ADVERTISEMENT
home / आरोग्य
mucormycosis symptoms in marathi

काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस ची लक्षणे (Mucormycosis Symptoms In Marathi)

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा धोका कमी होत नाही तोवर म्युकरमायकोसिसने घातलेल्या थैमानाने अनेकांची भीतीने गाळण उडाली होती. काही ठिकाणी तर काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस ही देखील एक महामारीच आहे असं घोषित करण्यात आलं होतं. अनेकांना काळी बुरशीची लागण झाल्यामुळे गंभीर आरोग्य समस्येला तोंड द्यावं लागलं होतं. या काळात कोविड रूग्णाला या संक्रमणाचा धोका जास्त असल्याचं दिसून आलं होतं. भारतातही कोरोना पाठोपाठ म्युकरमायकोसिसचे अनेक रुग्ण सापडल्यामुळे या संक्रमणाविषयी अधिक संशोधनाची गरज निर्माण झाली. वास्तविक कोविड महामारीआधीही म्युकरमायकोसिस इनफेक्शन वातावरणात होतेच. मग या  काळातच या  बुरशीचा दुष्परिणाम सर्वात जास्त का जाणवला? काळी बुरशी या फंगल इनफेक्शनचे शास्त्रीय नाव आहे म्युकरमायकोसिस… यासाठीच जाणून घ्या काळी बुरशी म्हणजे काय आणि काय आहेत म्युकरमायकोसिस ची लक्षणे (Mucormycosis Symptoms In Marathi).

म्युकरमायकोसिस म्हणजे काय (What Is Mucormycosis)

symptoms of mucormycosis in marathi
Mucormycosis Symptoms In Marathi

काळी बुरशी म्हणजे म्युकरमायकोसिस (Mucormycosis Symptoms in Marathi) हे एक गंभीर आणि दुर्मिळ फंगल इनफेक्शन आहे. म्युकरमायसिटीस या विषाणूमुळे हे संक्रमण नाकावाटे होते. वातावरणातील धुळीचे कण, माती, सडलेले पदार्थ, संक्रमित वस्तूंमधून हा आजार पसरण्याची जास्त शक्यता असते. कोरोनाप्रमाणेच नाकातून श्वासावाटे अथवा त्वचेतील जखमेच्या संपर्कात ही बुरशी आल्यामुळे या इनफेक्शनची लागण होते. हा आजार भयंकर आणि आटोक्यात न येणारा असल्यामुळे तगेच त्याचे संक्रमण फुफ्फुसे, त्वचा आणि मेंदूवर झटपट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनाप्रमाणेच गेले वर्षभर म्युकरमायकोसिस (Symptoms Of Mucormycosis In Marathi) या रोगानेही देशभरात थैमान घातलेले आहे. विशेष म्हणजे दहा ते  पंधरा दिवसात हा आजार तीव्र स्वरूप धारण करतो. यासाठीच या संक्रमणाबाबत प्रत्येकाला माहिती असणं गरजेचं आहे. फंगल इनफेक्शनचे प्रकार आणि नैसर्गिक उपाय (Fungal Infection On Skin In Marathi)

म्युकरमायकोसिस ची लक्षणे (Mucormycosis Symptoms In Marathi)

काळी बुरशी नाकावाटे शरीरात प्रवेश करते आणि शरीरभर पसरते. हे फंगल इनफेक्शन इतर संक्रमणापेक्षा भयंकर आणि आटोक्यात न येणारे असल्यामुळे याची प्राथमिक लक्षणे जाणवताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासाठीच जाणून घ्या  म्युकरमायकोसिस ची लक्षणे (Mucormycosis Symptoms in Marathi).

नाकाचा आतील भाग काळा होणे (Blackish Discolouration Around The Bridge Of The Nose)

नाक आणि चेहऱ्यामध्ये बदल जाणवणे हे म्युकरमायकोसिसचे प्राथमिक लक्षण (Mucormycosis Symptoms in Marathi) आहे. हे संक्रमण झपाट्याने होत असल्यामुळे प्राथमिक लक्षण ओळखणे खूप गरजेचे आहे. या संक्रमणामुळे नाकामध्ये काळे चट्टे उठतात. नाकपुड्या आतून काळ्या झाल्यामुळे कधी कधी नाकातून काळा स्त्राव येऊ लागतो. नाकावाटे इनफेक्शनला सुरूवात झाल्यामुळे जर हे लक्षण पटकन समजले तर काळी बुरशी आटोक्यात येऊ शकते. नाकातून पाणी येणे घरगुती उपाय (Nakatun Pani Yene Upay)

ADVERTISEMENT

ताप (Fever)

नाकावाटे म्युकरमायकोसिसने शरीरात प्रवेश केल्यावर सर्वात आधी रुग्णाचा श्वसनमार्ग संक्रमित होतो. जर रुग्णाची प्रतिकार शक्ती कमी असेल तर संक्रमण झपाट्याने होण्याची शक्यता वाढते. विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी शरीराचे तापमान वाढू लागते. काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्यामुळे रूग्णाला तीव्र ताप येतो. जर एखाद्याला खूप ताप असेल तर ते कोविडप्रमाणेच काळ्या बुरशीचे लक्षणही (Mucormycosis Symptoms in Marathi) असू शकते.

खोकला (Cough)

काळी बुरशी नाकावाटे थेट फुफ्फुसामध्ये गेल्यामुळे सर्वात आधी रूग्णाला खोकला, छाती दुखणे अशा समस्या जाणवतात. कारण ही बुरशी सर्वात आधी रुग्णाच्या श्वसन संस्थेवर हल्ला करते. या सर्व प्रक्रियेत नाकातून रक्त येणे, नाक चोंदणे, गंध न येणे, तीव्र खोकला अशी लक्षणे जाणवू शकतात. काही रूग्णांना खोकल्यावाटे रक्त पडण्याची अथवा रक्ताची उलटी येण्याची शक्यता असते. कोविड-19 मुळे गेलेली तोंडाची चव/वास घेण्याची क्षमता पुन्हा मिळवण्यासाठी करा उपाय

छाप लागणे (Shortness Of Breath)

नाकातून संक्रमणाला सुरूवात झाल्यामुळे श्वसन मार्गावर याचा विपरित परिणाम होतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो. ज्यामुळे सतत छाप लागणे आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे छातीत जळजळ जाणवते. संक्रमण होताच थोड्याच वेळात हा त्रास सुरू झाल्यामुळे नाक चोंदणे आणि धाप लागणे यावरून तुम्ही काळी बुरशीची लागण झाल्याचे लगेच निदान करू शकता. 

तीव्र डोकेदुखी (Excruciating Headaches)

Excruciating headaches)
Mucormycosis Symptoms In Marathi

काळी बुरशी म्हणजे म्युकरमायकोसिस जेव्हा नाकावाटे रुग्णाच्या शरीरात प्रवेश करतो. तेव्हा त्याचा संपर्क तुमच्या नाकाच्या पोकळीत होतो. नाकपुडी आणि नाकातील रक्तवाहिन्या या बुरशीने संक्रमित झाल्यामुळे त्याचा परिणाम तीव्र डोकेदुखीत होतो. ज्यांना काळी बुरशीचे संक्रमण झाले आहे अशा रुग्णांना भयंकर डोकेदुखीला सामोरे जावे लागते. त्यामुळे जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळ्या स्वरूपातील तीव्र डोकेदुखी जाणवत  असेल तर या समस्येचे वेळीच निदान करणे गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT

दृष्टी कमजोर होणे (Vision Impairment)

काळी बुरशीची शरीराला लागण झाल्याचे आणखी एक लक्षण (Mucormycosis Symptoms in Marathi) म्हणजे दृष्टी अधू अथवा कमजोर होणे. कारण काळी बुरशी फार झपाट्याने वाढते आणि पसरते. ज्यामुळे डोळ्यांना संक्रमण झाल्यास रुग्णाच्या दृष्टीवर परिणाम होतो. अशा वेळी डोळे सूजतात आणि  रुग्णाला कमी दिसण्याची शक्यता वाढते. 

चेहऱ्यावर सूज येणे (Facial Swelling)

जर एखाद्याच्या गाल, डोळे, कान आणि चेहऱ्यावरील सर्व अवयवांवर अचानक सूज आली असेल तर हे देखील काळी बुरशीचे लक्षण असू शकते. या संक्रमणामुळे गालाच्या आतील बाजूस अथवा चेहऱ्याची फक्त एक बाजू बधीर होते. संक्रमण झाल्यामुळे चेहऱ्यावर सूज आणि वेदना जाणवतात. काही लोकांना यामुळे त्वचेवर डाग, चट्टेही उठू शकतात.

मानसिक स्थितीत बदल (Altered Mental State)

Altered mental state
Mucormycosis Symptoms In Marathi

म्युकरमायकोसिस हे फंगल इनफेक्शन नाकावाटे फुफ्फुसे, चेहरा आणि मेंदूवर परिणाम करते. ज्यामुळे रूग्णाच्या मानसिक स्थितीच बदल होतात. मेंदूला दाह आणि वेदना जाणवतात. बऱ्याच रुग्णांना यामुळे स्मृतिभ्रंश, आठवण न राहणे, बोलता न येणे, माणसे न ओळखणे अशा मानसिक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. यासाठीच मेंदूत संक्रमण होण्याआधी या आजारावर योग्य ते उपचार करायला हवेत. 

म्युकरमायकोसिस बाबत काही प्रश्न – FAQ’s

1. म्युकरमायकोसिसचे निदान कसे केले जाते ?

वर दिलेल्या लक्षणापैकी लक्षणे आढलल्यास म्युकरमायकोसिसची चाचणी  करणं गरजेचं  आहे. याचे निदान करण्यासाठी डॉक्टर तुमच्या नाकातील काही नमूने घेतात. लॅबमध्ये काही टेस्ट करून या संक्रमणाचे निदान केले जाते.

ADVERTISEMENT

2. म्युकरमायकोसिस आणि कोविड 19 चा संबध काय ?

कोविड 19 मध्ये नाक, श्वसन मार्ग आणि  फुफ्फुसे संक्रमित होतात. अशा रूग्णामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे इतर संक्रमण होण्याचा धोका वाढतो. कोविडमध्ये रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे रुग्णाला काळ्या बुरशीचे इनफेक्शन होऊ शकते. 

3. म्युकरमायकोसिस निरोगी माणसाला होण्याची शक्यता असते का ?

म्युकरमायकोसिस हे एक दुर्मिळ फंगल इनफेक्शन आहे. पण फंगल इनफेक्शन होण्याचा धोका कोणालाही असु शकतो. सहाजिकच एखाद्या निरोगी माणसालादेखील म्युकरमायकोसिस होऊ शकतो.

17 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT