Split ends अर्थात दुहेरी केस ही समस्या केसांसाठी सर्वात मोठी समस्या असते. याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. यामुळे केसांना खूपच जास्त नुकसान पोहचतं. असं होण्यामागे नक्की कारण काय असाही प्रश्न तुम्हाला नक्कीच त्रासदायक ठरत असतो. तर असं होण्यामागे तुमच्या केसांचे घासलेले आऊटर लेअर असतात, ज्यामुळे केस आतून डिहायड्रेट होतात आणि त्यांच्यामध्ये कमतरता राहाते. जेव्हा एंड्स डॅमेज होऊ लागतात तेव्हा लांब आणि घनदाट केस वाढवणं शक्य होत नाही. पण तुम्ही निराश व्हायची गरज नाही. आम्ही तुम्हाला Split Ends ची समस्या सोडवण्यासाठी काही खास उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही या समस्येपासून सुटका मिळवू शकता.
1. दुसऱ्या दिवशीच्या केसांची कमाल
Shutterstock
रोज केस धुणं चांगलं नाही हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. केस धुतल्यानंतर दुसऱ्या दिवशी स्काल्पच्या नैसर्गिक केसांना पोषण देतात आणि केसांना व्यवस्थित ठेवतात. त्यामुळे रोज शँपू करून केस धुवू नयेत असं सांगितलं जातं. तसं केल्याने केस अधिक कोरडे होतात आणि याच कारणामुळे केसांना फाटे फुटतात. त्यामुळे कधीही केस रोज धुणं योग्य नाही हे लक्षात ठेवा.
2. आंघोळ करण्याची योग्य पद्धत
तुम्ही जेव्हा केस धुता, तेव्हा केवळ आपल्या स्काल्पला शँपू लावण्याची पद्धत लक्षात ठेवा. केसांना व्यवस्थित शँपू लाऊन त्यानंतर कंडिशनर लावा. पुन्हा धुवा आणि मग कंडिशनर आपल्या केसांच्या खालच्या बाजूला अर्थात एंड्सना लावून काही मिनिट्स केस तसेच ठेवा. तसंच केस धुताना कंडिशनर पसरवण्यासाठी तुम्ही जाड दातांच्या कंगव्याचा उपयोग केल्यास, त्याचा फायदा होतो. असं केल्यामुळे जेव्हा तुम्ही आंघोळ करून बाहेर येता तेव्हा तुमच्या केसात अधिक गुंता होत नाही आणि केसगळती होण्याचा आणि केस तुटण्याचा धोका राहात नाही. त्यामुळे तुम्हाला केसांना दुहेरी फाटे फुटण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळते.
3. लिव्ह-इन कंडिशनरचा करा वापर
Shutterstock
आंघोळ करताना केसांना लावलेलं कंडिशनर जेव्हा तुम्ही धुता तेव्हा तुम्हाला split ends पासून थोडी सुरक्षा मिळते. पण तुम्हाला तुमचे केस अधिक सुरक्षित ठेवायचे असल्यास, केसांना लिव्ह इन कंडिशनरचा नियमित वापर करणं योग्य आहे. तसंच तुम्ही जेव्हा एखादी स्टाईल करण्यासाठी स्ट्रेटनर वापरता तेव्हा त्या हिटिंगपासूनही तुमच्या केसांची लिव्ह इन कंडिशनर सुरक्षा करतं. याचा वापर करणं अतिशय सोपं आहे. हातामध्ये साधारण एका लहान कॉईनच्या आकाराइतकं कंडिशनर घेऊन तुम्ही तुमच्या ओल्या केसांना लावा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मिड लेंथ ते केसांच्या शेवटापर्यंत हे लावलं जात आहे की नाही याकडे लक्ष द्या.
4. तुम्ही योग्यरित्या ब्लो ड्राय नक्की करता का?
Shutterstock
केसांना नेहमीच नैसर्गिकरित्या सुकवणं योग्य पर्याय आहे पण तरीही तुम्हाला जर ब्लो ड्राय करायचं असेल तर तुम्ही याचा वापर करताना नेहमी ड्रायरच्या nozzle चा वापर कराल याची काळजी घ्या. तसंच केसांना नेहमी खालच्या बाजूने सुकवण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या केसांवर येणाऱ्या गरमीचा परिणाम कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमच्या केसांच्या एंड्सना डायरेक्ट हिट देऊ नका.
5. केस नियमित ट्रिम करा
Shutterstock
तुम्हाला तुमच्या दुहेरी केसांची समस्या मिटवण्यासाठी केस नियमित ट्रिम करणं हा एक चांगला पर्याय आहे. केसांमध्ये split ends होण्याचं हेच मुख्य आणि महत्त्वाचं कारण आहे त्यामुळे तुम्ही नियमित trimming करणं गरजेचं आहे. split ends पासून सुटका मिळवण्यासाठी केस कापणं हा योग्य उपाय आहे. तसंच केसांना निरोगी ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यामुळे किमान तीन महिन्यांनी एकदा केस ट्रिम करा. तसंच तुमचे केस कोरडे आणि डॅमेज्ड असतील तर तुम्हाला केस अधिक कापण्याची आवश्यकता भासेल.
6. केस योग्य तऱ्हेने बांधा
Shutterstock
या गोष्टीबाबत कोणी जास्त विचार करत नाही. आपण आपले केस कशा प्रकाराने बांधतो यानेही खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा नियमित केस बांधता तेव्हा केस बांधताना हलके बांधा. घट्ट केस बांधू नका. साधे इलास्टिक रबर हे केसांना अधिक तुटण्यास कारणीभूत ठरतात. टाईट रबरबँड्स हे अतिशय रफ असतात आणि त्यामुळे केस तुटण्याचं आणि स्प्लिट एंड्ससाठी कारणीभूत ठरतात. तुम्ही जरी वर्कआऊट्ससाठी केस वर बांधत असाल तरी हे केस सॉफ्ट रबरबँडने बांधले जातील याची काळजी घ्या आणि आपले किमती केस वाचवा.
7. डॅमेज-फ्री हेअर डाएटला म्हणा हो
कलरिंग, straightening, पर्मिंग आणि अशा अनेक ट्रिटमेंट्स केसांसाठी करून घेणं आपल्या सर्वांनाच आवडतं. पण यामुळे केसांमध्ये दुहेरी फाटा फुटतो हे तर खरं आहे. यामुळे केसांचं नुकसान होतं. त्यामुळे अशा ट्रिटमेंट्स जितक्या टाळता येतील तितक्या टाळण्याचा प्रयत्न करा. वर्षातून एक वेळच तुम्ही अशा तऱ्हेची ट्रिटमेंट घ्या. तसंच केसांना केमिकल लावणं अथवा कलर करणं अथवा स्ट्रेट करणं यामुळेदेखील स्प्लिट एंड्स होऊ शकतात. तसंच जेव्हा तुम्ही अशी ट्रिटमेंट करता तेव्हा केस सतत धुणं चुकीचं आहे. त्यामुळे केसांना अधिक फाटे फुटतात.
हेदेखील वाचा
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
लांबसडक आणि घनदाट केसांच्या वाढीसाठी 10 घरगुती उपाय
लांब केसांना नुकसान पोहचवतात तुमच्या ‘या’ 5 चुका!