ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
easy-ayurvedic-home-remedies-to-remove-stretch-marks

स्ट्रेच मार्क घालविण्यासाठी 5 सोपे आयुर्वेदिक घरगुती उपाय

शरीरावरील स्ट्रेच मार्क्स कोणालाच आवडत नाहीत. यामुळे महिलांचे पोट खराब दिसते. डिलिव्हरीनंतर पोटावर स्ट्रेच मार्क्स येतात आणि दिसायला हे अत्यंत वाईट दिसते. त्यामुळे साडी आवडत असेल तरीही नेसता येत नाही. स्ट्रेचमार्क्स केवळ गरोदरपणानंतरच येतात असं नाही. तर लठ्ठपणामुळे त्वचा खेचली जाते आणि त्यानंतही पोटावर स्ट्रेचमार्क्स दिसतात. तसंच शरीरामध्ये बदल झाल्यास अचानक बारीक झाल्यास वा जाडी वाढल्यास, स्ट्रेचमार्क्सचा त्रास होतो. पण स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करू शकता. 5 सोप्या आयुर्वेदिक घरगुती उपायांनी तुम्ही हा त्रास कमी करू शकता. आयुर्वेदिक पद्धतीने जशी केसांची काळजी घेतली जाते तशीच याबाबतीही काळजी घेता येते.

स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स (Ayurvedic Tips to remove Stretch Marks)

Stretch_Marks

स्ट्रेच मार्कस हे बऱ्याचदा काखेत, पोटावर, छातीवर आणि हिप्सवर येतात. कारण शरीरातील सर्वात जास्त चरबी याच भागांवर जमते. या स्ट्रेचमार्क्सपासून वाचण्यासाठी अनेक उपचार आहेत. काहीजण अगदी सर्जरीचादेखील आधार घेतात. मात्र इतके महाग उपाय करण्यापेक्षा तुम्ही आयुर्वेदिक उपचार करून या समस्येपासून सुटका मिळवू शकता. काही सोपे आयुर्वेदिक उपचार आपण या लेखातून पाहूया. 

नियमित व्यायाम (Regular Exercise)

exercise

आपल्या त्वचेवर स्ट्रेचमार्क्स झाले असतील आणि त्याची निशाणी राहू नये असं वाटत असेल तर तुम्ही नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. असं केल्यामुळे त्वचा कोणत्याही त्रासाशिवाय पसरत नाही आणि तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत मिळते. त्यामुळे तुम्ही काही व्यायाम हे नियमित करायला हवेत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरावरील स्ट्रेचमार्क्स घालविण्यासाठी यशस्वी होऊ शकता. 

कोरफडचा करा उपयोग (Aloe Vera)

कोरफडचा उपयोग करून तुम्ही स्ट्रेचमार्क्स घालवू शकता. कोरफडमध्ये हिलिंग गुण असतात आणि हे त्वचेसाठी अत्यंत चांगले असे सॉफ्टनर म्हणूनही काम करते. या दोन्ही गोष्टी कोरफडमध्ये असल्याने स्ट्रेचमार्क्स हटविण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच घरगुती उपाय म्हणून हा उत्तम उपाय आहे. आंघोळ करण्यापूर्वी तुम्ही कोरफड जेल आपल्या स्ट्रेच मार्क्सवर लावा. काही वेळाने कोमट पाण्याने आंघोळ करा. असे नियमित केल्यास, तुमच्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्स जाण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

अॅपल साईडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)

अॅपल साईडर व्हिनेगर अर्थात सफरचंदाच्या व्हिनेगरचा अनेक घरांमध्ये वापर करण्यात येतो. यामुळे खाण्यातील स्वाद वाढतो. यामध्ये अनेक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही स्ट्रेचमार्क्सवर याचा वापर करू शकता. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल. स्ट्रेचमार्क्स हटविण्यासाठी तुम्ही व्हिनेगरमध्ये पाणी मिक्स करा आणि साधारण 20 मिनिट्स स्ट्रेचमार्क्सवर लाऊन ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ करा. तुम्हाला काही दिवसातच याचा चांगला परिणाम दिसून येईल. 

नारळाच्या तेलाचा करा उपयोग (Coconut Oil)

स्ट्रेचमार्क्स हे आपल्या त्वचेवर एखाद्या डागाप्रमाणे आपल्याला भासतात, त्यामुळे सतत चिंता लागून राहते. पण तुम्हाला जास्त त्रास करून घ्यायची गरज नाही. नारळाच्या तेलाच्या मदतीने तुम्ही हे स्ट्रेचमार्क्स घालवू शकता. नारळाच्या तेलाने त्वचेवरील कोणतेही घाव लवकर भरतात असं संशोधनातून सिद्ध झाले आहे. रोज स्ट्रेचमार्क्सवर तुम्ही व्हर्जिन नारळ तेल लावल्यास, याचा लालसरपणा कमी होतो आणि काही दिवसातच स्ट्रेचमार्क्स निघून जाण्यास मदत मिळते. 

अंड्याचा सफेद भाग (Egg White)

अंड्याचा पांढरा भाग वापरून तुम्ही स्ट्रेचमार्क्स घालवू शकता. आयुर्वेदाप्रमाणे अंड्याचा सफेद भाग हा अमिनो असिड आणि प्रोटीनयुक्त असतो. त्यामुळे याचा उपयोग होतो. याचा सफेद भाग तुम्ही स्ट्रेचमार्क्सवर लावा आणि पूर्ण सुकेपर्यंत तसंच राहू द्या. त्यानंतर त्यावर ऑलिव्ह ऑईल लावा. हे तुमची त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते आणि स्ट्रेचमार्क्स दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. दिवसातून दोन ते तीन वेळा याचा उपयोग केल्यास, तुम्हाला याचा लवकर परिणाम दिसून येईल. अंड्याच्या सफेद भागाचा उपयोग केल्याने त्वचेमध्ये अधिक चमक येते. 

या सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी उपयोग करून घेऊ शकता. तसंच तुम्हाला कोणत्याही गोष्टीची अलर्जी असेल तर तुम्ही वापरण्याआधी पॅच टेस्ट नक्की करून पाहा. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT