२०१९ हे नववर्ष धनु राशीसाठी फारसे काही उपलब्धीचे नसेल. कारण यावर्षी ग्रह धनु राशीची परीक्षा घेणार आहेत. तुम्ही किती संयम आणि समंज्यसपणा दाखवू शकता, हे बघणार आहेत. अनुकूल काळात तर सर्वच चांगलं काहीतरी करतात. काही करुन दाखविण्याची हिंमत ही प्रतिकूल काळातच असते. प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेली छोटी गोष्टही खूप मोठा आनंद देऊन जाते. त्यामुळे ग्रह या वर्षी आपल्यासाठी प्रतिकूल असले तरी निराश होऊ नका. हीच खरी संधी आहे, असं मानून मार्ग काढत राहा. त्यामुळे अधेमधे जी ग्रहांची अनुकूलता असेल, त्याचा योग्य सदुपयोग करुन तुम्ही आनंद प्राप्त करु शकाल. तसंही बळकट, कणखर असणारी अशी आपली रास आहे. त्यामुळे हिंमत दाखवली तर या प्रतिकूल काळातही तुम्ही चांगलं काम करु शकाल. चला तर मग 2019 या नववर्षी धनु राशीचे ग्रहमान कसे राहणार आहे, याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया.
ग्रहमान जाणून घेण्याआधी आपण धनु राशीची गुण व स्वभावितील वैशिष्ट्ये जाणून घेऊया.
वरचा भाग धर्नुधारी पुरुष आणि खालचा अर्धा भाग अश्वाचा असं प्रतिक असलेल्या धनु राशी लोक शरीर, मन आणि स्वभावानेही बळकट, कणखर असतात. ही अग्नितत्वाची राशी असून गुरु तिचा स्वामी आहे. या राशीला भाग्याची राशी असं म्हटलं जातं. ही द्विस्वभावी रास असल्यामुळे या राशीच्या लोकांमध्ये एकाच वेळी भिन्न मतेही असतात. कणखरपणा अंगी असल्यामुळे या राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्वही कणखर आणि समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पाडणारं असतं. त्यामुळे उच्च ध्येय आणि जबरदस्त महत्त्वाकांक्षा हे लोक अंगी बाळगून असतात. द्विस्वभावी असल्यामुळे एकीकडे संताच्या गुणांचा अंगीकार करुन साधूवृत्ती या लोकांमध्ये बघायला मिळते. तर दुसरीकडे गरज पडल्यास अन्यायाविरुद्ध बंड करण्याची प्रवृत्तीही धनु राशीच्या लोकांची असते. आता बंड करण्याची बाब ही गुणात मोडते की दोषात मोडते ही त्यावेळेची परिस्थितीच सांगू शकते. एक मात्र नक्की, की 2019 हे नववर्ष आपल्यासाठी कुठल्याही परिस्थितीत बंड करण्याचे अजिबात नाही. तर हे वर्ष आपल्यासाठी संयम दाखविण्याचं आहे.
2019 वार्षिक भविष्य वृश्चिक (Scorpio) राशी : सर्व ग्रहांच्या तोंडी फक्त एकच शब्द… तथास्तु|
सावधानता बाळगा
धनु राशीचा स्वामी असलेले गुरु महाराज संपूर्ण वर्षभर तुमच्या राशीच्या व्ययात असणार आहेत. शिवाय राशीत शनि महाराजही आहेत. गुरु आणि शनी या दोन मातब्बर ग्रहांनी या वर्षी तुमची परिक्षा घ्यायची असं ठरविलेलं आहे. त्यामुळे हे संपूर्ण वर्ष आपल्यासाठी विपरीत असं जाणार आहे. सावध राहा.. रात्र वै-याची आहे. असं आपण एखाद्या कठीण रात्रीविषयी म्हणतो. ती बाब फक्त एका रात्रीविषयी किंवा एका प्रसंगाविषयी असते. मात्र आपल्यासाठी संपूर्ण वर्षच प्रतिकूल असं जाणार आहे. त्यामुळे सावध राहा. संपूर्ण वर्ष वै-याचं आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.
