केसात कोंडा होणं ही जरी सामान्य समस्या असली तरीही केसात सतत कोंडा होत असेल तर नक्कीच यावर विचार करावा लागतो. मुळात कोंडा हा फंगल इन्फेक्शनमुळे होतो. कोंडा घालविण्यासाठी आपण केटोकोनाझोल, जिंक फिरथॉईन, किक्लोपिरॉक्सयुक्त शँपूचा वापर करतो. शँपू नेहमी ओल्या केसांवरच लावायला हवा आणि साधारण 5 मिनिट्स लाऊन ठेवायला हवा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावैेत. पण आपण बऱ्याचदा घाईघाईत आंघोळ करतो आणि शँपूने केस नीट धुवत नाही. इतकंच नाही तर घाईघाईत कधीकधी शँपू केसांमध्ये तसाच राहातो. त्यामुळे इन्फेक्शन होईन कोंडा वाढण्याची शक्यता असते. तर तुम्ही तुमचा कंगवा हा नियमित स्वच्छ करायला हवा. जर तुम्हाला अँटी डँड्रफ शँपूनेही फायदा मिळत नसेल तर तुम्ही अँटी फंगल लोशनचा वापर करून रात्रभर केसांना लावा आणि तसंच सोडून द्या. याचा तुम्हाला फायदा मिळतो. पण हे सर्व करण्याआधी तुम्ही तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांशी बोलून घ्या. पण तुम्हाला यासाठी काही घरगुती उपाय हवे असतील तर आम्ही तुम्हाला अत्यंत सोपे असे घरगुती उपाय सांगणार आहोत,ज्यामुळे सतत केसात कोंडा होत असेल तर निघून जाण्यास मदत मिळते. जाणून घेऊया 5 सोपे घरगुती उपाय.
1. लिंबू रस आणि नारळाचे तेल
Shutterstock
लिंबामध्ये असणारे विटामिन सी आणि नारळाच्या तेलातील पोषक तत्व हे नेहमीच केसांसाठी उपयुक्त कॉम्बिनेशन ठरतं. लिंबाचा रस आणि नारळाचे तेल घ्या आणि मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही केसांना हाताच्या बोटांनी लावा आणि मुळापासून मालिश करा. थोड्या वेळाने केस माईल्ड शँपूने व्यवस्थित धुवा. तुम्हाला कोंड्याच्या समस्यांपासून नक्कीच सुटका मिळेल.
कोंडा का होतो आणि कशी सुटका मिळवावी (How To Get Rid Of Dandruff In Marathi)
2. आवळा, रिठा आणि शिकाकाई
Shutterstock
कित्येक वर्षांपासून केसांसाठी उपयुक्त ठरणारे हे तीन पोषक तत्व आहेत. आवळा, रिठा आणि शिकाकाईचा शँपू आजही केसांसाठी वापरण्यात येतो. यामुळे केस अधिक मजबूत तर होतातच त्याशिवाय त्यात कोंडाही राहात नाही. 100 ग्रॅम आवळा, रिठा आणि शिकाकाई घ्या आणि साधारण 2 लीटर पाण्यामध्ये हे तिन्ही घालून उकळवा. जेव्हा पाणी अर्धे राहील तेव्हा हे पाणी शँपूप्रमाणे वापरा. तुम्ही केसांना हे पाणी आंघोळ करताना लावल्यानंतर केसात 5 मिनिट्स मुरू द्या. त्यानंतर केस धुवा. तुम्हाला लवकरच याचा परिणाम दिसून येईल.
कोंडा असण्याची असतील 5 कारणं तर करा ‘हे’ सोपे उपाय
3. व्हिनेगर
Shutterstock
व्हिनेगर हेदेखील केसांतील कोंड्यापासून सुटका मिळवून देण्यास उपयुक्त ठरते. 2 चमचे व्हिनेगर घ्या आणि त्यात 4 चमचे पाणी मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही केसांना मुळांपासून लावा आणि व्यवस्थित हलक्या हाताने मालिश घ्या. सततच्या कोंड्यापासून त्वरीत सुटका मिळण्यासाठी हा उपाय अप्रतिम आहे.
हिवाळ्यात केसातील कोंडा घालवण्यासाठी करा सोपे उपाय
4. अॅस्प्रिनची गोळी ठरेल परिणामकारक
Shutterstock
तुम्हाला हा पर्याय वाचून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल ना? दोन अॅस्प्रिनच्या गोळ्या घ्या आणि तुमच्या नेहमीच्या अँटीडँड्रफ शँपूमध्ये या गोळ्या मिक्स करा. मग हा शँपू केसांना लावा. त्यानंतर केसांना कंडिशनर लावायला विसरू नका. यामुळे तुमच्या कोंड्याची समस्या दूर होते.
5. नारळाचे तेल आणि कापूर
Shutterstock
नारळाचे तेल आणि कापूर हे कॉम्बिनेशनही तुम्हाला यापासून सुटका मिळवून देते. 100 मिली नारळाच्या तेलामध्ये 3 ग्रॅम कापूर कुटून मिक्स करा. या तेलाचा प्रयोग रोज रात्री करा. हे तेल रोज रात्री केसांना लावा आणि मालिश करा. केसातील कोंडा गायब होईल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक