यांवर त्यांना हा त्रास होतो. 

जोडीदारासोबत खूप दिवसांनी सेक्स करत असाल तर अशी करा सुरुवात

महिलांमध्ये लैंगिक आजारांचे प्रमाण जास्त

वर सांगितल्याप्रमाणे महिलांमध्ये संक्रमित होऊन लैंगिक आजार होण्याची शक्यता ही अधिक असते. कारण महिलांची योनी मार्गाची जागा आणि गुद्द्वार याध्ये फार अंतर नसते. त्यामुळे त्यांच्या शरीरात पुरुषांच्या शरीरातील लैंगिक आजाराशी निगडीत घटक जाण्याची शक्यता असते.  त्यामुळे महिलांना लैंगिक आजार अगदी सहज होऊ शकतो. या शिवाय रजोनिवृत्ती, गर्भधारणा यावेळी प्रतिकारशक्ती ही देखील कमी झालेली असते  त्यामुळेही हे आजार त्यांच्या शरीरात संक्रमित होतात. 

लैंगिक आजाराची लक्षणे

तुम्हाला लैंगिक आजार आहे की, नाही हे जाणून घ्यायचे असेल तर काही लक्षणांकडे दुर्लक्ष करुन मुळीच चालत नाही.  पुरुषांमध्ये सर्वसाधारणपणे  लिंगाजवळ फोड येणे, लिंगातून पिवळसर पू बाहेर पडणे, खाज येणे, लिंगाकडील जागा दुखणे, जळजळणे, तोंडामध्ये फोड येणे असे काही त्रास जाणवतात. तर महिलांमध्ये योनी मार्गाला दुर्गंधी येणे, योनी मार्गाजवळ फोड येणे, जळजळ होणे, तोंडात अल्सर होणे अशी काही लक्षण जाणवतात. जर तुम्ही शरीर संबंधात असाल आणि तुमच्या जोडीदाराला असा काही त्रास होत असेल तर तुम्ही योग्य वेळी त्याची तपासणी करुन औषधोपचार करणे हे नेहमीच उत्तम असते. म्हणजे तुम्हाला इतर त्रास होत नाहीत. 

कंडोमची एक्स्पायरी डेट असते की नाही, महत्त्वाची माहिती

आरोग्यावर होतात असे परिणाम

आता लैंगिक आजाराची लक्षणे पाहिल्यानंतर त्याचा शरीरावर त्रास होणे अत्यंत स्वाभाविक आहे. सेक्सची इच्छा नसणे, सतत चीडचीड होणे असे काही त्रास तुम्हाला होऊ शकतात. जे नात्यात राहताना तुमच्या आयुष्यात अडथळा आणू शकतात. लैंगिक आजाराकडे खूप दुर्लक्ष केल्यामुळे वंध्यत्व येण्याती शक्यता असते. याशिवाय एच आय व्ही होण्याची शक्यता असते.  


या आजाराचे गंभीर परिणाम पाहता त्याकडे दुर्लक्ष न करणे हे चांगले.