मेकअपचे कुतूहल अनेकांना असते. परफेक्ट मेकअप कसा करता येईल याचे अनेक व्हिडिओ तुम्हीही पाहिले असतील. व्हिडिओमधील परफेक्ट लुक करताना तुम्ही नक्कीच ‘प्राईमर’ हा शब्द मेकअप आर्टिस्टकडून ऐकला असेल. मेकअपमध्ये प्राईमर हे अत्यंत महत्वाचे असून त्याचा वापर कसा करायचा आणि त्याचे फायदे काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. याचे फायदे वाचल्यानंतर तुम्ही नक्कीच याचा वापर सुरु कराल.मग करुया सुरुवात ?
Table of Contents
- प्राईमर म्हणजे काय? (What Is Primer)
- प्राईमर वापरण्याचे फायदे (Benefits Of Primer)
- त्वचेच्या प्रकारानुसार निवडा प्राईमर (How To Choose A Primer For My Skin Type?)
- प्राईमर लावण्याची योग्य पद्धत कोणती (How To Apply Primer The Right Way)
- या 5 बेस्ट प्राईमरची निवड (Best Primer)
- तुम्हालाही पडलेत का प्रश्न ( FAQs)
प्राईमर म्हणजे काय? (What Is Primer)
shutterstock
ज्या प्रमाणे भिंती रंगवण्याआधी प्राईमर लावले जाते. प्राईमर लावल्यामुळे भिंती जशा स्मुथ आणि चांगल्या दिसतात. अगदी त्याच प्रमाणे तुमचा चेहरा फ्लॉलेस दिसण्यासाठी प्राईमर महत्वाचे असते. मेकअपपूर्वी प्राईमर लावले जाते. तुमच्या त्वचेच्या रंगाप्रमाणे किंवा पारदर्शक स्वरुपात हे क्रिम असते. त्याच्या लावण्यानंतर तुमच्या मेकअप लुकमध्ये बराच फरक पडतो. त्यामुळे मेकअप लावण्याआधी तुमच्या त्वचेसाठी लागणारे हे अत्यंत महत्वाचे असे प्रोडक्ट आहे.
प्राईमर वापरण्याचे फायदे (Benefits Of Primer)
आता प्राईमरचा उपयोग कसा करावा हे तुम्हाला कळले असेलच. पण त्याचे फायदे काय हे देखील तुम्ही जाणून घेणे गरजेचे आहे. म्हणून जाणून घेऊया प्राईमर लावण्याचे फायदे
मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये
1. स्मुथ बेस (Create Smooth Base)
shutterstock
कितीही चांगला मेकअप तुम्हाला करता येत असला तरी देखील तुमची त्वचा चांगली दिसणे आवश्यक असते. प्राईमर लावल्यानंतर तुमच्या त्वचेला एक स्मुथ बेस मिळतो. तुमची त्वचा खडबडीत न राहता ती एकसारखी दिसल्यामुळे त्यावर केलेला मेकअप हा अधिक खुलून दिसतो. फाऊंडेशन लावण्याआधी तुम्ही प्राईमर लावले तर तुम्हाला हा फरक लगेच जाणवतो.
2. स्किनटोन एकसारखे करण्यास मदत (Even Skin Tone)
shutterstock
उन्हात सतत फिरणे, प्रदुषण या सगळ्यामुळे खूप जणांची स्किनटोन एकसारखी नसते. कपाळ नाक अनेकदा काळवंडलेली असतात. एका रात्रीस तुमची स्किनटोन तुम्हाला सुधारता येत नाही. प्राईमर तुम्हाला क्वीक फिक्स करण्याचे काम करते. तुमची स्किनटोन एकसारखी ठेवण्यास प्राईमर मदत करते.
3. त्वचा ठेवते चांगली (Nourishes Skin)
shutterstock
हेवी मेकअप करण्याची सवय असेल त्यांना त्यांच्या त्वचेची फारच काळजी असते. जर तुम्ही सतत मेकअप करत असाल तर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला प्राईमर लावून मग मेकअप केला तर तुमच्या त्वचेवर एक संरक्षक कवच तयार होते. प्राईमर लावल्यामुळे मेकअप तुमच्या त्वचेत मेकअप मुरत नाही. त्यामुळेच तुमची त्वचा चांगली राहते.
4. चेहऱ्यांवरील सुरकुत्या करते कमी (Wrinkle Free Skin)
shutterstock
मेकअप केल्यानंतर अनेकांना चेहऱ्याला सुरकुत्या पडतात. पण तुम्ही जर प्राईमरचा उपयोग केला तर तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या सुकुत्याही झाकल्या जातात. तुमची त्वचा अधिक चांगली दिसू लागते. तुम्हालाही त्वचेला सुरकुत्या पडत असतील आणि त्यामुळे तुमचा मेकअप फुटत असेल तर मग तुम्ही हमखास प्राईमरचा वापर करायला हवा.
5. पोअर्स करते कमी (Reduces Pores)
shutterstock
काही वयानंतर चेहऱ्यावर पोअर्स दिसू लागतात. आता तुमच्या चेहऱ्यावर असलेले पोअर्स दिसायला तसे वाईट दिसत नाही. पण तुम्ही नीट निरखून पाहिले तर पोअर्समुळे चेहऱ्यावर बारीक बारीक खड्डे दिसू लागतात. ते दिसायला जरी खराब वाटत नसले तरी देखील ते चेहऱ्यावर बराच परिणाम करतात. कारण त्यामध्ये मेकअप गेला तर तुम्हाला पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. अशावेळी तुमच्या पोअर्सचा आकार कमी करुन त्यांना तात्पुरते बंद करण्याचे काम प्राईमर करते. अनेक जण या कारणासाठीच प्राईमर लावण्याचा सल्ला देतात.
6. तेलकटपणा करते कमी (Reduce Oil And Shine)
shutterstock
मेकअप लावल्यानंतर अनेकांची त्वचा तेलकट दिसू लागते. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चकाकी येते. ही चकाकी चांगली नसते. कारण यामुळे चेहऱ्याला जास्त त्रास होऊ शकतो. ही चकाकी चेहऱ्यावर आलेला तेलकटपणा असतो. जो त्वचेच्या आरोग्यासाठी चांगला नाही.त्यामुळे तुम्हाला पिंपल्स,रॅशेश येण्याची शक्यता असते. त्यामुळे तेलकटपणा कमी करण्यासाठी तुम्ही प्राईमरचा उपयोग करा.
7. चेहऱ्यावरील लालपणा करते कमी (Reduce Redness)
shutterstock
काही जणांचा चेहरा फारच लाल असतो. मेकअप केल्यानंतरही त्याचा लालपणा कमी होत नाही.उलट त्यांचा चेहरा अधिक लाल दिसू लागतो. पर्यायाने मेकअप केल्यानंतर चेहरा उठून न दिसता काळवंडलेला दिसू लागतो. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर मग तुमच्यासाठी प्राईमर बेस्ट आहे. कारण प्राईमर लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरील लालपणा कमी होतो.
तुम्हीही जिमला जाताना करता का मेकअप, मग हे वाचा
8. तुम्हाला देते परफेक्ट लुक (Give Perfect Look )
shutterstock
आता मेकअप केल्यानंतर प्रत्येकाला हवा असतो परफेक्ट लुक. परफेक्ट लुकसाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला अपेक्षित असलेला लुक मिळू शकतो तो फक्त प्राईमरमुळे.वर दिलेले फायदे लक्षात घेता तुम्हाला लुक मिळवण्यासाठी तुम्ही प्राईमरचा वापर करु शकता.
त्वचेच्या प्रकारानुसार निवडा प्राईमर (How To Choose A Primer For My Skin Type?)
shutterstock
आता बाजारात अनेक प्रकारचे प्राईमर मिळतात. पण त्या कोणत्याही गोष्टींचा वापर थेट तुमच्या त्वचेवर करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. प्राईमरच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. आता हे ही एक ब्युटी प्रोडक्ट असल्यामुळे तुम्हाला तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्हाला निवडणे गरजेचे आहे. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार प्राईमर निवडताना तुम्ही नेमकी काय काळजी घ्यायला हवी ते पाहुया.
तेलकट त्वचेसाठी प्राईमर निवडताना (Primer For Oily Skin)
तेलकट त्वचा आणि मेकअपची निवड ही फार महत्वाची असते. कारण तुम्ही तैलीय पदार्थ असलेले मेकअप निवडले तर तुम्हाला फारच नुकसान होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला प्राईमर निवडतानाही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तुम्ही ऑईल कंट्रोल करणारे प्राईमर निवडायला हवे. जर तुम्ही ऑईली प्राईमर निवडले तर तुमच्या त्वचेला त्यामुळे त्रास होऊ शकतो.
उदा. जर तुम्ही घेतलेल्या प्राईमरमध्ये तैलीय पदार्थ उदा. कोको बटर आणि काही खास तेलं असतील तर असे प्राईमर तुम्ही अजिबात निवडू नका.
कोरड्या त्वचेसाठी प्राईमर निवडताना (Primer For Dry Skin)
कोरड्या त्वचेसाठी प्राईमर निवडणे म्हणजे तेलकट त्वचेच्या संपूर्ण विरोधात तुम्हाला प्राईमरची निवड करायची आहे. तुम्ही जर तेलकट त्वचेसाठी योग्य असणारे प्राईमर निवडले तर तुमची त्वचा अधिक कोरडी दिसू शकता. तुमच्या त्वचेला मॉश्चराईज करणारे प्राईमर तुम्ही निवडणे आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही प्राईमर निवडताना त्यातील मॉश्चरायझिंग घटक निवडून घ्या. म्हणजे तुम्हाला ते प्राईमर अधिक शोभून दिसेल.
नाजूक त्वचेसाठी प्राईमर निवडताना (Primer For Delicate Skin)
ज्यांची त्वचा खूप नाजूक असते. त्यांना तर सगळ्याच निवडीबाबत फारच सतर्क असावे लागते. प्राईमरची निवड करताना तुम्हाला एक गोष्ट विचारात घ्यायची आहे ती म्हणजे तुम्ही निवडलेल्या प्राईमरमध्ये शक्यतो केमिकल्स कमी असावेत. जितके नैसर्गिक घटक त्यात जास्त असतील तितकाच जास्त फायदा तुम्हाला यामधून मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी ती म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो ते तुम्ही तपासून पाहायला हवे.
प्राईमर लावण्याची योग्य पद्धत कोणती (How To Apply Primer The Right Way)
shutterstock
- तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
- चेहऱ्यावरील पाणी टिपून चेहरा कोरडा करुन घ्या.
- अगदी किंचितसे प्राईमर तळहातावर घ्या.
- डोळे, गाल, कपाळ, हनुवटी, नाक या भागांवर प्राईमरचे टिपके लावा.
- हाताने प्राईमर पसरुन तुमचा संपूर्ण चेहऱ्याला ते लावा. ( प्राईमर जास्त चोळत राहू नका.)
या 5 बेस्ट प्राईमरची निवड (Best Primer)
प्राईमरचे महत्व लक्षात घेतल्यानंतर जर तुम्ही प्राईमर घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी 5 बेस्ट प्राईमरची निवड केलेली आहे. तुम्ही कधीही प्राईमर वापरले नसेल तर अगदी बिनधास्त या प्राईमरची निवड करु शकता
1. स्मॅशबॉक्स फोटो फिनीश ऑईल अॅण्ड शाईन कंट्रोल प्राईमर (Smashbox Photo Finish Oil & Shine Control Primer)
स्मॅशबॉक्स हा ब्रँड मेकअप प्रोडक्टसाठी फारच चांगला आहे. तुम्हाला हवा असलेला मॅट लुक या मेकअपनंतर मिळू शकेल. किमतीच्या तुलनेत ही वस्तू महाग असली तरी चांगली आहे. तुम्हाला हे प्राईमर बरेच दिवस वापरता येईल. अगदी किंचितसे प्राईमरही तुम्हाला पुरेसे आहे.
कोणत्या स्किनसाठी ( skin type): तेलकट त्वचेसाठी योग्य
2. नायका प्रेप मी अप (Nykaa Prep Me Up! Face Primer)
नायकाचे ब्युटी प्रोडक्ट फारच प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकतेच आणलेले प्रेप मी अप प्राईमर फारच प्रसिद्ध आहे. पारदर्शक असे हे प्राईमर असून ते लावायला इतके सोपे आहे की, तुम्हाला ते लावले असे वाटणार नाही.
कोणत्या स्किनसाठी ( skin type): सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी योग्य
3. इनसाईड प्राईमर थ्री इन वन ऑईल फ्री (Insight Vov Insight Primer 3 In 1 Oil Free)
इनसाईटचे हे प्राईमर स्वस्त आणि मस्त आहे. अनेकांनी हे प्राईमर त्यांना आवडले असल्याचे म्हटले आहे. तेलकट त्वचा किंवा नाजूक त्वचा असणाऱ्यांसाठी हे योग्य आहे.
कोणत्या स्किनसाठी ( skin type): तेलकट आणि नाजूक त्वचेसाठी हे प्राईमर चांगले
4. नीक्स प्रोफेशनल मेकअप पिग्मेंट प्राईमर (NYX Professional Makeup Pigment Primer)
जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील. पिंपल्समुळे खड्डे पडले असतील तर त्यांना लपवून फाऊंडेशनचे फूल कव्हरेज या प्राईमरमुळे मिळू शकेल.
कोणत्या स्किनसाठी ( skin type): तेलकट आणि पिंपल्स असलेल्या त्वचेसाठी
5. क्लीनिक्यू सुपेरिअर फेस प्राईमर- युनिव्हर्सल फेस (Clinique Superprimer Face Primers – Universal Face)
कोणत्याही चेहऱ्याला सूट होईल असे हे प्राईमर आहे. या प्राईमरची किंमत तुलनेने अधिक आहे. पण तुम्हाला चांगले काही वापरायचे असेल तर तुम्हाला या प्राईमरची निवड करायला काहीच हरकत नाही.
कोणत्या स्किनसाठी ( skin type): कोणत्याही चांगल्या त्वचेसाठी चांगले
तुम्हालाही पडलेत का प्रश्न ( FAQs)
1. प्राईमर आपण रोज लावू शकतो का? (Can we apply primer daily?)
जर तुम्ही रोज मेकअप करत असाल किंवा तुम्हाला रोज मेकअप करणे गरजेचे असेल तर तुम्ही नियमित प्राईमर लावायला हवे. या मेकअपमध्ये फाऊंडेशन असेल तर तुम्हाला प्राईमर लावणे फारच गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला प्राईमर रोज लावण्याची तशी काही गरज नाही.
2. कोणत्याही मेकअपशिवाय प्राईमर वापरले तर चालेल का? (Can we use primer without makeup ?)
मेकअप तुमच्या थेट त्वचेला केला जातो. अशावेळी तुमच्या पोअर्समध्ये सगळा मेकअप जातो. जर तुम्ही मेकअप करत नसाल तर तुम्हाला प्राईमरची फारशी गरज नाही. तुम्हाला मेकअपशिवाय चेहऱ्याला काही लावायचे असेल तर सीरम, एखादे फेस मिस्ट किंवा मॉश्चरायझर लावा.
3. प्राईमरचे काही दुष्परिणाम आहेत का? (Can primer give any side effects)
प्राईमर तुमच्या त्वचेच्या संरक्षणासाठी असले तरी देखील योग्य प्राईमरची निवड करणेही गरजेचे असते. जर तुमची त्वचा फार सेंसिटीव्ह असेल तर तुम्ही कोणाचा तरी सल्ला घेऊन मगच प्राईमर खरेदी करा.नाहीतर तुम्हाला त्यामुळे त्रास होऊ शकेल.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.