ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Whatsapp Group Names In Marathi

व्हॉटसअप ग्रुपसाठी द्या ही आकर्षक नावे (Whatsapp Group Names In Marathi)

कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांशी मनमोकळेपणे संवाद साधण्याचं सोपं साधन म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप. लॉकडाऊनच्या काळात व्हॉटसअप ग्रुपवर चॅटिंग, व्हिडिओ कॉल केल्यामुळे लांब असूनही अनेकांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद घेता आला. या काळात सणसमारंभ, गेट-टुगेदर, लग्नसोहळे, बारसे, वाढदिवस व्हॉट्सअप ग्रुपवर साजरे केले गेले. अनेक सामाजिक संस्थांच्या वार्षिक स्पर्धाही या व्हॉटस्अप ग्रुपवर रंगल्या. आज अशी एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही जी कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपवर नाही. एकाच व्यक्तीला दररोज अनेक व्हॉटसअप ग्रुपवर अपडेट राहावं लागतं. व्हॉट्सअप ग्रुप कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, सहकाऱ्यांशी जोडून ठेवणारा एक दुवाच झाला आहे. एकदा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला की सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे व्हॉटसअप ग्रुपला साजेसं नाव देणं. ग्रुपला काय नाव द्यायचं हे ग्रुपच्या अॅडमीनच्या हातात असतं. जर तुम्ही ग्रुपचे अॅडमीन असाल तर ग्रुपमधील माणसांच्या आवडीनिवडी, स्वभाव आणि एकमेकांशी असलेलं नातं यावरून तुम्ही तुमच्या ग्रुपला छान, भन्नाट, मजेशीर, भावनिक नाव देऊ शकता. यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत व्हॉटसअप ग्रुपसाठी काही आकर्षक नावे (Whatsapp Group Names In Marathi).

फॅमिली व्हॉटसअप ग्रुपसाठी नावे (Family Whatsapp Group Names In Marathi)

Family Whatsapp Group Names In Marathi

Family Whatsapp Group Names In Marathi

ADVERTISEMENT

विभक्त कुटुंब असूनही व्हॉटसअपसारख्या माध्यमामुळे एकत्र कुटुंबाचा आनंद सर्वांना घेता येतो. कारण या ग्रुपमुळे तुम्ही तुमचे आजी आजोबा, काका काकी, मामा मामी, दादा वहिनी, मावशा अशा सर्व नातेवाईकांशी कधीही संवाद साधू शकता. यासाठीच तुमच्या ग्रुपसाठी निवडा खास व्हॉटसअप ग्रुप नाव (Whatsapp Group Names In Marathi).

  • आमची नाती आमची माणसं
  • नाती रक्ताची
  • माय फॅमिली
  • फॅमिली फस्ट
  • कनेक्टिंग पिपल
  • हॅपी फॅमिली
  • बेस्ट फॅमिली फॉरेव्हर
  • सावली आईबाबांची
  • वन ब्लड
  • माझं कुटुंब माझी जबाबदारी
  • आईबाबांचा आर्शीवाद
  • घर तुझं माझं
  • घरोघरी व्हॉटसअपच्या चुली
  • आज काय स्पेशल
  • माझं घर
  • माहेरचा कट्टा

Whats app वरून जाणून घ्या ट्रेनचा स्टेटस

मित्रांच्या व्हॉटसअप ग्रुपसाठी नावे (Whatsapp Friends Group Names In Marathi)

Whatsapp Friends Group Names In Marathi

ADVERTISEMENT

Whatsapp Friends Group Names In Marathi

शाळा, कॉलेज, ऑफिस आणि शेजारचे मित्रमंडळी व्हॉटसअप ग्रुपमुळे नेहमी एकत्र असल्याचा अनुभव येत असतो. जरी आपण आपल्या घरातून एकमेकांशी बोलत असलो तरी अशा ग्रुपमुळे आपण आजही कॉलेजच्या कट्टयावर बसून बोलत असल्याचा अनुभव मिळतो. तुमच्या मैत्रीसाठी हे खास व्हॉट्स अप ग्रुप नाव (Whatsapp Group Names List In Marathi).

  • हवा करणारी पोरं
  • पारावरचं व्हॉटसअप
  • तंटा नाय तर घंटा नाय
  • दे धक्का
  • बिन पगारी फुल अधिकारी
  • नाद करायचा नाय
  • उपाशी मित्रमंडळ
  • चड्डी बड्डी
  • सिंगल पोरांचा ग्रुप
  • रॉकस्टार्स
  • चला हवा येऊ द्या
  • तू तिथे मी
  • … आळीतील पोरं
  • सखे सोबती
  • कॉलेज मित्रमंडळ

जुळ्या मुलामुलींची आधुनिक नावे

ADVERTISEMENT

व्हॉटसअपसाठी मजेशीर नावे (Funny Whatsapp Group Names For Friends In Marathi)

बऱ्याचदा व्हॉटसअप ग्रुपची नावे ही मजेशीर आणि मनोरंजक असतात. ग्रुपमध्ये तुमच्यासारखे विनोदी मित्र मैत्रिणी असल्याची ही एक खूण असू शकते. यासाठीच जाणून घ्या ही मजेशीर व्हॉट्स ग्रुपची नावे (Whatsapp Group Names In Marathi).

  • दोस्ती नाय तर मस्ती नाय
  • दे धमाल 
  • लय भारी
  • सैराट
  • व्हायरल गोष्टी
  • गावठी किडा
  • माझ्या गावाकडचे
  • आमच्या सारखे आम्हीच
  • होऊ दे खर्च
  • किडे करणारे
  • माती खाणारे
  • थोडं हसा
  • कट्टर मित्र
  • आम्ही येडे
  • गोडबोले मित्रमंडळ

शाळेतील मित्रमंडळीच्या व्हॉटसअप ग्रुपसाठी नावे (Whatsapp Group Names For School Friends In Marathi)

शाळा आणि शाळेतील आठवणी या प्रत्येकासाठी खास असतात. शाळा हे आपलं पहिलं असं विश्व असतं जे घरानंतर आपण पहिल्यांदा पाहिलेलं असतं. त्यामुळे शाळेच्या आठवणी आणि शाळेतील मित्रमैत्रिणी कधीच विसरता येत नाहीत. आता तर व्हॉटसअप ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शाळेतील मित्रांशी कधीही गप्पा मारू शकता. तुमच्या शाळेच्या ग्रुपसाठी द्या असंच एखादं अविस्मरणीय नाव (Whatsapp Group Names List In Marathi).

ADVERTISEMENT
  • शाळेची शान
  • दिल दोस्ती दुनियादारी 
  • क्लासरूम
  • खोडसाळ मित्रमंडळ
  • आमची यारी जगात भारी
  • फ्रेड्स फॉरेव्हर
  • मागच्या बाकावरचे
  • दहावी फ
  • यारोंके यार
  • आम्ही स्कॉलर
  • आमची शाळा
  • वर्गमित्र
  • मधली सुट्टी
  • तुझी माझी यारी
  • शाळेतल्या आठवणी

स वरून मुलांची नावे, तुमच्यासाठी खास नावे

व्हॉटसग्रुपसाठी बेस्ट नावे (Best Whatsapp Group Names In Marathi)

Best Whatsapp Group Names In Marathi

Best Whatsapp Group Names In Marathi

ADVERTISEMENT

व्हॉटसअपचे आजकाल अनेक ग्रुप असतात. जर तुमच्या एखाद्या खास ग्रुपला तुम्हाला जगावेगळं आणि ट्रेडिंग नाव द्यायचं असेल तर तुम्ही व्हॉटसअप ग्रुपची काही बेस्ट नावे नक्कीच ट्राय करू शकता (Whatsapp Group Names In Marathi).

  • आमच्या सारखे आम्हीच
  • बनवाबनवी
  • एकदम कडक
  • अफलातून
  • आरारारा… खतरनाक
  • दुनियादारी
  • आता माझी सटकली
  • चला चॅट करू
  • होऊ दे व्हायरल
  • तुमचं आमचं 
  • महाराष्ट्राची शान
  • बर्थडे आहे भावाचा
  • जस्ट टॉक
  • चॅटर बॉक्स

व्हॉटसअप ग्रुपसाठी युनिक नावे (Unique WhatsApp Group Names List In Marathi)

व्हॉटसग्रुपचे नाव जितके हटके तितकीच त्याची चर्चा जास्त होते. तुमच्या सारख्या हटके लोकांच्या व्हॉटसअप ग्रुपला नावही तसंच युनिक आणि भन्नाट हवं यासाठी ट्राय करा ही व्हॉटसअप ग्रुपसाठी युनिक नावे (Whatsapp Group Names List In Marathi).

  • फुल टू धमाल
  • नुसता राडा
  • पुढे धोका आहे
  • गुदगुल्या
  • नया है यह
  • गॅंग्स ऑफ व्हॉटसअप
  • वी ऑल आर स्टिल यंग
  • जाळ अन धूर संगतच
  • मोडेन पर वाकणार नाय
  • ट्रोलर्स
  • चहा प्रेमी
  • नुसतं व्हायरल
  • नाद करायचा नाय
  • मित्रांसाठी काय पण
  • आमचा वेगळा आहे पॅटर्न

व्हॉटसअप ग्रुपचे नाव हे तुमच्या ग्रुपमधील लोकांची ओळख असते. त्यामुळे तुमचा ग्रुप जसा आहे तसंच त्याला साजेसं नावही द्यायला हवं. आम्ही शेअर केलेली ही व्हॉटसअप ग्रुपची नावे यासाठी तुमच्या नक्कीच फायद्याची ठरतील. तुम्हाला ही नावे कशी वाटली आणि तुम्ही तुमच्या ग्रुपसाठी कोणतं नाव निवडलं हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.

14 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT