उन्हाळ्यात सहसा सगळ्यांचीच त्वचा पटकन चिकट होते आणि चेहरा निस्तेज दिसू लागतो. पण प्रत्येकाला आपली त्वचा अगदी सुंदर आणि ताजीतवानी वाटत राहावी असं वाटतं. तुम्ही बाजारातील अनेक उत्पादने आणून त्याचा चेहऱ्यावर प्रयोग करत राहता. पण त्याचा काही उपयोग होत नाही. पण उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी तुम्ही घरच्या घरी एक विशिष्ट फेसपॅक बनवू शकता. बाजारातील अनेक उत्पादने तुम्हाला आकर्षित नक्कीच करतात. पण हे तुमच्या बजेटच्या दृष्टीने नक्कीच भारी पडू शकते. तसंच यामध्ये असणारी केमिकल्स तुमच्या त्वचेला नक्कीच नुकसान पोहचवू शकतात. त्यामुळे नैसर्गिक फेसपॅकचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा अधिक ताजीतवानी आणि सुंदर उन्हाळ्यामध्ये ठेऊ शकता. आम्ही तुम्हाला त्वचा चमकदार ठेवण्यासाठी असाच एक विशिष्ट फेसपॅक सांगत आहोत जो तुमच्या उपयोगी येईल.
तुमची त्वचा 10 मिनिट्समध्ये बनवायची असेल चमकदार तर करा वापरा 'हे' फेसपॅक
उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेवर चमक राहण्यासाठी वापरा पुदीन्याचे 5 फेसपॅक
बेसन - हे एक नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते. पोर्सच्या आतमध्ये जाऊन त्यांना स्वच्छ करण्याचे काम करते. अगदी स्मूथ त्वचेसाठी डेड स्किन सेल्स हटविण्याचे काम बेसन करते. हे त्वचेच्या आत जाऊन सुधारणा करते आणि त्वचा अधिक सुंदर आणि मुलायम दिसण्यासाठी मदत करते
चंदन पावडर - हळदीप्रमाणे चंदन पावडरही त्वचा अधिक चमकदार करण्यास मदत करते. तसंच आपल्या त्वचेचा टोन सुधारण्यासाठीही चंदन पावडरचा उपयोग होतो. चंदन पावडर आणि त्याच्यापासून तयार करण्यात आलेला फेसपॅक यामुळे चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या दूर होतात. जर तुम्हाला सुंदर आणि मुलायम त्वचा हवी असेल तर चंदन पावडरचा उपयोग करून घ्या
हळद - हे अत्यंत नैसर्गिक असून यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचा भरणा भरपूर असतो. जे चेहऱ्यावरील मुरूमं, काळे डाग घालविण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच निरोगी त्वचा हवी असेल तर अँटिटॅनिंग आणि त्वचेला अधिक चांगला उजळपणा येण्यासाठी हळदीचा उपयोग केला जातो.
दही - दह्यातील लॅक्टिक अॅसिड एक कार्बनिक यौगिक असते जे त्वचेला अधिक कोरडी अथवा निस्तेज होण्यापासून वाचवते. ही सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी करते. याशिवाय यामधील प्रोटीन त्वचेचा उजळपणा अधिक आणण्यास मदत करते. दही लावल्याने डेड स्किनही निघून जाण्यास मदत मिळते.
गुलाबपाणी - गुलाबपाणी त्वचेचे पीएच संतुलन नीट राखण्यास मदत करते आणि अतिरिक्त सीबम असल्यास नियंत्रित करण्यासही मदत करते. हे तेलकट त्वचेसाठी सर्वात चांगले मानले जाते. तसंच लालिमा असल्यास, कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.
हे फेसपॅक तुमची त्वचा उन्हाळ्यात अधिक ताजीतवानी आणि गोरी दिसण्यासाठी नक्कीच मदत करतो. वास्तविक हा फेसपॅक संपूर्णतः नैसर्गिक गोष्टींना बनला असल्यामुळे याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. पण तरीही तुम्ही याचा वापर करण्यापूर्वी एकदा पॅच टेस्ट नक्की करून घ्या.
घरगुती फ्रूट फेसपॅक वापरून आणा त्वचेवर ग्लो
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक