तुमच्या केसांमध्ये खडूंच्या धुळीसारखा प्रकार कधी दिसतो का? त्यालाच कोंडा असं म्हणतात. वास्तविक हा कोंडा होणं हे अनुवंशिक असतं किंवा वातावरणातील बदलमुळेदेखील हा कोंडा होत असतो. या कोंड्यामुळे त्वचेवर लाल ओरखडे येतता तर काहींच्या त्वचेला खाज येत असते आणि त्याचा परिणाम म्हणजे तुमच्या त्वचेवर फंगस निर्माण होतो, जो तुमच्या तेलकट भागावर चिकटून राहतो.
तुमची त्वचा आणि केसांसाठी कोंडा कसा बाधित आहे
कोंड्यापासून सुटका मिळविण्यासाठी घरगुती उपाय
तुम्हाला जर डोक्यात सतत खाज येत असेल आणि तुम्ही सतत डोकं खाजवत असाल आणि त्यानंतर तुमच्या अंगावर पांढरा कोंडा पडत असेल तर ही सगळी कोंड्याची लक्षणं आहेत. कोंडा पांढरा असतोत शिवाय काही लोकांच्या डोक्यावर तेलकट आणि पिवळ्या रंगाचाही कोंडा दिसून येतो.
तेलकट त्वचा हे तुमच्या केसांमध्ये कोंडा होण्याचं प्रमुख कारण आहे. अशा प्रकारच्या त्वचेमुळे त्वचेवर बुरशी येते आणि कोंडा निर्माण होतो. तेलग्रंथी असलेल्या भागाच्या त्वचेवर कोंडा आक्रमण करत असतो.
तुमच्या केसातील अधिक तेल काढून टाकण्याचं काम शॅम्पू करत असतो. तुम्ही तुमचे केस वेळेवर न धुतल्यास, तुमच्या केसांची त्वचा अधिक तेलकट बनते आणि त्यानंतर त्यावर कोंडा निर्माण व्हायला सुरुवात होते.
तुम्ही काय खाता हेदेखील महत्त्वाचं आहे. अतिचरबी असणारे दुग्धजन्य पदार्थ अथवा इतर पदार्थ तुम्हा खात असल्यास, हेदेखील कोंडा होण्याचं कारण ठरू शकतं. तुमच्या केसांच्या त्वचेवर खाज येणं आणि तुम्हाला त्रास होण्याची यामुळे शक्यता निर्माण होते.
तणाव हे बऱ्याच समस्यांचं मूळ आहे आणि कोंड्याच्या समस्येचंदेखील हे एक मूळ आहे. तणावामुळे तुमच्या त्वचेची स्थिती बरीच खराब होते आणि तुमची प्रतिकारशक्तीदेखील कमी होते. तणावामुळे तुमच्या त्वचेची खाज वाढत जाते. तुम्ही जितके जास्त खाजवणार तितकी तुमची केसांची त्वचा खराब होत जाते.
चुकीचा शॅम्पू वापरून तुम्ही खरचं तुमच्या केसांना हानी पोहचवत आहात. क्षारयुक्त शॅम्पू तुमच्या केसांच्या त्वचेला अधिक हानी पोहचवतो. तुमच्या स्कॅल्पच्या पीएच समतोल करण्याच्या क्षमतेलाही हानी पोहचते आणि त्यामुळे कोंडा निर्माण होतो. काही तेलांचाही शॅम्पूमध्ये समावेश असल्यामुळे कोंडा निर्माण होत असतो.
तुम्ही तुमचे केस नियमितपणे विंचरत नसल्यास, तुम्ही केवळ त्या केसांना कोरडं करत नाही तर त्यामुळे तुमची त्वचा मरून जाऊन त्यावर कोंडा निर्माण करत आहात.
तुम्ही जर नियमितपणे केसांना शॅम्पू लावत नसाल तर, तुमच्या केसांच्या त्वचेवर तेल आणि सेल्स निर्माण होऊन कोंड्यासाठी हे महत्त्वाचं कारण ठरू शकतं.
