नाजूक स्टोन वर्क केलेल्या साड्यांची अशी घ्या काळजी

नाजूक स्टोन वर्क केलेल्या साड्यांची अशी घ्या काळजी


साडी हा प्रत्येक स्त्रीचा आवडीचा विषय असतो. सहाजिकच तिच्या वॉर्डरोबमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या साड्यांचे कलेक्शन असते. जर तुमच्या साडी कलेक्शनमध्ये अशीच एखादी नाजूक स्टोन वर्क केलेली साडी असेल. तर या साडीची काळजी विशेष घ्यावी लागते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी स्टोन वर्क वाली साडी कधीच आऊट डेटेड होत नाही. त्यामुळे ही साडी अनेक वर्ष वापरू शकता. मात्र या साड्या टिकवणं हे एक आव्हानच असतं. कारण  त्यांच्यावर केलेल्या स्टोन वर्कमुळे त्यांची देखभाल काळजीपूर्वक करावी लागते. यासाठीच या टिप्स फॉलो करा ज्यामुळे वर्षानुवर्ष तुमची स्टोन वर्कची साडी जशीच्या तशी राहिल.

स्टोनची साडी धुताना काय काळजी घ्याल

साडी स्टोनची असो वा कोणतीही ती जास्त काळ टिकवण्यासाठी नेहमीच ती धुताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 

 • लक्षात ठेवा, स्टोनचं वर्क केलेली साडी तुम्ही घरी नक्कीच धुवू शकत नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे डिटर्जंटमुळे अशा साड्यांची चमक कमी होते शिवाय जर त्याच्यावरील स्टोन चिकटवलेले असतील तर ते साडी धुताना निघण्याची शक्यता असते. 
 • यासाठीच स्टोन वर्क केलेली साडी नेहमी ड्राय क्लिन करा.
 • जर तुम्हाला स्टोन वर्कची साडी घरी धुवायची असेल तर ती बेबी शॅम्पूमध्ये पंधरा ते वीस मिनट बुडवा आणि साध्या पाण्याने आणि हाताने चोळून धुवा
 • स्टोन वर्कची साडी वॉशिंग मशिनचे ड्राअर अथवा कडक उन्हात वाळवू नका. रात्री ही साडी मोकळ्या जागेत परसवून सुकवा.
instagram

स्टोनची साडी कपाटात कशी ठेवाल

साडी धुण्यासोबतच ती वॉर्डरोबमध्ये कशी ठेवावी हे समजलं तर तुमची साडी वर्षानुवर्ष टिकू शकेल.

 • स्टोनची साडी वॉर्डरोबमध्ये ठेवताना ती इतर कपड्यांमध्ये मिसळून ठेवू नका. कारण  इतर फॅब्रिकच्या  दोऱ्यामध्ये अडकून साडीचे स्टोन निघून जातील.
 • तुम्ही साडीच्या बॉक्समध्ये एखाद्या सुती कापडामध्ये गुंडाळून ही साडी ठेवू शकता.
 • हॅंगरला अडकवण्याची गरज असल्यास ती एखाद्या  सुती कापडात आधी कव्हर करा आणि मगच  अडकवून ठेवा.
 • काही गोष्टी पाळल्या  तर तुमच्या साडीचा रंग, पोत आणि स्टोनचे डिझाईन कायम तसेच राहिल.
instagram

स्टोनची साडी नेसताना काय काळजी घ्यावी

जर तुम्हाला तुमची महागडी स्टोनची साडी जास्त काळ टिकवायची असेल तर ती ड्रेप करताना अथवा नेसताना तिची नीट काळजी घ्या.

 • स्टोनची साडी नेसताना ती व्यवस्थित पिन अप करा ज्यामुळे ती जमिनीवर लोळणार नाही.
 • स्टोनची साडी नेसल्यावर सिंगल पदर घेतला तर तो कुठेही अडकणार नाही याची काळजी घ्या. जमत नसेल तर साडीचा पदर पिन अप करून फिक्स करा. 
 • साडीसोबत कॅरी केलेले दागिने स्टोनमध्ये अडकणार नाहीत असे असावे. 
 • साडीसोबत अशी पर्स कॅरी करा ज्यामुळे साडीचे स्टोन खराब होणार नाहीत. 
 • जर एखादा स्टोन निघालाच तर साडी पुन्हा नेसण्याआधी तो त्या जागी पुन्हा लावून घ्या
 • साडीवर डार्क परफ्यूम वापरू नका त्यातील केमिकल्समुळे साडीचे स्टोन खराब होऊ शकतात. 

Beauty

Tinted Perfection Brightening Banana Primer

INR 1,095 AT MyGlamm