ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी द्या रोज स्वतःला 15 मिनिट्स

त्वचा अधिक सुंदर दिसण्यासाठी द्या रोज स्वतःला 15 मिनिट्स

आकर्षक दिसण्यासाठी आणि स्वतःला ताजेतवाने आणि सुंदर दाखविण्यासाठी महिला काय काय नाही करत? अनेक महागड्या मेकअपपासून ते अगदी घरगुती वेगवेगळ्या उपचारांचाही यासाठी वापर करण्यात येतो.  इतकंच नाही तर बऱ्याचदा अगदी सर्जरीपर्यंतदेखील मजल जाते. पण तुम्ही स्वतःला दिवसातील केवळ 15 मिनिट्स जर दिलीत तरीही तुम्ही स्वतःच्या दिसण्याची योग्य काळजी घेऊ शकता.  आम्ही दिलेल्या या टिप्स तुम्ही वापरून पाहा आणि तुम्हाला इतर काही महागड्या उत्पादनांचा वापर करण्याचीही गरज भासणार नाही. त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्हाला अगदी लहानसहान गोष्टींची  काळजी घ्यायची आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करून घेतलात तर तुम्हालाही अप्रतिम त्वचा मिळेल आणि तुमचा लुक अधिक आकर्षक होईल. पाहूया काय सोप्या टिप्स वापराव्या. 

देशी तुपाचा करा वापर

देशी तुपाचा करा वापर

Shutterstock

आपल्या रोजच्या आयुष्यात तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी तुपाचा वापर नक्की करावा. दिवसभरात तुम्ही जेव्हा अगदी स्वयंपाकघरातही असाल तेव्हा तुपाचे दोन थेंब हातावर घेऊन आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूला लावा आणि अगदी एक मिनिट्ससाठी मालिश करा. मालिश करायला वेळ नसला तरीही चालेल पण न चुकता किमान आठवड्यातून दोन वेळा तरी तुम्ही हा प्रयोग करा आणि तुम्हाला डोळ्यांना येणाऱ्या  सुरकुत्यांपासून सुटका मिळेल. तसंच त्वचा अधिक तजेलदार राहील आणि सुरकुत्या पटकन येणार नाहीत. 

ADVERTISEMENT

ग्रीन टी फायदेशीर

ग्रीन टी फायदेशीर

Shutterstock

तुम्ही दिवसातून जर ग्रीन टी पित असाल तर त्यातील दोन चमचा ग्रीन टी बाजूला वाटीत काढून ठेवा.  नंतर त्यात गुलाबपाणी मिक्स करा आणि आपल्या चेहऱ्यावर कापसाच्या  मदतीने लावा आणि साधारण 15 मिनिट्स चेहऱ्याला हलक्या हाताने मालिश करा. यामुळे तुमची त्वचा अधिक उजळते. डोळ्यांना थंडावा मिळतो आणि डोळ्यांखाली काळे डाग येत नाहीत. तसंच चेहऱ्यावर मुरूमं येण्यापासूनही सुटका मिळते.  ग्रीन टी हा चेहऱ्यासाठी उत्तम ठरतो. 

लिंबाचा उपयोग

लिंबाचा उपयोग

ADVERTISEMENT

Shutterstock

तुम्ही दिवसाची सुरूवात लिंबू पाण्याने करा. यामुळे पोट स्वच्छ राहाते आणि चेहऱ्यावर मुरूमं येत नाहीत. तसंच तुम्ही लिंबू पाणी करून झाल्यानंतर त्याच्या सालाने आपल्या हाताचा कोपरा आणि नखांजवळ काही वेळ घासा. लिंबू हे अप्रतिम नैसर्गिक ब्लिचींग आहे. त्यामुळे अंगावरील काही भागा काळा झाला असल्यास, त्याला उजळपणा आणण्यास मदत होते. तसंच नखांना मजबूत बनविण्यासाठीही याची मदत होते. चेहरा पुसताना तुम्ही MyGlamm च्या वाईपआऊटचा उपयोग करून घेऊ शकता. त्वचेची अधिक काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरते. 

टॉमेटो आणि मध

टॉमेटो आणि मध

Shutterstock

ADVERTISEMENT

बऱ्याचदा आपली मान काळी पडते मग अशावेळी बाहेरील कोणते महागडे उपाय करण्यापेक्षा तुम्ही टॉमेटोचा तुकडा काळ्या मानेवर लावा. अथवा टॉमेटोचा रस काढून  त्यात मध मिक्स करा. हे मिश्रण मानेला लावा.  साधारण पंधरा मिनिट्सनंतर सुकल्यावर थंड पाण्याने मान धुवा.  तुम्हाला तुमचे मानेचे सौंदर्य नक्की मिळेल. 