कोंडा हा तेलकट स्कॅल्प अर्थात त्वचेमुळे होतो. तेलकट त्वचा राहिल्यामुळे त्यावर बुरशी येते आणि मग त्यावर कोंडा तयार होतो. त्यामुळे अधिक तेलामुळे कोंडा निर्माण होत असतो.
जर तुम्हाला तेलकट त्वचेमुळे कोंडा होतो हे कारण माहीत आहे, तर त्यावर तेल लावणं हा उपाय असूच शकत नाही. त्यावर अधिक तेल लावल्यामुळे होणारा परिणाम हा नक्कीच वाईट असणार. तसंच कोंडा असताना तुमच्या केसांवर तेल घासल्यामुळे त्वचेवर लालसरपणा आणि खाज येते.
हा सर्वात चुकीचा समज आहे. जर तुमच्या डोक्यावर असणारा कोंडा हा तुम्ही आधीच खाजवत आहात तर नक्कीच तुमच्या केसांमध्ये तो अधिक प्रमाणात असेल. याचाच अर्थ तुमच्या केसांची त्वचा ही अतिशय खराब अवस्थेत आहे. यामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊन तुमच्या त्वचेतून रक्त येण्याची शक्यता असते आणि इतकंच नाही तर तुम्हाला संसर्गदेखील होऊ शकतो.
याऊलट तुम्ही केसांमध्ये कोंडा असल्यास, काळजी घेण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी केस जास्त वेळा धुवावेत. त्यामुळे कोंडा कमी होण्यास मदत होते. तुम्ही नियमित शॅम्पू केल्यामुळे तुमच्या केसातील बुरशी निघून जाऊन तुमच्या त्वचेचं संरक्षण होण्यास मदत होते कारण तुमच्या केसांतील तेल कमी होतं.
हेअर मास्क्स तुमच्या केसातील कोंडा कमी करायला मदत करतात. आठवड्यातून दोनवेळा जर तुम्ही स्कॅल्प मास्क लावलात तर तुम्हाला कोंड्यापासून सुटका मिळण्यासाठी नक्कीच मदत मिळते. असे हेअर मास्क तुमच्या केसातील कोंडा कमी करतात आणि तुमची त्वचा पुन्हा पहिल्यासारखी करण्यासही मदत करतात. तसंच यामुळे तुमची त्वचा पूर्वीप्रमाणेच निरोगी होते.
केस सरळ करण्यासाठी इस्त्रीचा वापर, कर्लर, ब्लो ड्रायर अथवा स्प्रे या सगळ्यामुळे तुमच्या केसांना त्रास होतो. तुमच्या केसांच्या टेक्स्चरसाठी हे अयोग्य आहे. याचा आणि कोंडा होण्याचा काहीही संबंध नाही. कोंडा हा अनुवंशिक किंवा वातारवणामुळेच होतो. वातावरण आणि तुमचा आहार नक्कीच तुमच्या स्कॅल्पसाठी बाधित असतं.
कोंड्यामुळे केसगळती होते. तसंच तुमच्या केसातील अतितेलामुळे त्वचेलाही हानी पोहचते. त्यामुळे खाज येऊन तुम्ही सतत खाजवल्यास, तुमच्या केसांची मूळंही हलतात आणि त्याचा परिणाम होऊन केसगळती होते.
अजिबात नाही! खरं तर हिवाळ्यात जास्त प्रमाणात कोंडा होतो. हिवाळ्यामध्ये आपला आहार पूर्णतः बदलतो. आपण अधिक दुधाचे आणि तिखट पदार्थ खातो. त्यामुळे कोंडा होण्यासाठी हे पदार्थ मदत करत असतात. तसंच थंडीमुळे, बरेच लोक केसांवरून साधारण चार ते पाच दिवसांनी आंघोळ करतात. त्यामुळे केसांची त्वचा अधिक खराब होते.
तुमचे केस कोरडे बनवतो
तुमच्या केसांना जास्त स्प्लिट एन्ड्स येतात
तुमच्या केसांची त्वचा अधिक खाज येण्याजोगी होते
तुमच्या केसांची त्वचा अधिक तेलकट बनवतो
यामुळे अधिक खाज येते
तुमच्या केसांची वाढ थांबवतो
काही लोकांच्या बाबतीत, केसगळतीला कारणीभूत ठरतो
केस तुटण्यासही कारणीभूत ठरतो
तुमच्या कोंड्याच्या उपचारासाठी तुम्ही सर्वात पहिले तुमच्या केसांसाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार शॅम्पू वापरावा. शॅम्पू बघताना तुम्ही तुमची अडचण सोडवेल असाच पाहा आणि नीट काळजीपूर्वक त्यावरील सूचना वाचून घ्या. त्यात असलेले घटक नीट पाहून घ्या. पिरिथिओन झिंक, सॅलिसिलिक अॅसिड, केटिकोनाझोल आणि सेलेनियम सल्फाईडसारखे घटक आहेत की नाही याची खात्री करून घ्या. या घटकांमुळे खाज येणाऱ्या त्वचेशी लढण्यास आणि तुमच्या केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते.
कंडिशनरमुळे केसांच्या त्वचेला चांगलं मॉईस्चर मिळतं आणि त्वचेला कोरडं पडू देत नाही. तुमच्या केसांसाठी योग्य शॅम्पू सापडल्यानंतर तुम्हाला योग्य कंडिशनर गरजेचा आहे. मेडिकेटेड शॅम्पूमध्ये सॅलिसिलिक अॅसिड असल्यामुळे तुमच्या केसांना योग्य तऱ्हेने कोरडं राखायला मदत होते.
आपल्याला सगळ्यांनाच आपल्या केसांची स्टाईल त्यांना रंगवून वा स्ट्रेटनर्स आणि कर्लर वापरून करायला आवडते ना? खरं आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या उत्पादनांमुळे केसांची खूपच हानी होत असते. आपल्या संवदेनशील केसांच्या त्वचेला हानी पोहचवणारे घटक बऱ्याचदा या उत्पादनांमध्ये असतात. याशिवाय नैसर्गिक आणि अकृत्रिम असे सुगंधही कोंडा होण्यास कारणीभूत ठरत असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, केसांना ब्लीच करणं सर्वात वाईट आहे. काही कार्यक्रमासाठी केसांच्या स्टाईल करणं कधीही चुकीचं नाही मात्र तुम्ही केसांना बाधक असणारी उत्पादनं न वापरता त्यांची योग्य काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.
तणावामुळे प्रत्यक्षरित्या काही कोंडा होत नाही पण तुमच्यातील प्रतिकारक शक्ती तणावाने कमी होत असते. यामुळे तुमच्या खाण्याच्या सवयींवर परिणाम होतो आणि तोच परिणाम साहजिक तुमच्या त्वचा, शरीर आणि केसांवरही होतो. या सर्वामुळे तुमच्या केसांची त्वचा अधिक संवेदनशील होते आणि त्यावर नैसर्गिकरित्या बुरशी येते. त्यामुळे तुम्हाला शांत ठेवण्यासाठी नक्की काय उपाय आहेत ते शोधून काढा. तुम्ही तुमच्या नेहमीच्या कामातून वेळ काढून पिकनिकला जा, एखाद्या दिवशी स्पा करून घ्या. चांगलं संगीत ऐका किंवा चित्रपट बघा वा योगाला जात. निरोगी आयुष्य हे निरोगी केस आणि त्वचेसाठी सर्वात जास्त महत्त्वाचं असतं.
कोंडा असल्यास, केसांना तेलाने मसाज देणं कधीही योग्य नाही. त्यामुळे कोंडा अधिक वाढतो. पण नारळाचं तेल मात्र यासाठी वेगळं आहे. तुमच्या स्कॅल्पसाठी तुम्ही नारळाच्या तेलाचा वापर करा आणि तुम्हाला स्वतःला त्यामधील तफावत जाणवेल. नारळाच्या तेलामध्ये अँटीफंगल गोष्टी असतात त्यामुळे तुमच्या स्कॅल्पला व्यवस्थित मॉईस्चराईज करण्याचं काम नारळाचं तेल करतं. नारळाच्या तेलातील अँटीफंगल घटक हे अँटी - डँड्रफ शॅम्पूमधील घटकाप्रमाणेच असतात.
तुमच्या केसातील आवश्यक पोषक तत्त्व जपायला मुलतानी माती मदत करते आणि केसांना चमकदार, सिल्की आणि कोंडामुक्त ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. तीन चमचे मुलतानी माती घेऊन त्यामध्ये पाणी घालून घट्ट पेस्ट बनवावी आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस मिसळावा. हे मिश्रण तुमच्या केसांना आणि केसांच्या त्वचेला लाऊन साधारण अर्धा तास तसंच ठेऊन द्यावं. त्यानंतर पाण्याने केस धुवावे. याचा परिणाम नक्कीच तुम्हाला हवाहवासा वाटेल.
बऱ्याच मेडिकेटेड अँटी डँड्रफ शॅम्पूप्रमाणेच अॅस्पिरीनमध्ये सॅलिसिलिक अॅसिडचं प्रमाण असतं. सॅलिसिलिक अॅसिड त्वचेला यातून चांगलं करण्यासाठी मदत करते तर त्यामुळे कोंडा निघून जाण्यासाठी अधिक सोपं होतं. दोन अॅस्पिरीनच्या गोळ्यांची पावडर करून घ्या. तुमच्या नियमित शॅम्पूमध्ये ही पावडर जेव्हा तुम्ही डोक्यावरून आंघोळ करणार असाल तेव्हा प्रत्येकवेळी मिसळा. पाच मिनिट्ससाठी तुमच्या केसांवर हे मिश्रण तसंच ठेवा आणि नंतर तुमचे केस साध्या शॅम्पूने पुन्हा एकदा धुवा.
तुमच्या केसांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि कोंडा कमी करण्यासाठी खरंच चहाच्या झाडाच्या तेलाचा वापर योग्य आहे. तुम्ही हे तेल नुसतंदेखील वापरू शकता आणि साधारण 5 मिनिट्स हे तेल सुकू द्यावं. त्यानंतर तुम्ही तुमच्या शॅम्पूने केस धुऊन टाकावेत. तसंच तुम्ही तुमच्या शॅम्पूमध्येदेखील हे टी ट्री ऑईल अर्थात चहाच्या झाडाच्या तेलं मिसळून तुमच्या केसांना लावू शकता. असं केल्यामुळे तुमच्या केसांवर चांगलाच परिणाम दिसून येईल.
बेकिंग सोड्याने केसांमध्ये एक प्रकारची जादूच होते. तुम्हाला बेकिंग सोड्याचा नुसता वापरही करू शकता किंवा एखाद्या दुसऱ्या उत्पादनाबरोबरही तुम्ही हे मिसळू शकता. कोंडा होण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या बुरशीचं प्रमाण बेकिंग सोड्यामुळे कमी होतं. तुमचे केस पाण्याने भिजवा आणि त्यानंतर तुम्ही स्कॅल्पमध्ये बेकिंग सोडा लावा. त्यानंतर दहा मिनिट्सने तुम्ही केस धुऊन टाका. तुमचे केस धुतल्यानंतर तुम्ही लगेच तुमच्या केसांना शॅम्पू करू नका. आधी तुम्हाला तुमचा स्कॅल्प थोडा कोरडा झाला आहे असं वाटेल, पण थोडा वेळ तसेच तुम्ही तुमचे केस राहू द्या आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या केसात कोंडा जाणवणार नाही.
कोंडा असलेल्या केसांसाठी दही हा अतिशय परिणामकारक असा उपाय आहे. प्रोबायोटिक्सचा चांगला स्रोत म्हणजेच दही आणि त्यामुळे कोंड्याकरिता हा अतिशय आदर्श असा उपाय आहे. तुमचे केस शॅम्पू लाऊन धुऊन टाका. त्यानंतर त्यावर दही लावून 15 मिनिट्स ठेवा. त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा शॅम्पू घेऊन केस धुवावे. तसंच तुम्ही एक दिवस आड, तुमच्या केसांना आंघोळीच्या आधी एक तास लाऊन ठेवू शकता.
