ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
घरातील देवघर सजवा सोप्या पद्धतीने, दिसेल अधिक सुंदर

घरातील देवघर सजवा सोप्या पद्धतीने, दिसेल अधिक सुंदर

घरात आल्यानंतर नेहमी सर्वांची पहिली नजर जाते ती देवघरात. आपल्या घरातील देव्हारा लहान असो वा मोठा. तो दिसायला नक्कीच सुंदर हवा. देवघर प्रसन्न दिसलं की घरातील माणसंही प्रसन्न दिसतात असं म्हटलं जातं. मोठ्या घरातही कधीतरी अगदीच कुठेतरी खाली देव ठेवलेले दिसतात. पण हेच जर तुमचा देव्हारा लहान असूनही त्याच सुटसुटीतपणा असेल आणि देवघर सुंदर सजवलं असेल तर नक्कीच घराला घरपण येतं. अर्थातच यासह घरही तुम्हाला तितकंच चांगलं ठेवता यायला हवं. पण घरातील साफसफाईप्रमाणेच घरातील देवघराकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचे आहे. यामुळे घराची शोभाही वाढते आणि मनही प्रसन्न राहातं. घरातील देवघर कशा पद्धतीने सजवायचं याच्या काही महत्वाच्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुम्ही या टिप्स वापरून तुमचं देवघर नक्कीच अधिक सुंदर आणि प्रसन्न करू शकता.

लाईट्सने सजवा घरातील मंदिर

घरातील देवघर सजवण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे लाईट्स. बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्सचे  लाईट्स मिळतील. आजकाल एलईडी लाईट्समध्येही खूपच पर्याय दिसतात. एलईडी लाईट्समध्ये तुम्हाला असे लाईट्सही मिळतील जे तुम्ही भींतीवर, लाकडी देवघरावर आरामात चिकटवू शकता. या पद्धतीच्या लाईट्सचा तुम्ही देवघर सजविण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. 

या लाईट्सने तुम्ही देवघराला आऊटलाईन देऊ शकता. यामुळे मंदीर अधिक सुंदर दिसते. तसंच या एलईडी लाईट्समध्ये काही फोकस लाईट्स  मिळतात. या पद्धतीच्या लाईट्सने तुम्ही देवघर उजळवू शकता. याशिवाय असे लाईट्सही तुम्ही देवघराला लाऊ शकता ज्यामध्ये धार्मिक चिन्ह अथवा चित्र दिसून येेते. हे लाईट्स एल्युमिनेट्स करण्यात आलेले असतात. यामुळे देवघर अधिक चांगले शोभून दिसते. 

याशिवाय डिझाईनर कँडल अथवा दिवेही तुमच्या मंंदिराच्या  सजावटीसाठी नक्कीच शोभून दिसतात.  आजकाल बाजारामध्ये अशा मेणबत्त्यांचे स्टँड्स आले आहे जे  तुम्ही मंदिराच्या  बाजूला छान आखीव आणि रेखीव पद्धतीने ठेऊ शकता. 

ADVERTISEMENT

बेडरूम आकर्षक बनविण्यासाठी करा या गोष्टींचा वापर, सोप्या टिप्स

देवघरासाठी द्या सुंदर बॅकड्रॉप

तुमचे देवघर नक्कीच सुंदर असेल, त्याचे डिझाईनही उत्तम असेल. पण जर त्याच्या मागची बाजू दिसायला चांगली नसेल तर नक्कीच लक्ष पहिल्यांदा त्यावर जाते. तुमचे देवघर जिथे आहे ती भींतही तितकीच सुंदर दिसायला हवी ना? यासाठी तुम्ही भिंतीवर वॉल स्टिकर अथवा वॉलपेपरचा वापर करू शकता अथवा कोणत्याही प्रकारचे पेंटिंग इथे काढून त्यावर देव्हारा फिक्स करू शकता. मग तिथे एखादे सुंदर देवाचे चित्र काढले अथवा अगदी धार्मिक चिन्ह असले तरीही प्रसन्न वाटते. 

बाजारामध्ये आजकाल अनेक वॉलपेपर आणि स्टिकर्स उपलब्ध असतात. या स्टिकर्सचा वापर करून तुम्ही तुमची देव्हाऱ्याची भिंत सजवू शकता.  तुम्हाला बाजारात जायला वेळ नसेल तर तुम्हाला ऑनलाईनही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही देवघराच्या  मागची भिंत अधिक चांगली डेकोरेट करून मग त्यावर देवघर फिक्स करू शकता. तुम्ही तुमच्या मनाने नक्कीच स्वतः हे करू शकता. पण एखाद्या डिझाईनरकडून हे करून घेतलं तर ते दिसायला अधिक सुंदर दिसतं.

Vaastu Tips : घरात बासरी ठेवण्याचे फायदे

ADVERTISEMENT

घरातील देवघर सजवा अशा पद्धतीने

केवळ देवघरच नाही तर देवघर ज्या लादीवर असेल ती लादीही तुम्ही अधिक चांगल्या तऱ्हेने सजवू शकता.  नुसती लादी ठेवण्यापेक्षा तुम्ही डिझाईनर कारपेटची मदत घेऊ शकता. आजकाल लादीवरही पेटिंग करण्याची पद्धत आली आहे. तुम्ही एखादी छानशी कायमस्वरूपी रांगोळी काढून घेऊ शकता. तुम्हाला कायमस्वरूपी पेंटिंग नको असेल तर तुम्ही बाजारात असलेले रांगोळीचे स्टिकर्सही वापरू शकता. हे दिसायलाही सुंदर असतात आणि खिशाला परवडण्यासारखेही असतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसरे एखादी डिझाईनही वापरू शकता.  

याशिवाय तुम्ही रंगीत आणि डिझाईनर कारपेट्सचा वापरही करून नवा लुक देऊ शकता. तसंच तुम्ही ही लादी इलेक्ट्रिक दिवे अथवा  लाईट्सही सजवू शकता. यासाठी जास्त खर्च येत नाही आणि तुमच्या देवघराचा लुकही अप्रतिम दिसतो. 

#VaastuTips : जाणून घ्या कसं असावं देवघर (Vastu Shastra For Pooja Room In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
15 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT