ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
5 styling tips for houswives

या 5 टिप्सच्या सहाय्याने गृहिणीही दिसू शकतात स्टायलिश, करा फॉलो

गृहिणी म्हटलं की आपल्याकडे आजही अनेक जण नाक मुरडणारे लोक आहे. पण घराची काळजी घेणारी गृहिणीच असते. घराची काळजी घेता घेता तिला स्वतःकडे लक्ष द्यायलाही वेळ मिळत नाही. सर्वांची काळजी घेणारी ती इतकी व्यस्त असते की तिला स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळेच अशा बऱ्याच गृहिणी आहेत ज्या स्वतःच्या लुक्सकडे लक्षच देत नाहीत आणि त्यांचा लुक त्यांना स्वतःलाच कंटाळवाणा वाटू लागतो. अनेकदा नटून थटून आपल्याला कुठे जायचं आहे हा विचारच त्यांना व्यवस्थित राहण्यासाठी परावृत्त करत असतो. पण असे अजिबात नाही की, तुम्ही घरी असल्यावर अगदी व्यवस्थित तयारच व्हायला हवं अथवा अगदी गबाळंच राहायला हवं. तुमचा लुक घरातही अत्यंत प्रेझेंटेबल असायला हवा. कारण अचानक कोणीही घरात आलं तर त्यावर तुमचे चांगला प्रभाव पडू शकेल. तुम्हाला घरच्या घरी स्टायलिश दिसण्यासाठी जास्त काहीही करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्यातील काही लहानसहान बदलच अधिक सुंदर बनवतात. जाणून घ्या हा लहानशा पण गरजेच्या टिप्स ज्या तुम्हाला बनवू शकतात स्टायलिश. 

अँकल लेंथ बॉटम

तुम्ही घरात पटियाला सलवार अथवा पंजाबी ड्रेस घालत असाल तर तुम्ही त्याऐवजी स्टायलिश राहण्यासाठी अँकल लेंथ बॉटम (ankle length bottom) चा उपयोग करा. हा लुक तुम्हाला आधुनिक आणि वेगळा लुक देतो आणि यामुळे तुम्ही घरातही अधिक स्टायलिश दिसू शकता. तुम्ही लांब कुरती जरी घातली असेल तरी तुमच्या या बॉटम लुकमुळे तुमच्या लुकमध्ये फरक पडतो आणि तुम्ही अधिक सुंदर आणि स्टायलिश दिसता. यासह तुम्ही तुमचे केसदेखील नेहमी व्यवस्थित विंचरून घरात असलात तरीही बांधून ठेवा. 

रंगांची योग्य निवड करा 

रंगाची निवड योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे कारण रंगाची निवड चुकल्यास, तुमचा लुक पूर्ण बिघडू शकतो. त्यामुळे तुम्ही कोणताही आऊटफिट निवडला तरी त्याचा रंग कोणता आहे याची निवड तुम्ही योग्य करा. तुमचा लुक अधिक रिफ्रेशिंग आणि ताजातवाना होईल असेच रंग तुम्ही घरी घालण्यात येणाऱ्या कपड्यांचेही निवडा. तुम्ही फिके आणि गडद असे दोन्ही रंगांचे कपडे निवडू शकता. पण फिके रंग तुमचा लुक अधिक फिका करू शकतात. तुम्ही नियमित घालण्यासाठी घरचे कपडे जरा गडद रंगाचे वापरलेत तर नक्कीच अधिक चांगले दिसतील आणि लुक स्टायलिश होईल. 

जयपुरी अथवा पारंपरिक ओढणी 

तुम्हाला जर घरात प्लेन सूट घालणे चांगले वाटत असेल तर तुम्ही त्यावर जयपुरी, लहरिया अथवा कोणतीही पारंपरिक ओढणी घ्या. घरात आपण ओढणी घेत नसलो तरीही अचानक कोणीही आले घरात की आपण पटकन ओढणी घेतोच. मग अशावेळी तुम्ही योग्य आणि स्टायलिश लुकसाठी या ओढण्यांचा वापर करा. साध्या आणि मोनोक्रोमेटिक सूटमध्ये तुम्ही नक्कीच कमाल लुक कॅरी करू शकता. सहसा बनारसी ओढणीचा वापर हा घरात करण्यात येत नाही. कार्यक्रमांसाठी तुम्ही या ओढण्या वापरता. पण इतर कोणत्याही साध्या ओढणीचा वापर तुम्ही करून स्टायलिश लुक मिळवू शकता. याशिवाय ओढणी घेताना तुम्ही ती योग्य कॅरी करता की नाही हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. काही महिला अशीच ओढणी ओढून घेतात. त्यामुळे तुम्ही घातलेल्या सूटचा लुक दबला जातो. तुम्ही एका हातावर अथवा दोन्ही बाजूला निऱ्या काढून ओढणी घेतली तर तुमचा लुक अधिक उठावदार दिसून येतो. 

ADVERTISEMENT

साडी असेल तर करा अशी स्टायलिश

काही महिला घरातही साडीच नेसतात. अनेक गृहिणी साड्यांना प्राधान्य देतात. रोज साडी नेसणाऱ्या महिलाही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत. पण घरातच आहोत म्हणून कशीही साडी नेसण्यापेक्षा तुम्ही घरीही स्लीव्हलेस अथवा क्रॉपटॉप ब्लाऊजचा उपयोग करून साडीला अधिक वेगळा आणि चांगला लुक देऊ शकता. तसंच सुळसुळीत साड्या असतील तर त्यावर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षक ब्लाऊज आणि डिझाईनर ब्लाऊज घालून याचा लुक अधिक स्टायलिश करू शकता. 

16 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT