ADVERTISEMENT
home / Recipes
चिकन खायची इच्छा होत असेल तर असे करा मस्त ग्रीन सुकं चिकन

चिकन खायची इच्छा होत असेल तर असे करा मस्त ग्रीन सुकं चिकन

सध्या वातावरणात छान गारवा आला आहे.असा गारवा आला की, मस्त चिकन खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्यात चिकन खाण्याची इच्छा होत नसली तरी देखील पावसाची चाहूल लागली की, चिकनचा बेत हा खूप ठिकाणी होतो. तुम्ही रोज रोज त्याच त्याच पद्धतीचे चिकन खाऊन कंटाळला असाल तर काहीतरी वेगळे खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच ग्रीन सुकं चिकन बनवायला हवं. आता चिकनची ही डिश बनवण्यासाठी तुम्हाला फार काही मेहनत घ्यावी लागते असे अजिबात नाही. चिकनचा हा प्रकार एक स्टाटर डिश असून तुम्ही पोळी किंवा भातासोबतही खाऊ शकता. नाहीतर नुसतं खाल्लं तरी देखील तुम्हाला त्याचा आनंद नक्कीच घेता येईल. चला तर जाणून घेऊया कसं बनवायचं ग्रीन सुकं चिकन

महाराष्ट्रीयन थाळीमध्ये हे पदार्थ करा समाविष्ट (Maharashtrian Thali Menu In Marathi)

ग्रीन सुकं चिकन

सगळ्यात आधी तुम्हाला चिकन आणावे लागेल. आता खूप जणांना चिकन हे बोनलेस आवडतं. पण तुम्ही जर तुम्ही संपूर्ण चिकन घेतलं तर तुम्हाला ते अधिक चविष्ट आणि एकदम गावरान चिकनची आठवण करुन देईल असं लागेल.  त्यामुळे तुम्ही हे चिकन करताना पूर्ण ब्रॉयलर चिकन घ्या. 

साहित्य:  1 किलो चिकन, 1 मोठी जुडी कोथिंबीर, 1  जुडी पुदिना,वाटीभर कडिपत्त्याची पानं, चवीनुसार हिरव्या मिरच्या, मीठ, लिंबू, पाव किलो दही, 3 ते 4 मोठे चमचे आलं-लसूण पेस्ट, मीठ, तेल, लिंबू 

ADVERTISEMENT

कृती:  

  • सगळ्यात आधी तुम्हाला चिकन मॅरिनेट करायला घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला चिकन बारीक करुन घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ,घालून एकत्र करुन घ्या.
  • एका मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, कडिपत्त्याची पानं, लिंबू असे सगळे एकत्र करुन घ्या.त्याचे एक वाटप करुन घ्या. 

कोळंबी आवडते? मग बनवा झक्कास कोळंबी रेसिपी (Kolambi Recipes In Marathi)

सुकंच चिकन

Instagram

ADVERTISEMENT
  • चिकनमध्ये  ही तयार कोथिंबीरची चटणी घालून त्यामध्ये दही घालायला विसरु नका. हे चिकन चांगले मॅरिनेट होऊ द्यायचे असेल तर तुम्ही किमान 5 ते 7 तास तसेच ठेवा. त्यामुळे त्या चटणीची चव त्यामध्ये छान उतरेल. 
  • चिकन चांगले मॅरिनेट झाले की, चिकन शिजवण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या कढईत तेल गरम करुन त्यामध्ये हे मॅरिनेट केलेले चिकन शिजवायला घ्यायचे आहे.  आच मध्यम करुन हे चिकन शिजवायला घ्यायचे यामध्ये पाणी टाकण्याची फारशी गरज नसते. कारण दही आणि चटणीतील पाणी सुटल्यामुळे हे मिश्रण चिकनला लागलेले असते. त्यामुळे चिकन छान शिजते. 
  • चिकन चांगले शिजले की, ते मस्त काढून कांदा आणि लिंबूसोबत सर्व्ह करा. याशिवाय तुम्हाला जर हा पदार्थ अधिक चटपटा करायचा असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडासा स्मोक करण्यासाठी कोळसा घाला याशिवाय तुम्ही त्यावर चाट मसाला भुरभुरला तरी चालेल

रोजच्या चिकनला चटपटीत असा हा पर्याय आहे. त्यामुळे हा नक्की ट्राय करा.

कधी मुंबईत किंवा पुण्यात आलात तर नक्की ट्राय करा या थाळी

21 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT