पावसाळ्यात पिकनिकला गेल्यावर अथवा मुसळधार पाऊस सुरु असताना पावसाच चिंब भिजण्याची मजाच वेगळी आहे. अशा रोमॅंटिक वातावरणात प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासारखं आणखी काही छान असूच शकत नाही. त्यामुळे या काळात मनसोक्त भिजण्यासाठी डोंगराळ भागात, धबधब्यावर अथवा समुद्र किनारी धाव घेतली जाते. पावसात भिजणं कितीही रोमॅंटिक आणि रोमांचक असलं तरी त्वचा आणि केसांना त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतात. कारण पावसात भिजल्यावर त्वचा आणि केस लवकर सुकत नाहीत. घाम, चिकटपणा यामुळे त्वचेच्या ओलाव्यामध्ये अधिकच भर पडते. या काळात ओलाव्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. जसं की फंगल इनफेक्शन, पिंपल्स आणि त्वचा अती प्रमाणात कोरडी होणे. या समस्यांमुळे तुमचे सौंदर्य कमी होऊ नये यासाठी पावसात भिजण्यापूर्वीच त्वचेची योग्य काळजी घ्या.
मॉईच्सराईझर आहे गरजेचे
पावसाळा असो वा कोणताही ऋतु त्वचेचे पोषण व्हावे यासाठी त्वचेवर मॉईस्चराईझर लावणे गरजेचं आहे. पावसाळ्यात त्वचेवर मॉईस्चराईझर लावावं कारण या काळात वातावरणातील बदल आणि ओलाव्यामुळे तुमची त्वचा जास्त प्रमाणात कोरडी होण्याची शक्यता असते. यासाठीच पावसाळ्यातही त्वचेला नियमित मॉईस्चराईझर आणि हायड्रेटिंग क्रीम लावण्याचा कंटाळा करू नये. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना नियमित केल्या जाणाऱ्या स्किन केअर रूटिनमध्ये त्वचा मॉईस्चराईझ करणे विसरू नका. हिवाळ्याप्रमाणेच या काळातही त्वचा कोरडी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
सनस्क्रिन लावणे टाळू नका –
सनस्क्रिन हे फक्त उन्हाळ्यातच लावावं असा एक गैरसमज सर्वांमध्ये दिसून येतो. ज्यामुळे पावसाळ्यात सनस्क्रिन लावणं टाळलं जातं. मात्र असं करणं तुमच्या त्वचेसाठी हितकारक नाही. कारण ऊन असो वा नसो दिवसा सूर्यांची अतिनील किरणे तुमच्या त्वचेच्या संपर्कात येतात आणि त्वचेचं नुकसान करतात. प्रखर सूर्यकिरणांमुळे तुमची त्वचा काळवंडते, सनटॅन होते आणि त्वचेवर काळे चट्टे निर्माण होतात. एकदा सनबर्नमुळे काळवंडलेली त्वचा लवकर पूर्ववत होत नाही. यासाठीच घराबाहेर जाण्यापूर्वीच यासाठी नियमित सनस्क्रिन लावणे गरजेचे आहे.
पिंपल्सवर योग्य उपचार करा –
पावसाळ्यातील ओलावा आणि अंगावर पडणारे प्रदुषित पाणी तुमची पिंपल्सची समस्या अधिक वाढवू शकते. याचं कारण अशा वातावरणात जीवजंतू मोठ्या प्रमाणात पोसले जातात. शिवाय चेहऱ्यावरील घाम, तेल आणि माती बॅक्टेरिआ वाढण्यास पोषक ठरू शकते. यासाठीच तुमच्या रोजच्या स्किन केअर रूटिनमध्ये पिंपल्सची योग्य काळजी घ्या. योग्य उत्पादनांचा वापर आणि स्वच्छता राखून तुम्ही पिंपल्सपासून सुटका मिळवू शकता. जर तुमची त्वचा अती तेलकट असेल तर तुम्ही वापरत असलेले प्रॉडक्ट योग्य निवडा.
त्वचेची स्वच्छता कशी राखाल –
पावसाळ्यात तुम्ही त्वचेची नेहमीप्रमाणेच स्वच्छता राखायला हवी. कारण या काळातही तुमची त्वचा अती प्रमाणात कोरडी होण्याची शक्यता असते. यासाठी त्वचेवरील धुळ, माती, प्रदुषण, मेकअप काढण्यासाठी दिवसभरातून दोनदा चेहरा फेसवॉशने स्वच्छ करा, आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर फेसस्क्रब लावा आणि त्वचेचं योग्य पोषण करणारे फेसमास्क त्वचेवर लावा.
आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या ब्युटी टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला जरूर कळवा.
फोटोसौजन्य – Pixels
अधिक वाचा –
पावसाळ्याआधी मुलींच्या मनात येऊ शकतात ‘हे’ विचार
पावसाळ्यातही त्वचेसाठी सनस्क्रिन महत्वाचे, नाहीतर होतील हे त्रास