मेथीच्या बियांमध्ये काही मिनरल्स आणि व्हिटामिन्स असतात जी कोंडा कमी करण्यासाठी मदत करतात. मेथीच्या बिया कुटून घ्याव्यात आणि रात्रभर गरम पाण्यात भिजवून ठेवाव्यात. हे मिश्रण वाटून केसांना लावावं आणि मग सकाळी पुन्हा शॅम्पूने केस धुवावेत.
नारळ तेल हा कोंड्याकरिता सर्वात चांगला उपाय आहे. त्वचे हायड्रेट करण्यासाठी आणि कोरड्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नारळ तेल उपयोग असतं. शॅम्पू करण्यापूर्वी केसांना नारळ तेलाने मसाज करून घ्या. निदान तासभर तरी नारळ तेल केसामध्ये मुरायला हवं. त्यानंतर शॅम्पूने तुमचे केस धुऊन टाका. तसंच नारळ तेल असलेला शॅम्पूदेखील तुम्ही वापरू शकता.
लिंबातील अॅसिडिटी तुम्हाला तुमच्या स्कॅल्पमधी पीएच पातळी समतोल करण्यासाठी मदत करते ज्यामुळे कोंडादेखील होत नाही. तीन चमचे लिंबू रसाने तुमच्या केसांच्या त्वचेचा मसाज करा आणि त्यानंतर पाण्याने केस धुऊन टाका. कंडिशनर अजिबात लावू नका. ही प्रक्रिया आठवड्यातून दोन वेळा नक्की करा.
स्कॅल्पवरील डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी व्हिनेगरची अॅसिडिटी मदत करते. केसांच्या त्वचेला लागलेली बुरशी कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगरमधील पीएच मदत करते करत असून कोंडा न होण्यासाठी मदत करते असं म्हटलं जातं. एका स्प्रे च्या बाटलीत पाव कप पाण्यात थोडंसं अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि तुमच्या स्कॅल्पवर फवारा. तुमचं डोकं टॉवेलने गुंडाळून ठेवा आणि साधारण 15 मिनिट्स ते एक तास बसून राहा आणि नंतर तुमचे केस धुऊन टाका. असं आठवड्यातून दोन वेळा करा.
माऊथवॉशमध्ये कोंडा घालवण्यासाठी लागणारे अँटीफंगल घटक असतात ज्यामुळे कोंडा कमी होतो. तुमचे केस तुमच्या नियमित शॅम्पूने धुवा आणि त्यानंतर माऊथवॉशने धुवा. त्यानंतर तुमचे केस कंडिशनर लावून धुवा.
लिंबाच्या पानांमध्ये अनेक वैद्यकीय गुण असल्याचे सर्वांनाच माहीत आहे. तसंच यामध्ये कोंडा घालवण्यासाठी लागणारे अँटीमायक्रोबायल निमोनलदेखील आहे. 5-6 लिंबाची पानंं घ्या आणि मिक्सरमधून त्याची जाडसर पेस्ट बनवा. ही पेस्ट तुमच्या केसांना लावा आणि साधारण 20 मिनिट्स बसा आणि त्यानंतर पाण्याने तुमचे केस धुवून टाका.
ऑरेंज पील पॅकमध्ये अॅसिडिक घटक असतात ज्यामुळे केसातील अधिक तेल काढून टाकण्यास मदत होते आणि तेल कमी झाल्यामुळे तुमच्या केसातील कोंडाही कमी करण्यास मदत होते. संत्र्यांचे साल काढून त्याची मिक्सरमध्ये पेस्ट बनवा आणि तुमच्या केसांच्या त्वचेला लावा आणि ही पेस्ट लावून साधारण अर्धा तास तुम्ही बसून राहा. त्यानंतर तुमचे केस शॅम्पूने धुवा आणि कंडिशनरचा वापर टाळा.
तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुण्यापूर्वी कोंडा काढून टाकण्यास मीठाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. तुमची केसांची त्वचा कोरडी असल्यास, तुमच्या केसांना मीठाने मसाज करा. त्यानंतर शॅम्पूने केस धुवा आणि त्यावर कंडिशनरचा वापर करा. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही या पद्धतीचा अवलंब करू शकता.
आपण कोरफड आपल्या त्वचेसाठी प्रत्यक्षरित्या वापरू शकतो किंवा आपल्या फेस पॅक्समध्येही याचा वापर करू शकतो. आपली त्वचा आणि आपल्या स्कॅल्पसाठी एका जादूप्रमाणे कोरफड काम करते. कोरफडमध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटक हे कोंड्यापासून तुमच्या केसांचं रक्षण करण्यासाठी मदत करतात. तुमच्या डोक्यात खाज येत असल्यास, हा सर्वात चांगला उपाय आहे. कोरफडमधील रस तुमच्या स्कॅल्पला लावा आणि साधारण 15 मिनिट्स तसंच राहू द्या आणि त्यानंतर शॅम्पूने केस धुवून टाका.
कोंड्याला कारणीभूत ठरणाऱ्या मायक्रोब्सससाठी लसूण हे अगदी उत्तम औषध आहे. यामधील अँटीफंगल घटक योग्य काम करतात. खलबत्त्याचा वापर करून लसूण ठेचून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. तुमच्या स्कॅल्पवर ही पेस्ट लावा आणि 15 मिनिट्ससाठी बसून राहा. लसणाला अतिशय उग्र वास असल्यामुळे त्यामध्ये तुम्ही दोन चमचे मध घालून मिक्स करून घ्या आणि तुमच्या केसांना लावा. त्यानंतर पाण्याने शॅम्पू लावून केस धुवून टाका.
ऑलिव्ह ऑईल हा कोंड्याकरिता उत्कृष्ट उपाय आहे. कोंड्याची काळजी घेण्यासाठी ऑलिव्ह ऑईल दोन प्रकारे मदत करते. एक तर, स्कॅल्पचे कोरडे क्षेत्र ऑलिव्ह ऑईल चांगल्या तऱ्हेने मॉईस्चराईज करते आणि दुसरं म्हणजे कोंड्याची समस्या घालवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल स्केली क्षेत्रातील कोरडेपणा शोषून घेण्यास मदत करते. यामुळे कोंड्याच्या वेगवेगळ्या खपल्या पडण्यापेक्षा जास्त प्रमाणात कोंडा निघून जातो. तुमचे केस धुण्यापूर्वी दहा मिनिट्स आधी ऑलिव्ह ऑईल तुमच्या केसांना लावा.
तुम्ही कदाचित तुमच्या सलॉन एक्सपर्टकडून अंड्याचा बलक तुमच्या केसांसाठी चांगला असल्याचं सांगण्यात आलं असू शकेल. तेव्हा नक्की का? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल ना? अंड्याच्या बलकात बायोटिन असतं जे कोंड्यावरील चांगला उपचार आहे आणि शिवाय यामुळे तुमचे केस अधिक निरोगी आणि अधिक सिल्की राहतात. अंड्याचे 1-2 बलक घेऊन तुमच्या केसांच्या त्वचेवर मसाज करका आणि एक तासासाठी सुकत ठेवा. तुम्ही तुमचे केस शॉवर कॅपने कव्हरही करू शकता. त्यानंतर एक तासाने तुम्ही शॅम्पूने आंघोळ करा आणि कंडिशनर लावणं मात्र टाळा.
सीडरवुड तेलामध्ये कोंडा आणि इतर स्कॅल्पची स्थिती आटोक्यात आणण्यासाठी लागणारे अँटी-सेबोऱ्हेईक घटक आहेत. सीडरवुड ऑईलमध्ये सायप्रस इसेन्शियल तेल, ज्युनिपेर इसेन्शियल तेल आणि कॅरियर ऑईल मिक्स करून घ्यावं. हे मिश्रण तुमच्या डोक्यावरील त्वचेला लावा आणि एक तास सुकू द्या. त्यानंतर तुमचे केस शॅम्पू आणि गरम पाण्याने धुवा. तसंच तुमच्या या मिश्रणात पाव कप पाणी वाढवून पुन्हा ते मिश्रण लावून पुन्हा एकदा केस धुवा.
अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल घटकांकरिता बेसिलची पानं प्रसिद्ध आहेत. कोंड्यावरील उपचारांसाठी या पानांची मदत तर होतेच शिवाय मजबूत करण्यासाठीदेखील याची मदत होते. बेसिलची पानं घेऊन ती मिक्सरमधून वाटून घ्यावीत आणि त्याची पेस्ट करा. त्यामध्ये 2 चमचे पाणी आणि 3 चमचे आवळा पावडर मिक्स करा. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि त्यानंतर तुमच्या स्कॅल्पवर लावा. साधारणतः 30 मिनिट्स हे मिश्रण लावून ठेवा. नंतर पाण्याने आणि शॅम्पू लावून केस धुवून टाका.
ग्रीन टीमध्येदेखील अँटीफंगल घटक असतात. तुमच्या केसांची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि कोंड्याशी लढण्यासाठी यातील अँटीऑक्सीडंट्स पॉलीफिनॉल्स मदत करतात. दोन ग्रीन टी बॅग्ज गरम पाण्यात बुडवून ठेवा. त्यानंतर ते पाणी थंड होऊ द्या आणि मग केसाला ते पाणा लावा. त्यानंतर शॅम्पू लावून तुमचे केस धुऊन टाका.
हीनाचा उपयोग केवळ केस काळे करण्यासाठीच नाही होत तर याची पानं कोंड्यासह केसांवरील अनेक उपचारांसाठी उपयोगी पडतात. याचा उपयोग केसांच्या त्वचेतील तेल कमी करायला आणि कंडिशनर म्हणूनदेखील होतो. चांगल्या परिणामांसाठी, दोन चमचे लिंबाचा रस आणि दह्यासह हीना मिक्स करावे. त्यानंतर हे मिश्रण तुमच्या स्कॅल्पवर लावण्यापूर्वी साधारण 8 तास भिजवून ठेवावे. केसांवर लावल्यानंतर 2 तास तसंच ठेऊन द्यावं आणि नंतर शॅम्पू लाऊन धुऊन टाकावं.
आपल्या शरीरामध्ये ओमेगा - 3 फॅटी अॅसिड महत्त्वाचं काम करत असतं. ओमेगा - 3 मुळे कोंड्याची लक्षणं आणि इतर त्रासापासूनही सुटका मिळते. फिश ऑईलमध्ये ओमेगा - 3 चं फॅटी अॅसिड समाविष्ट असतं. कोंडा घालवण्यासाठी आणि कोरड्या स्कॅल्पवरील उपाय म्हणून यातील अँटी-इन्फ्लेमेटरी घटक मदत करतात. तुमचा कोंडा घालवण्यासाठी तुम्ही फिश ऑईल असणाऱ्या कॅप्सुल्सदेखील घेऊ शकता. दिवसभरात दोनपेक्षा अधिक कॅप्सुल घेणं मात्र योग्य नाही.
हर्बल उत्पादनांची जेव्हा गोष्ट येते तेव्हा हिमालयाइतकं विश्वासू उत्पादन दुसरं कोणतंही नाही. कोंडा घालवण्यासाठी आणि स्कॅल्प काढून टाकण्यासाठी त्यांचा अँटी-डँड्रफ शॅम्पू खूपच फायदेशीर आहे. हा शॅम्पू 100% हर्बल असून केसांसाठी पूर्णतः योग्य असा आहे.
किंमत: रू. 128. खरेदी करा इथे
हेड अँड शोल्डर्स स्मूथ अँड सिल्की अँटी-डँड्रफ शॅम्पू तुमच्या केसांना अधिक सॉफ्ट बनवण्यास मदत करतो आणि केसांना मॉईस्चराईज करतो. तुमच्या कोंड्याशी दोन हात करण्यासाठी या शॅम्पूची मदत होते. तसंच तुमचे केस तसेच सिल्की राहण्यासाठीही या शॅम्पूची मदत होते.
किंमत: रू. 242. खरेदी करा इथे
VLCC डँड्रफ कंट्रोल शॅम्पूमध्ये रोझमेरी आणि मिंट असे घटक असतात जे तुमच्या केसांच्या टेक्स्चरनाना कोणतीही हानी न पोहचवता कोंडा कमी करण्यास मदत करतो. स्कॅल्प इन्फेक्शनविरुद्ध हे अँटीबॅक्टेरियल रोझमेरी ऑईल मदत तर करतेच शिवाय कोंडा निघून जाण्यासाठीही परिणामकारक आहे.
किंमत: रू. 117. खरेदी करा इथे
तुम्हाला केसांसाठी चांगलं उत्पादन हवं असेल तर अर्थातच लॉरियल हा चांगला ब्रँड असून त्याचा परिणाम खूपच चांगला आहे. तुमच्या मुळांना मजबूत ठेवून तुटण्यापासून लॉरियल फॉल रेझिस्ट अँटी-डँड्रफ शॅम्पू मदत करतो आणि त्यामुळे कोंडा होण्याापासूनही मज्जाव करतो.
किंमत: रू. 150. खरेदी करा इथे
पतंजलिची उत्पादनं आता सगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत आणि आता त्यांनी अँटी-डँड्रफ शॅम्पूही बनवला असून हा कोंड्यापासून तुमची सुरक्षा करतो. तसंच मुळांची मजबूतीही वाढवतो.
किंमत: रू. 100. खरेदी करा इथे
द बॉडी शॉफच्या या ताज्या आणि वेगळ्या शॅम्पूचा वापर करून तुम्ही तुमचा कोंडा घालवू शकता. यामध्ये आल्याचा अर्क, बर्च झाडाचा अर्क आणि व्हाईट व्हिलो झाडाचा अर्क आणि इथिओपियामधील कम्युनिटी ट्रेड हनी या सर्वांच्या मिश्रणाने हा बनलेला शॅम्पू कोंड्यासाठी एक उत्कृष्ट उपाय आहे.
किंमत: रू. 645. खरेदी करा इथे
बायोटिकचा बायो मार्गोसा अँटी-डँड्रफ शॅम्पू आणि कंडिशनर हा टू इन वन शॅम्पू आणि कंडिशनर आहे आहे आणि कोरड्या फ्लॅकी त्वचेमुळे झालेल्या कोंड्यावरील चांगला उपचार आहे.
किंमत: रू. 238. खरेदी करा इथे
फॅबइंडिया टी ट्री डँड्रफ कंट्रोल शॅम्पूच्या मदतीने कोंड्यापासून आणि खाजेपासून सुटका करून घ्या. टी ट्री ऑईलमधील घटकांमुळे कोंड्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. बॅक्टेरियल आणि फंगल समस्यांपासूनची हा शॅम्पू संरक्षण देतो आणि तुमचे केस निरोगी ठेवतो.
किंमत: रू. 350. खरेदी करा इथे
डव्ह डँड्रफ केअर शॅम्पूमुळे कोंडा निघून जाण्यास मदत होते आणि कोरड्या त्वचेपासून सुटका मिळून त्वचा मॉईस्चराईज करायला मदत होते. यामुळे तुमचे केस मऊ, मुलायम आणि कोंडामुक्त होतात.
किंमत: रू. 242. खरेदी करा इथे
खादी नीम अलो वेरा हर्बल क्लिन्झर तुम्हाला कोंडा, फ्लॅकी स्कॅल्प यापासून संरक्षण देतो आणि कोंड्यापासून तुमचं रक्षण करतो. तसंच तुमचे कोरडे केस आणि गळणारे केस यावर रोख लावण्यासाठीही या शॅम्पूची मदत होते.
पुढे वाचा -
How to get rid of Dandruff in Hindi
किंमत: रू. 188. खरेदी करा इथे