गुरु आणि शनि यांनी आपली परीक्षा घ्यायचं ठरवलेलं असल्यामुळे प्रत्येक कामात अडचण, अगदी छोट्या छोट्या कामांमध्येही अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. शिवाय आर्थिक अपयश, खर्चाचे सतत वाढत राहणारे प्रमाण, शिक्षणात प्रयत्नांच्या तुलनेत अत्यंत कमी यश, जोडीदाराशी मतभेद, कौटुंबिक कलह, व्यावसायिक भागीदाराशी वादविवाद यासारख्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो.
वार्षिक भविष्य मेष (Aries) राशी : थोडी सावधानता बाळगल्यास वर्ष तुमचंच आहे
विपरीत परिस्थितीतही आशादायी घटना घडणार
या सगळ्या विपरीत परिस्थिती सुरु असतांना ओसाड वाळवंटात वा-याची मंद झुकूळ यावी आणि सर्वांग शहारुन उठावं अगदी तसंच मंगळ, रवि, बुध यांचे भ्रमण तुम्हाला सुखावणार आहेत. आधीच्या कालखंडात जर तुम्ही संयम दाखविला, धैर्याने प्रत्येक संकटांचा सामना करत राहिलात तर या मध्येच येणा-या शुभ योगाचा तुम्ही योग्य तो सदुपयोग करु शकाल.
वार्षिक भविष्य तूळ (Libra) राशी : फक्त जून ते ऑगस्ट काळजी घ्या, बाकी वर्ष तुमचंच
या शुभ योगाच्या तारखा पुढीलप्रमाणे-
दि. 6 फेब्रुवारी ते 21 मार्च 2019 या कालखंडात पंचमातून होणारे पंचमेषाचे भ्रमण तुमच्यासाठी अत्यंत सुखावह ठरणार आहे. त्यामुळे या कालखंडात आपण आपल्या विविध जबाबदा-यांना मूर्त रुप देऊ शकणार आहात. अर्थात त्याचा लाभ आपण कसा आणि किती करुन घेणार आहात, यावरच ठरेल.
दि. 16 मार्च 2019 ला केतू तुमच्या राशीत येणार आहे. तेथेच शनि महाराज ठाण मांडून बसलेले असल्याने शनी आणि केतू यांची युती होऊन जडत्व दोष निर्माण होणार आहे.
दि. 15 एप्रिल 2019 ला शुक्र मीनेत, उच्च राशीचा होत असल्याने चतुर्थ स्थानात मालव्य योग निर्माण करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शुभ योग निर्माण होणार असून दि. 15 एप्रिल ते 10 मे 2019 या कालखंडात तुम्ही अनेक प्रकारचे आनंद उपभोगणार आहात. या काळात वाहन, वास्तू यावर तुमचा मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ शकतो. उत्तम कपडे, दागिने यासाठीही तुम्ही खर्च करणार आहात.
दि. 1 जून ते 20 जून 2019 या कालखंडात बुध मिथून या स्वराशीत तुमच्या सप्तमात राहणार आहे. याकाळात बरेच दिवस घरात सुरु असलेली धुसफूस कमी होण्यास मदत मिळणार आहे. जोडीदाराशी योग्य असा सुसंवादही तुम्ही स्थापित करु शकणार आहात.
दि. 22 जून ते 7 ऑगस्ट 2019 या कालखंडात तुमचा पंचमेश कर्म राशीत निचीचा होतोय. परिणामी धोका, पैसे फसणे, आरोग्याच्या तक्रारी, लाभात कमी अचानक खर्च उभे राहणे यासाख्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो.
दि. 10 सप्टेंबर 2019 रोजी तुमच्या दशमात कन्येत येणारा बुध, पंचमहापुरुष योगापैकी भद्र योगाची निर्मिती करतोय. त्यामुळे समस्यांवर अंकुश निर्माण होण्याचे योग आहेत.
दि. 5 नोव्हेंबरला गुुरु महाराज तुमच्या राशीला येऊन मोठा आशीर्वाद देणार आहेत. त्यांची कृपादृष्टी लाभल्यामुळे येथून पुढील कालखंड तुमच्यासाठी अत्यंत सुखावह असणार आहे.
मात्र त्या आधीच्या कालखंडात येणा-या संकटांचा सामना करण्याची शक्ती परमेश्वर आपल्याला देवो, या हीच प्रभू चरणी प्रार्थना!
शुभं भवतू|
लेखिका : श्री ज्योतिष संशोधन केंद्र