व्हर्जिन कोकोनट ऑईलचा करा वापर

प्रत्येक दिवशी 2 चमचे व्हर्जिन कोकोन ऑईलने आपली त्वचा साधारण 15 मिनिट्स मालिश करा. हे अँटिऑक्सिडंटयुक्त तेल आहे. जे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या,  ताण, ब्रेकआऊट्स,  रॅशेस आणि पिगमेंटेशन घालविण्यास मदत करते आणि त्वचा अधिक मऊ मुलायम बनवते.  तसंच नखांवर लावल्यास तुमची नखं अधिक मजूबत होतात. 

https://marathi.popxo.com/article/is-coconut-oil-better-than-aloe-vera-gel-for-treating-sunburns-in-marathi

कॅस्टर ऑईलही आहे फायदेशीर

कॅस्टर ऑईलही आहे फायदेशीर

Shutterstock

ADVERTISEMENT

कॅस्टर ऑईलचा अर्थात एरंडेल तेलाचा उपयोग हा बद्धकोष्ठ दूर करण्यासाठी करण्यात येतो इतकाच उपयोग काही जणांना माहीत आहे.  पण आपल्या त्वचेसाठी याचा अधिक चांगला उपयोग होतो. तसंच डोळ्यांच्या समस्या असतील तर त्यासाठीही उपयोग करून घेता येतो. डोळ्यांजवळ आलेले काळे डाग अथवा सूज पटकन कमी करायची असेल तर कॅस्टर ऑईलचा उपयोग करा. तसंच तुम्हाला आयब्रो घनदाट करायच्या असतील तर रोज कॅस्टर ऑईल लावा. रोज रात्री झोपण्यापूर्वी कॅस्टर ऑईलने डोळ्यांच्या आजूबाजूच्या भागाला मालिश करा आणि मग झोपा.  तुम्हालाच त्याचा योग्य परिणाम जाणवेल. 

बेसन, हळद आणि कच्चे दूध

बेसन,  हळद  आणि कच्चे दूध

Shutterstock

बेसनामध्ये  चिमूटभर हळद पावडर आणि कच्चे दूध मिक्स करून पेस्ट करून घ्या आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि साधारण 15 मिनिट्स तसेच ठेवा. उन्हाळ्याच्या दिवसात चांगल्या त्वचेसाठी तुम्ही यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि हिवाळ्यात तुम्ही यामध्ये मलई मिक्स करा.  याच्या वापराने डेड स्किन निघून जाते आणि ताजेतवाने वाटते.  

ADVERTISEMENT
https://marathi.popxo.com/article/homemade-marigold-face-mask-for-clear-and-glowing-skin-in-marathi

पपई आहे परिणामकारक

पपई आहे परिणामकारक

Shutterstock

पिकलेली पपई घ्या आणि त्याचे तुकडे करून मॅश करा. त्यामध्ये दूध,  मध आणि केशर मिक्स करून त्याची पेस्ट चेहऱ्याला लावा. साधारण 15 मिनिट्सनंतर थंड पाण्याने धुवा.  केशर आणि पपईचा हा फेसपॅक लावल्याने त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते आणि त्याशिवाय नैसर्गिकरित्या चेहऱ्यावर मऊपणा आणि मुलायमपणा येतो.  तसंच केशरमध्ये असलेले अँटिबॅक्टेरियल आणि एक्सफ्लोएटिंग गुण हे प्रदूषणाला मात देऊन त्वचा अधिक चमकदार करण्यास मदत करते. याशिवाय पपईमध्ये असणारे विटामिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स चेहऱ्याला अधिक तरूण दिसण्यास मदत करतात. 

https://marathi.popxo.com/article/how-to-use-fruits-for-beautiful-skin-in-marathi

ताकाचा फायदा

त्वचेला नैसर्गिकरित्या क्लिन्झर म्हणून ताकाचा वापर होतो. हे केवळ त्वचेच्या आतच जात नाही तर त्वचेला पोषण देण्याचेही काम करते. ताकामध्ये असणारे लॅक्टिक अॅसिड त्वचेला नैसर्गिकरित्या एक्सफोलिएट करण्याचे काम करते. यामध्ये तुम्ही गुलाबपाणीदेखील मिक्स करू शकता.  कापसाच्या मदतीने तुम्ही हे चेहऱ्याला लावा आणि मग साधारण 15 मिनिट्सनंतर थंड पाण्याने धुवा. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक 

 

22 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT