ADVERTISEMENT
home / Fitness
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर होऊ शकतात हे त्रास, काळजी करु नका

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर होऊ शकतात हे त्रास, काळजी करु नका

कोरोनाने गेली दोन वर्ष सगळ्यांना भांडावून सोडलं आहे. या व्हायरसपासून सुटका होण्यासाठी लॉकडाऊन करुन हा आजार नियंत्रणात आणला गेला. पण तरीही त्याला सॉलिड उपाय म्हणून लसीकरणाची जोड आता मिळाली आहे. खूप संशोधन केल्यानंतर आता यावर कोव्हिडशिल्ड (Covidshield) आणि कोवॅक्सिन (Cowaxin) नावाच्या लसी तयार करण्यात आल्या आहेत.शरीरात अँटी-बॉडीज तयार करण्यासाठी या लसी योग्य असल्यामुळे यांची निवड करण्यात आली आहे. पण ही लस घेतल्यानंतर काही जणांना काही त्रास नक्कीच जाणवू लागला आहे. जर तुम्हीही लसीकरण करणार असाल किंवा लसीकरण नुकतेच झाले असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती

दम्याच्या रूग्णांनी कोविड काळात विशेष काळजी घेणे आवश्यक, तज्ज्ञांचे मत

ताप (Fever)

लसीकरणानंतर खूप जणांना ताप येतो. ताप येणे हे यामध्ये सर्वसाधारण लक्षण आहे. याचा त्रास पटकन होत नाही. पण काही जणांना साधारण 7 ते 8 तासानंतर ताप येण्याची शक्यता असते. हा ताप सणकून येतो. खूप जणांना अंग मोडून ताप येतो. या तापामध्ये खूप थंडी वाजते. त्यामुळे काहीतरी वेगळे झाले नाही ना ही भीती वाटणे अगदी स्वाभाविक आहे. पण भीती वाटण्यासारखे काही कारण नाही. कोणतेही वॅक्सिन घेतल्यानंतर जाणवणारे हे अगदी कॉमन लक्षण आहे. काही जणांना तर ताप येत सुद्धा नाही. पण काही जणांना ही लस घेतल्यानंतर ताप येतो. या तापावर खास औषधही दिले जाते. ज्याचे सेवन केल्यानंतर तुम्हाला बरे वाटते.

लॉकडाऊन दरम्यान तुमच्याही बाळाचे लसीकरण चुकलंय, तर घाबरू नका

ADVERTISEMENT

अंगदुखी

लस घेतल्यानंतर हमखास होणारा त्रास म्हणजे ‘अंगदुखी’ ज्या हातावर लस घेतली तो हात दुखणे आणि संपूर्ण शरीर जड वाटणे हे लस घेतल्यानंतर अगदी स्वाभाविकपणे होते.  कोव्हिडची लस घेतल्यानंतर प्रचंड थकवा येतो. अंगातून सगळा त्राण निघून गेल्यासारखा वाटतो. त्यामुळे तुम्हाला अंग दुखी होत असेल आणि अंग खूप जड वाटत असेल तर घाबरुन जाऊ नका. त्याऐवजी तुम्ही छान आराम करा. कोणताही वर्कआऊट किंवा व्यायाम करु नका. कारण त्यामुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंगदुखी होत असेल तर आराम करा.

झोप येणे

लस घेतल्यानंतर खूप जणांना डुलकी येऊ लागते. सतत झोपावे असे वाटते. हे देखील अगदी सर्वसाधारण असे लक्षण आहे. खूप जणांना झोप येऊ लागते. ही झोप येणे अगदी स्वाभाविक आहे. जर तुम्हाला अशी झोप सतत येत असेल तर काहीही हरकत नाही.  कारण तुम्हाला अशी झोप येत असेल तर तुम्हाला आरामाची सक्त गरज आहे हे समजून घ्यावे. तुम्ही नीट झोपून काढले तरी चालू शकते. त्यामुळे छान झोपा. आराम करा. तुमच्या शरीरात अँटी-बॉडीज तयार झालेल्या आहेत हे लक्षात घ्या आणि आराम करा.

काळी बुरशी ची लक्षणे

करु नका या चुका

लस घेतल्यानंतर काही गोष्टी या कटाक्षाने टाळणे गरजेचे असते.अशा गोष्टी तुम्ही मुळीच करु नका असा सल्ला दिला जातो.

ADVERTISEMENT
  • लस घेतल्यानंतर हात दुखतो म्हणून त्याला बर्फ लावण्याची चुकी करु नका.
  • या काळात जेवण्याची इच्छा होणार नाही. पण जेवण सोडू नका. सूप्स, लिक्वीड असा आहार असू द्या.
  • व्हेजिटेबल सूप्स किंवा चांगला आहार घ्या. त्यामुळे तुम्हाला लवकर बरे वाटेल.
  • व्यायाम करण्याची चुकी मुळीच करु नका. त्यामुळे तुम्हाला अंगदुखीचा त्रास जास्त होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या.आता कोरोना लस घेतली असेल तर तुम्ही या गोष्टींची काळजी नक्की घ्या.

कोरोनासंदर्भातील या भाकीतांवर कधीही ठेवू नका विश्वास

06 Jun 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT