केसांची वाढ होईल दुपटीने, घरीच बनवा कडीपत्ता तेल

केसांची वाढ होईल दुपटीने, घरीच बनवा कडीपत्ता तेल

केसांची काळजी घेण्यासाठी आता आपल्या सगळ्यांकडेच पुरेसा वेळ आहे. केसांची योग्य काळजी घेण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी सध्याचा हा लॉकडाऊन काळ एकदम योग्य असून केसांची काळजी घेण्याचा जर तुमचा विचार असेल तर या सुट्टीत केसांच्या वाढीसाठी कडीपत्त्याच्या तेलाचा उपयोग करा. कडीपत्त्यामध्ये काही विशेष गुणधर्म असतात. ते देखील तुम्हाला माहीत हवे. कढीपत्त्यामध्ये कार्बोदकं, फायबर, कॅल्शिअम, फॉस्फरस, आर्यन आणि व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन B आणि व्हिटॅमिन E असते. जे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात. विविध स्तरावर शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार कडीपत्ता हा आरोग्यासाठी तर चांगला आहेच पण कडीपत्त्याच्या नित्य सेवनामुळे तुमचे केस चांगले होण्यास मदत मिळते. कडीपत्त्यापासून तेल तयार करुन त्याचा वापर तुम्ही केसांसाठी करु शकता. जाणून घेऊया नेमके कडीपत्त्याापासून तेल कसे बनवायचे ते

कढीपत्ता खाण्याचे फायदे वाचाल तर आजपासूनच कढीपत्त्याचा वापर कराल सुरू (Curry Leaves Benefits In Marathi)

असे तयार करा कडीपत्त्याचे तेल

Instagram

कडीपत्त्याचे तेल बनवणे हे फार सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला भरपूर कडिपत्याची पाने लागतील. पूर्ण वाढ झालेली कडिपत्त्याची पाने किमान एक टोपभर तरी घ्या. कारण त्यातूनच तुम्हाला एक छोटी बरणी तेल मिळू शकेल. हे तेल कमीत कमी लावले तरी चालू शकते. जाणून घेऊया याची सोपी कृती 

  • सगळ्यात आधी कडिपत्त्याची पाने घेऊन ती स्वच्छ धुवून कोरडी करुन घ्या.
  • एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कडिपत्त्याची स्वच्छ पाने घेऊन आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची कोथिंबीरच्या चटणीप्रमाणे चटणी वाटून घ्या. ही चटणी एकदम बारीक असायला हवी.
  • आता एका भांड्यात ही कडिपत्त्याची पेस्ट घेऊन ती चांगली शिजवायला घ्या. ज्यावेळी कडिपत्याच्या चटणीतून तेल वेगळे होऊ लागेल. जर त्या चटणीमध्ये पाणी खूप असेल तरच तुम्हाला बराच वेळ मिळेल. याशिवाय जर तुम्ही स्लो फ्लेमवर ती शिजवली तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. 
  •  आता जर ही या चटणीचा चोथा वर आला असेल तर तो काढून घ्या आणि ते गाळून घ्या तुमचे कडिपत्ता तेल तयार.

    ओठांचा काळेपणा घालविण्यासाठी वापरा तिळाचे तेल 

असे वापरा कडिपत्ता तेल

Instagram

कडिपत्त्यामुळे केस वाढीला चालना मिळते ही गोष्ट जरी खरी असली तरी देखील त्याचा वापर योग्य पद्धतीने करता यायला हवा. कडीपत्त्यांची  तेल हे आठवड्यातून केवळ एक ते दोन वेळाच लावा.  केसांच्या मुळांना हे तेल लावा. केसांच्या टोकांना लावण्याची फार आवश्यकता नाही. केसांच्या मुळांना हे तेल लावण्यामुळे त्याचा खूपच फायदा मिळतो. केसांमधून कोंडा जाण्यास मदत मिळते. केसांच्या स्काल्पमध्ये अडकलेली घाण निघून जाते आणि केसांची उत्तम वाढ होते. त्यामुळे हे तेल आवर्जून बनवा आणि त्याचा नियमित करा. 

आता केसांच्या चांगल्या वाढीसाठी घरीच अशापद्धतीने कडीपत्त्याचे तेल बनवा. जर तुम्हाला या तेलाचा काही त्रास होत असेल तर याचा वापर त्याचक्षणी करणे थांबवा. 

केसांसाठी वरदान आहे सूर्यफुलाचे तेल, जाणून घ्या वापर