ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
हे नवे ट्रेंड बिनधास्त करा फॉलो, मांड्या अजिबात दिसणार नाहीत जाड

हे नवे ट्रेंड बिनधास्त करा फॉलो, मांड्या अजिबात दिसणार नाहीत जाड

जाड असणं मुळीच वाईट नाही. पण कधीकधी काही फॅशन ट्रेंड कॅरी करताना ते आपल्याला चांगले दिसतील की, नाही अशी भीती साधारण सगळ्यांमध्ये असते. त्यातल्या त्यात तुम्हाला फॅशन करायला खूप आवडत असेल तर खूप जणांना काही फॅशन करताना शरीरामुळे काही अडचणी येतात असे वाटते. खूप जणांचे शरीर बारीक असते. पण तुलनेने मांड्या या अधिक जाड असतात. जर काही ट्रेंड फॉलो करताना तुम्हाला मांड्या जाड दिसण्याची भीती असेल तर नव्या काही ट्रेंडसह तुम्ही त्या कशा कॅरी करायला हव्यात ते जाणून घेऊया.

साडी कधीही न नेसणाऱ्यांसाठी या साड्या आहेत कॅरी करायला सोप्या

बॅगी पँटस

बॅगी पँटस

Instagram

ADVERTISEMENT

सैलसर अशा आणि पोत्यासारख्या दिसणाऱ्या या पँट्स या आधीच्या काळी देखील होत्या. आता या नव्या काळात या बॅगी पँट्स अनेक मोठ्या ब्रँडमध्ये दिसतात. तुमच्या मांड्या जाड असल्या तरी या बँगी पँटमध्ये दिसून येत नाही. कारण या पँट्स आघीच मांड्यांकडून बऱ्याच सैल असतात. आता तुम्हाला जर या पँट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. या अशा प्रकारच्या पँट्सवर ट्युब टॉप, स्पगेटी चांगल्या शोभून दिसतात. अशा पँट्स तुम्ही बिनधास्त तुमच्या कपाटात ठेवा तुम्हाला त्या नक्कीच आवडू लागतील. 

शॉर्ट ड्रेस घालायचा विचार करताय, सोप्या टिप्स करा फॉलो

शर्ट ड्रेस

शर्ट ड्रेस

Instagram

ADVERTISEMENT

वनपीस घालायला आवडत असतील तर तुम्ही मस्त शर्ट ड्रेस निवडा. अनेकदा शर्ट ड्रेस हे शॉर्ट आणि नी लेंथ पर्यत मिळतात. पण तुमच्या जाड मांड्यापासून तुमचे लक्ष तुमच्या ड्रेसकडे न्यायचे असेल तर तुम्ही कमरेला चांगला लेदर बेल्ट वापरा. हे लेदर बेल्ट खूप चांगले दिसतात. त्यामुळे तुमची कंबर ही बारीक दिसते आणि ड्रेस हा सुंदर दिसतो. त्यामुळे तुम्ही शर्ट ड्रेस ट्राय करा.कॉटन आणि जीन्स मटेरिअलमध्ये मिळणारे असे हे ड्रेस नक्कीच चांगले दिसतात.

हाय वेस्टेड टाईट जीन्स

हाय वेस्टेड टाईट जीन्स

Instagram

तुम्ही आतापर्यंत हाट वेस्टेड अशा जीन्स नक्कीच पाहिल्या असतील. खास कर्व्ही बॉडीसाठीच या पँट्स असतात. अशा पँट्स तुमच्या कंबरेला एकदम बारीक दिसतात. तर तुमचा मांड्याचा आकार यामध्ये एखाद्या हवरग्लासप्रमाणे दिसतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहे त्या शरीराला सुंदर करायचे असेल तर तुम्ही मस्त हायवेस्टेड टाईट जीन्स घाला. त्या तुम्हाला नक्कीच चांगल्या दिसतील. यावर  तुम्हाला क्रॉप टॉप, शॉर्ट टॉप असं काहीही घालता येईल. 

ADVERTISEMENT

टाईट ड्रेस घातल्यानंतर तुमचेही होते असे, तुम्हाला माहीत हव्या योग्य पँटीज

बॉयफ्रेंड जीन्स

Instagram

थोड्याशा लुझ अशा प्रकारातील या पँटची स्टाईल आता बरीच प्रसिद्ध आहे. कधीकधी टाईट जीन्सपेक्षा अशा लुझ पँट नेहमीच चांगल्या दिसतात. त्यामुळे तुम्ही अशा बॉयफ्रेंड जीन्स नक्कीच ट्राय करा. या जीन्समध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न मिळतील. तुम्हाला अगदी फॉर्मल लुक देण्याबरोबर थोडा फंकी लुक देणारेही अनेक पर्याय यामध्ये आहेत. शर्टवर हा पर्याय अधिक चांगला दिसतो त्यामुळे तुम्ही त्यावर एखादा ओव्हसाईज शर्ट ही घालू शकता. यामध्ये तुम्हाला तुमच्या मांड्या अजिबात जाड दिसणार नाहीत.

ADVERTISEMENT

पलाझो जीन्स

पलाझो जीन्स

Instagram

आता पलाझो पँट्सचा काळ आहे खूप जणांकडे अशा प्रकारच्या पलाझो पँट्स असतील. अगदी त्याच प्रमाणे हल्ली बॉटम मोठ्या असलेल्या पलाझो पँट्स येतात. या पँट्स नक्कीच खूप वेगळ्या दिसतात. तुमची उंची असेल आणि तुम्हाला थोडा वेगळा पर्याय हवा असेल तर तुम्ही पलाझो जीन्स असा पर्याय निवडू शकता. हा पर्याय तुम्हाला नक्की आवडेल असा आहे. यामध्ये तुमच्या मांड्या जाडही दिसणार नाहीत. 


आता हे नवे ट्रेंड खास तुमच्यासाठीच बनले आहेत जे तुम्ही नक्की ट्राय करायला हवेत.

ADVERTISEMENT
13 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT